Yuva Karya Prashikshan Yojana Registration 2024: महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून युवा कार्य प्रशिक्षण योजना रजिस्ट्रेशन प्रकिया राज्यामधील बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे. बेरोजगार तरुण वर्ग सहजरित्या ऑनलाइन अर्ज करून शासनातर्फे देण्यात येणाऱ्या रोजगाराच्या संधीचा फायदा करून घेऊ शकतात.
देशभरामध्ये सर्व क्षेत्रामधील विध्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. परंतु वाढत्या महागाई व नवीन आर्टीफिसिअल इंटेलिजिअन्स सारख्या यंत्रणा सुरु झाल्यामुळे तरुण पिढींना रोजगाराची संधी मिळत नाही. यामुळे ते चांगल्या रोजगारासाठी एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करून नोकरीच्या शोधात भटकत राहतात.
विध्यार्थ्यानी उच्च व चांगले शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना नोकरी मिळण्यासाठी काटकसर करावी लागत आहे. यामध्ये त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य सुद्धा आर्थिक अडचणीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांना दैनंदिन खर्च सुद्धा भागवणे कठीण जात आहेत.
अशा तरुण पिढींना जे रोजगार नसल्यामुले बेरोजगार आहेत, त्यांना आर्थिक खर्च मिळवा. त्याचसोबत त्यांना चांगले कौशल्य प्रशिक्षण मिळवा व चांगली नोकरी मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. जेणेकरून बेरोजगार विद्यार्थी सोप्या पद्धतीने ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज करून रोजगाराची संधी प्राप्त करू शकतो.
आता कशा पद्धतीने विद्यार्थी युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतो? त्याचसोबत कोण योजनेसाठी पात्र असणार? किती पगार रोजगाराच्या माध्यमातून देण्यात येणार? आणि अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या कागदपत्रांची गरज लागणार? याबद्दल सविस्तर आर्टिकलमध्ये दिले आहे.
Yuva Karya Prashikshan Yojana in Marathi
युवा कार्य प्रशिक्षण योजनाची सुरुवात 09 जुलै, 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत करण्यात आली. योजना सुरु करण्यामागचे शासनाचे मुख्य उद्देश राज्यामधील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे.
12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये देण्यात येते. तसेच ITI व पदविका पूर्ण केलेल्या तरुणांना 8,000 रुपये लाभ मिळणार. त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रामधील पदवीधर व पदव्युत्तर असलेल्या तरुण वर्गाला 10,000 रुपयांचा वेतन दिले जाते. महाराष्ट्र सरकारतर्फे योजने अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेतन DBT म्हणजे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा केले जाणार.
Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 Overview
स्कीमचे नाव | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) |
वर्ग | महाराष्ट्र सरकारी योजना |
मंजूर निधी | 5,500 कोटी रुपये |
स्थापना झाली | 09 जुलै, 2024 मध्ये |
कोणी लॉन्च केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी |
विभाग | कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन |
मुख्य लक्ष्य | राज्यामधील तरुणांना नोकरी उपलब्ध करून बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे |
पात्र | बेरोजगार वर्गातील तरुण विद्यार्थी |
लाभ | 6,000 ते 10,000 रुपये वेतन |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | cmykpy.mahaswayam.gov.in |
हेल्पलाईन नंबर | 1800 120 8040 |
Benefits of Yuva Karya Prashikshan Yojana
- महाराष्ट्र सरकारच्या युवा कार्य प्रशिक्षण योजनाचे फायदे राज्यामधील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यासाठी होतो.
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते, त्याचसोबत दर महिन्याला आर्थिक स्वरूपात वेतन सुद्धा देण्यात येते.
- महाराष्ट्र राज्यामधील आतापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त तरुणांनी योजनेमध्ये अर्ज केले आहेत.
- राज्य शासनाच्या माध्यमातून 1 लाखांपेक्षा जास्त अर्जदार तरुणांची योजने अंतर्गत निवड करण्यात आले आहेत.
- त्याचप्रमाणे तरुणांना सोप्या पद्धतीने योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पोर्टल देखील सुरु करण्यात आले.
- योजनेमध्ये सहभागी असलेल्या लाभार्थ्यांना सहा महिन्याचा कालावधी प्रशिक्षणसाठी देतात.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र सुद्धा शासनातर्फे देण्यात येते. जेणेकरून ते विद्यार्थी इतर ठिकाणी नोकरीला लागण्यासाठी मदत होईल.
Yuva Karya Prashikshan Yojana Eligibility
बेरोजगार तरुणांना लाभ घेण्यासाठी युवा कार्य प्रशिक्षण योजनाची पात्रता काय आहे? हे जाणून घेणे आवश्यक आहे, त्यांच्या सर्व अटी खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत.
- योजने अंतर्गत अर्ज करणारा तरुण उमेदवार महाराष्ट्र राज्याचा स्थानिक रहिवासी असणे.
- तसेच अर्जदार तरुणांचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत 35 वर्ष वयोगटाच्या आतील असणे.
- उमेदवार नोकरी करत नसून बेरोजगार असेल तरच अर्ज करण्यास पात्र आहे.
- त्याचप्रमाणे योजनेमध्ये राज्यामधील तरुण मुले व तरुणी मुली सुद्धा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
Yuva Karya Prashikshan Yojana Required Documents
बेरोजगार तरुण युवा कार्य प्रशिक्षण योजनासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? त्यांची संपूर्ण यादी क्रमाने खाली दिली आहे.
- बेरोजगार तरुणांचे आधारकार्ड (बँक खात्यासोबत जोडले गेलेले)
- शाळा सोडल्याचा दाखला
- अर्जदाराचे मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक पासबुक जे आधारसोबत लिंक असणे
- ओळखपत्र (पॅनकार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
- विद्यार्थीचे शैक्षणिक प्रमाणपत्र
Yuva Karya Prashikshan Yojana Online Registration
युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये नोंदणी कशी करावी? याबद्दल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकियांना वाचा.
CMYKPY अंतर्गत लॉगिन आयडी तयार करणे
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन CMYKPY चे पोर्टल तयार केले आहेत.
- सर्वात प्रथम तुम्हाला योजनेसाठी विशेष सुरु केलेल्या पोर्टला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर डॅशबोर्ड उघडून येईल व त्यामध्ये लॉगिन असा पर्याय मिळेल ते क्लिक करणे.
- त्यानंतर खाली साइन अपचा बटन असेल, त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुमचे आधार नंबर, पूर्ण नाव, जन्म दिनांक, लिंग, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून घ्या.
- पुढे नवीन पासवर्ड तयार करून दोन वेळा भरून घ्या.
- संपूर्ण भरलेली माहिती तपासून व पासवर्ड लिहून घेऊन सबमिट बटनावर क्लिक करा.
- त्याच डॅशबोर्डमध्ये खाली लॉगिनचा पर्याय असेल ती सिलेक्ट करा.
- तुमच्या स्क्रीनवर पहिला ऑपशन असेल, त्यामध्ये Intern Login हा पर्याय निवडा.
- त्यानंतर यूजर आयडीमध्ये तुमचा आधार नंबर व पासवर्ड टाका.
- तुम्हाला कॅप्चा कोड मिळेल तो भरून घ्या आणि लॉगिन बटन दाबा.
तुमची वैयक्तिक माहिती भरून घेणे
- लॉगिन झाल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डवरील My Profile पर्यायामध्ये जावे लागेल.
- My Profile मध्ये आल्यावर सुरुवातीला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
- त्यामध्ये तुमचे आधारकार्डप्रमाणे नाव, जात व उपजा आणि तुमच्या आई-वडिलांचे नाव भरून घ्या.
- तसेच Nationality व Religion मध्ये जाऊन निवड करा.
- तुम्ही स्त्री असाल आणि लग्न झाले असेल तर स्टेटस निवडा.
- तुमचे पासपोर्ट साइज फोटो स्कॅन करून अपलोड करा.
- संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून घेतल्यानंतर Update बटन क्लिक करा.
तुमचे राहत असलेल्या पत्त्याची माहिती देणे
- सुरुवातीला तुम्ही राहत असलेला घर क्रमांक, गाव, Division, जिल्हा, तालुका आणि पिनकोड भरून घ्या.
- त्यानंतर तुमचा कायमचा पत्ता जर राहत असलेले ठिकाण सारखेच असल्यावर टिकमार्क करा तो पत्ता खालीलप्रमाणे कॉपी होऊन जाईल.
- जर राहता पत्ता सारखा नसेल तर जी काही माहिती विचारली आहे ती भरून पुन्हा अपडेट करा.
तुमची शैक्षणिक माहिती भरून देणे
- तुमचे शिक्षण कोणत्या क्षेत्रामध्ये झाले? ज्यामध्ये HSC, ITI, Graduate, Post Graduate आणि Diploma असा पर्याय दिसेल, त्यापैकी एकाची निवड करा.
- त्यानंतर तुम्ही कोणत्या Stream मध्ये शिकला आहात, त्याची निवड करा.
- पुढे शिक्षण, विषय, शैक्षणिक स्टेटस, बोर्ड, माध्यम, टक्केवारी आणि तुमचे पासिंग वर्ष भरून घेणे.
- पुढे काही 3 ते 4 प्रश्न विचारले गेले आहेत त्याची उत्तरे देणे अनिवार्य आहे.
- शैक्षणिक माहिती भरून घेतल्यानंतर अपडेट करून घ्या.
तुमचे बँक खात्याची पूर्ण माहिती भरणे
- बँक खात्याच्या माहितीमध्ये तुमचे खाते क्रमांक भरा.
- पुढे तुमचे बँक खात्यामध्ये असलेले नाव टाका.
- तुमच्या बँकेचे नाव व कोणती ब्रांच आहे? त्याची सिलेक्शन करा.
- नंतर बँकेचा आयएफसी कोड टाकून माहिती अपडेट करणे.
युवा कार्य प्रशिक्षण योजनाची आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे
- Documents च्या पर्यायामध्ये तुम्हाला जावे लागेल.
- त्या डॅशबोर्डमध्ये आल्यावर त्यामध्ये Living Certificate, Bank Passbook, Birth Certificate, Domicile Certificate, SSC Passing Certificate आणि Education Certificate या सर्व कागदपत्रांचा पर्याय दिसेल.
- या सर्व कागदपत्रांची नावे एक-एक सिलेक्ट करून अपलोड करून घेणे.
- कागदपत्रे अपलोड झाल्यावर अपडेटवर क्लिक करणे.
- Declaration च्या पर्यायामध्ये जाऊन टिकमार्क करून सबमिट करणे.
तुम्ही नोकरीसाठी अर्ज करणे
- तुमची प्रोफाइल पूर्ण केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये Apply for Jobs असा ऑपशन दिसेल, त्यामध्ये जाणे.
- त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामध्ये तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे.
- पुढे त्या जिल्ह्यांमध्ये असलेले Employee नाव निवडू शकता किंवा सिलेक्ट हा पर्याय ठेऊन Search बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर जिल्ह्यांमधील संपूर्ण यादी उघडून येईल.
- तुमच्या क्षेत्रानुसार नोकरी शोधून Apply बटणावर क्लिक करा.
- त्या यादीमध्ये नोकरीसाठी अर्ज करायची शेवटचे दिनांक सुद्धा दिलेले असते आणि Vacancy सुद्धा शो करतात.
- नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर Employer Response पर्यायसुद्धा देण्यात आले आहे, तिथे जाऊन नोकरीचे स्टेटस पाहू शकता.
निष्कर्ष
आमच्या लेखातून Yuva Karya Prashikshan Yojana Registration 2024 संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तररित्या दिली आहे. ज्यामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये तरुण कसा लाभ घेता येईल? त्यांना कोणत्या अटींना फॉलो करावे लागणार? तसेच आवश्यक असणारी कागदपत्रे आणि सुरु केलेल्या नवीन पोर्टलमध्ये कसे अर्ज करू शकतो? असे सर्व प्रश्नाची उत्तरे सविस्तर देण्यात आली. तुमचे वय 18 असून तुमचे बारावी पूर्ण झाले असेल तर तुम्ही योजनेमध्ये सहभागी होऊन आर्थिक लाभ शकता.
FAQs
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी मुली पात्र आहेत का?
होय, या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यामधील तरुण व तरुणी सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.
युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली?
महाराष्ट्र सरकारतर्फे योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटी रुपये रक्कम मंजूर करण्यात आले.
CMYKPY चा पूर्ण अर्थ काय आहे?
CMYKPY चा पूर्ण अर्थ Chief Minister Yuva Karya Prashikshan Yojana असा आहे.
पुढे वाचा: