Vishwakarma Silai Machine Yojana Eligibility: विश्वकर्मा सिलाई मशीन योजनेसाठी कोण पात्र आहे? जाणून घ्या संपूर्ण अटी 

Vishwakarma Silai Machine Yojana Eligibility: विश्वकर्मा योजना अंतर्गत फ्री सिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी लेखामध्ये दिलेल्या पात्रतेच्या अटीनुसार पात्र असणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

विश्वकर्मा योजना अंतर्गत पात्र असलेल्या महिलांना केंद्र सरकारच्या माध्यमातून सिलाई मशीन घेण्यासाठी 15,000 रुपये आणि प्रशिक्षण वेतन म्हणून प्रतिदिन 500 रुपये दिले जातात. या योजनेचा विविध प्रकारचा लाभ घेण्यासाठी महिलांना सिलाई मशीन योजना अंतर्गत पात्र असणे आवश्यक आहे. 

या आर्टिकलमध्ये विश्वकर्मा सिलाई मशीन योजनेसाठी कोण पात्र असणार? त्यामध्ये किती वयाच्या महिलांचा समावेश करण्यात येतो? त्यांच्या कुटुंबामधील वार्षिक उत्पन्न किती असावे? कोणकोणत्या महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात? आणि कोणत्या महिला पात्र नसणार? या सर्व अटी जाणून घेण्यास मिळेल. 

  • विश्वकर्मा योजना अंतर्गत मोफत सिलाई मशीनचा लाभ फक्त महिला वर्गच घेऊ शकतात. 
  • योजनेमध्ये अर्ज करणारी महिला ही भारत देशामधील स्थायिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • प्रशिक्षण व मोफत सिलाई मशीन फक्त 20 ते 40 वर्ष पूर्ण असलेल्या महिलांना देण्यात येते. 
  • योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाखांच्या खाली असावे. 
  • त्याचप्रमाणे महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये काम करत नसावे. 
  • देशभरातील आर्थिक दृष्टया दुर्बळ परिस्थिती असलेल्या महिला योजनेसाठी पात्र आहेत. 
  • ज्या महिला विधवा आणि दिव्यांग श्रेणीमध्ये येतात ते देखील योजनेचा लाभ घेऊ शकतात. 
  • अर्ज करणाऱ्या महिलेजवळ वयाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. 
  • त्याचप्रमाणे विधवा व दिव्यांग महिलांना अर्ज करताना पुरावा म्हणून प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

Read More: