तुमच्या मुलीला Sukanya Samriddhi Yojana च्या मॅच्युरिटीवरती मिळणार 70 लाख रुपये, संपूर्ण हिशोब घ्या जाणून 

EEE स्टेटस सोबत Sukanya Samriddhi Yojana येते, ज्यामध्ये लाभार्थ्यांनी गुंतवलेल्या पैश्यांवर, मिळणाऱ्या व्याजावर आणि मॅच्युरिटी रक्कमेवर कोणत्याही प्रकारचे टॅक्स लावले जात नाही.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

Sukanya Samriddhi Yojana Calculator: भारत देशामध्ये सध्या लग्नाचा आणि शिक्षणाचा खर्च खूप वाढला आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकांचा रोजगार मात्र जास्त काही वाढला नाही, यामुळे सामान्य व्यक्ती या महागाईच्या जाळ्यात अडकून बसला आहे. 

देशामध्ये जास्त लोकसंख्या ही नोकरी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांची आहे, ज्यांना आपल्या मुलीच्या लग्नाला आणि शिक्षणाला घेऊन जास्त खर्च करायला जमत नाही. परंतु नोकरीसोबत चांगल्या ठिकाणी थोडे पैसे वाचवून जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली, तर शिक्षणाचा व इतर खर्च भागवता येतो. 

अशा पालकांना आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल आणि आर्थिक दृष्टया सक्षम राहण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा उत्तम पर्याय आहे. या योजनेचा व्याजदर सरकारच्या माध्यमातून प्रत्येक तीन महिन्यामध्ये फिक्स केला जातो आणि सरकारी गुंतवणूक असल्याकारणाने या योजनेमध्ये पैसे गुंतविणे हे अगदी सुरक्षित आहे. 

केंद्र सरकारने या वर्षी सुकन्या समृद्धी योजनासाठी 8.2% चक्रवाढ व्याजदर लागू केला आहे. यामध्ये तुम्ही आपल्या मुलीच्या नावे खाते उघडून तिच्या भविष्यात होणाऱ्या उच्च शिक्षण व लग्नासाठी चांगली रक्कम जमा करू शकता. 

भविष्य काळात मिळणार 70 लाख रुपये

या योजनेमध्ये तुम्ही वर्षाला कमीतकमी रक्कम 250 रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम 1,50,000 रुपये  गुंतवणूक करू शकता. योजने अंतर्गत सुकन्या खाते उघडल्यानंतर 15 वर्ष सतत गुंतवणुक करणे आवश्यक आहे, त्यानंतर 6 वर्षांचा लॉकिंग पिरियड लागू केला जातो. 

मुलीचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 50 टक्के मॅच्युरिटीची रक्कम काढण्यास परवानगी आहे आणि त्यानंतर राहिलेली रक्कम ही मुलीचे वय 21 पूर्ण झाल्यावर मिळते. यामध्ये दीड लाखांच्या खाली रक्कम वर्षाला गुंतवल्यामुळे कोणताही टॅक्स लागू केला जात नाही. 

जर तुम्ही मुलीचे वय 1 वर्ष झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून प्रत्येक वर्षाला 1.50 लाख रुपये जमा केले, तर  मॅच्युरिटी रक्कम ही 69,27,578 रुपये इतकी मिळते. त्यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम ही  22,50,000 रुपये इतकी असते आणि त्यामध्ये व्याजानुसार कॅल्क्युलेट केलेली रक्कम 46,77,578 रुपये एवढी मुलीच्या नावे मिळते.

संबंधित आणखी माहिती: