PM Shram Yogi Mandhan Yojana: पीएम श्रम योगी मानधन योजना ही भारत देशातील असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केली आहे. याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आर्टिकल शेवटपर्यंत पहा.
देशामधील असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना त्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नसतो. त्यामध्ये त्यांच्या निवृत्ती काळामध्ये त्यांना आर्थिक गरज पुरविण्यासाठी सतत काम करावे लागते.
Read More: PM Shram Yogi Mandhan Scheme under Beneficiaries
अशा नागरिकांना असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा, 2008 प्रमाणे त्यांच्या निवृत्ती काळामध्ये आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी केंद्र सरकारने योजनेच्या मदतीचा उपक्रम सुरु केला आहे.
या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 01 फेब्रुवारी, 2015 रोजी श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत केली होती. योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या कामगारांना त्याचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन स्वरूपात रक्कम देण्यात येते.
Read More: PM Kisan Mandhan Yojana
या पेन्शन स्कीमची अंमलबजावणी करण्याचे कार्य LIC आणि सामान्य सेवा केंद्र (CSC) हे एकत्रितपणे करते. कामगारांना आर्थिक मदत योग्यरीत्या मिळावी यासाठी मंत्रालयातर्फे maandhan.in हे पोर्टल देखील तयार केले आहे. ज्यामध्ये बांधकाम कामगार, सफाई कामगार, स्ट्रीट वेंडर्स आणि इतर नागरिक योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
2024 वर्षापर्यंत 30 कोटी पेक्षा जास्त कामगार नागरिकांनी योजनेच्या अंतर्गत पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन केले आहे. कामगारांना योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी 18 ते 40 वय पूर्ण असणे आवश्यक आहे. योजनेमध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर कामगारांना प्रत्येक महिन्याला 40 पासून ते 200 रुपये प्रीमियम त्यांच्या वयाप्रमाणे भरावे लागते.