Viklang Pension Yojana 2024: दिव्यांग नागरिकांना मिळणार दरमहा १००० रुपये

Viklang Pension Yojana 2024: देशामधील अपंग नागरिकांसाठी केंद्र सरकारने विकलांग पेन्शन योजना या उपक्रमाची सुरुवात केली आहे. सरकारतर्फे चालू केलेल्या या योजनाच्या माध्यमातून देशभरातील अपंगत्त्व असलेल्या लोकांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात आहे. शासनाकडून अपंग नागरिकांना आर्थिक स्वरूपात मिळणारी पेन्शनची वेतन ही दर महिन्याला बँक खात्यामध्ये पाठविली जाते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत सरकार आपल्या देशामधील नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध प्रकारच्या पेन्शन योजनांचे प्रकल्प चालू करतात. जसे विधवा पेन्शन योजना, ई-श्रम कार्ड पेन्शन योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या विविध प्रकारच्या योजना केंद्र सरकार प्रत्येक राज्यात राबवत असते. 

देशामधील अपंगत्व असलेले नागरिक विकलांग पेंशन योजनामध्ये अर्ज करून लाभ घेण्यास इच्छुक असतील तर आमच्या या लेखानुसार संपूर्ण माहिती शेवटपर्यंत जाणून घ्या. यामध्ये आम्ही योजना संबंधित महत्त्वाची माहिती, त्यांचे उद्दिष्टे, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज प्रकिया या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली आहे. 

Viklang Pension Yojana in Marathi

केंद्र सरकारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मिळून 2016 रोजी UP Viklang Pension Yojana सुरु केली होती. या योजनेच्यामार्फत उत्तर प्रदेशमधील अपंगत्व असलेल्या नागरिकांना दरमहा 500 रुपये पेंशन स्वरूपात दिली जात आहे. याचा फायदा उत्तर प्रदेशमधील दिव्यांग लोकांना चांगल्या प्रकारे झाला. UP मधील लोकांना योग्यरित्या आर्थिक मदत मिळावी यासाठी समाज कल्याण विभाग, उत्तर प्रदेश यांना काम सोपविले होते. अजूनही यामध्ये UP मधील नागरिक सहभागी होऊन आर्थिक लाभ घेत आहेत. 

उत्तर प्रदेशमधील यशस्वी प्रकल्पामुळे केंद्र सरकारने देशामधील दिव्यांग नागरिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विकलांग पेंशन योजना सुरु केली आहे. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून देशभरातील अपंग नागरिकांना दर महिने 600 रुपये ते 1000 रुपये आर्थिक मदत पाठवतात. अपंग नागरिकांना प्रत्येक महिन्यात सरकारतर्फे मिळणारी आर्थिक स्वरूपात रक्कम ही डीबीटी प्रक्रियेद्वारे डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केली जाते. 

Apang Pension Scheme 2024 Overview

योजनाचे नाव अपंग पेन्शन योजना 
श्रेणीकेंद्र सरकारी योजना 
सुरु कोणी केलीकेंद्र सरकारने 
सुरु कधी झाली2024
उद्देशदेशामधील अपंगत्व असलेल्या नागरिकांना आर्थिक मदत पुरवणे 
लाभार्थी देशामधील अपंग नागरिक 
लाभदरमहा 600 रुपये ते 1000 रुपये आर्थिक मदत
अर्ज पद्धतऑनलाइन व ऑफलाइन 
अधिकृत वेबसाइट socialsecurity.mp.gov.in

Viklang Pension Scheme Purpose 

केंद्र सरकारने सुरु केलेली विकलांग पेन्शन योजनाचे उद्देश देशभरातील अपंग नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देणे हे आहे. जेणेकरून त्यांच्या जीवनात आर्थिक स्वरूपात स्थिरता राहण्यात मदत होईल. देशातील प्रत्येक राज्यात गरीब वर्गातील अपंग नागरिक अपंगत्व असल्यामुळे आर्थिक दृष्टया दुर्बळ होऊन जातो.

त्यामध्ये त्यांच्या शारीरिक अडचणीमुळे त्यांना जास्त काम करण्यासाठी पर्याय उपलब्ध नसतात किंवा काही जण सक्षम असून त्यांना निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यास दिले जात नाही. अशातच त्यांना त्यांचे दैनंदिन आणि आरोग्य विषयक खर्च भागविण्यास जमत नाही. यासाठी केंद्र सरकारने दिव्यांग लोकांना आपला दैनंदिन आर्थिक खर्च भागविण्यासाठी अपंग पेन्शन योजना चालू केली आहे.

Viklang Pension Yojana Benefits 

  • विकलांग पेन्शन योजनाचे फायदे देशामधील अपंगत्व असलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारतर्फे आर्थिक लाभ दिले जातात. 
  • या योजनेच्या माध्यमातून अपंगत्व असलेल्या नागरिकांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. 
  • त्याचप्रमाणे, अपंगत्व असलेल्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये 600 ते 1000 रुपये पेन्शन वेतन म्हणून पाठविले जाते. 
  • या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमसाठी कुठेही न जाता लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये DBT (Direct Benefit Transfer) या प्रकियाद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर केले जाते. 
  • अपंगत्व असलेल्या व्यक्तींना आपले दैनंदिन खर्च भागविण्यास मदत मिळते. 
  • केंद्र सरकारतर्फे मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे दिव्यांग व्यक्ती आत्मनिर्भर बनतात.

Viklang Pension Yojana Eligibility 

नागरिकांना या योजने अंतर्गत अर्ज करून लाभ घेण्यासाठी खाली दिलेले विकलांग पेन्शन योजनासाठी पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • या योजनेमध्ये अर्ज करणारे अर्जदार भारत देशामधील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. 
  • या योजनामध्ये सहभागी होण्यासाठी अपंग नागरिकांचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 59 वर्ष अनिवार्य आहे.  
  • जे नागरिक सरकारी कार्यालयात कार्यरत आहेत ते यामध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकत नाही. 
  • जे अर्जदार यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणतेही सदस्य आयकरदाता नसावा. 
  • अर्जदार दिव्यांग व्यक्तीकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
  • त्याचप्रमाणे, अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असून आधारकार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. 
  • जे नागरिक शासनाच्या इतर कोणत्या योजनांचे लाभ घेत आहेत ते नागरिक यामध्ये अर्ज करू शकत नाही. 
  • या योजनेमध्ये अर्जदारांना सहभागी होण्यासाठी शासनाने सांगितलेले आवश्यक कागदपत्रे सगळे सोबत असणे गरजेचे आहे.   

Viklang Pension Yojana Required Documents 

या उपक्रमात ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करताना फॉर्मसोबत खाली दिलेले अपंग पेन्शन योजनाचे आवश्यक कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे. 

  • अर्जदाराचे आधारकार्ड (बँक खात्यासोबत लिंक असणे) 
  • स्थानिक रहिवासी दाखला 
  • ओळखपत्र 
  • अपंगत्व असण्याचे प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला 
  • वोटर आयडी 
  • बँक पासबुकचे पहिले पान 
  • वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र 
  • वयाचे प्रमाणपत्र (शाळेचा दाखला) 
  • मोबाईल नंबर 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 

Viklang Pension Yojana Online Registration 

केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना सोप्या पद्धतीने अर्ज करून लाभ मिळविण्यासाठी सामाजिक सुरक्षा पेन्शन पोर्टलची सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षा पेन्शन पोर्टलद्वारे अपंग पेन्शन योजनामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रकिया सांगितली आहे ते लक्षपूर्वक वाचून रजिस्टर करा.

  • या योजनेमध्ये अर्जदाराला अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम सामाजिक सुरक्षा पेन्शन पोर्टल उघडावा लागेल. 
  • पोर्टल उघडल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाइटचे होमपेज उघडून येईल. 
  • त्या होमपेजमध्ये पेन्शन फॉर्मचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. 
  • त्या पर्यायामध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये आवश्यक असणारी सगळी माहिती विचारली गेली असेल ती लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे. 
  • अपलोड केलेले कागदपत्रे व फॉर्म पुन्हा एकदा तपासून घेऊन सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • त्यानंतर अर्जाचे सबमिट केलेले फॉर्मचे प्रिंटआउट काढून घेणे. 
  • ते प्रिंटआउट घेऊन जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये जाऊन जमा करणे. 
  • त्यानंतर तिथल्या नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून तो फॉर्म तपासला जाईल आणि तुम्ही पात्र असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकेल. 
  • अशा प्रकारे या योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करून पेन्शनची रक्कम तुम्ही प्राप्त करू शकता.

Viklang Pension Yojana Offline Registration 

जर तुम्हाला या योजनेत ऑनलाइन अर्ज करण्यास काही समस्या येत असतील, तर तुम्ही अपंग पेन्शन योजनासाठी ऑफलाइन रजिस्ट्रेशन करून लाभ मिळवू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी खालील दिलेले प्रकिया फॉलो करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील ग्रामपंचायतच्या कार्यालयात जायचे आहे. 
  • त्यानंतर कार्यालयामधील अधिकाऱ्याकडून विकलांग पेन्शन योजनाचा फॉर्म प्राप्त करून घ्यायचा आहे. 
  • फॉर्म प्राप्त केल्यानंतर त्यामध्ये विचारली गेलेली सगळी आवश्यक माहिती लक्षपूर्वक वाचून भरणे. 
  • त्याचसोबत अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची प्रिंट करून फॉर्मसोबत जोडणे. 
  • भरलेला फॉर्म व कागदपत्रे याची एकदा नीट तपासणी करून घेणे. 
  • त्यानंतर ते सगळे कागदपत्रे व फॉर्म जिल्हा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन जमा करणे. 
  • त्यानंतर तिथल्या नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून त्या कागदपत्रांची आणि फॉर्मची तपासणी केली जाईल. 
  • तुम्ही योजनेस पात्र असाल तर तुम्हाला योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. 
  • अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज करून योजनेचा आर्थिक लाभ घेऊ शकता.


निष्कर्ष 

आम्ही या लेखातून तुम्हाला Viklang Pension Yojana संबंधित संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितली. यामध्ये आम्ही योजनेचे महत्त्व, ती का सुरु करण्यात आली? कोणासाठी सुरु करण्यात आली? कोणती सुरु केली? कधी सुरु केली? त्यांचे उद्दिष्ट्ये काय आहेत? त्यांचे होणारे फायदे काय आहेत? यामधून किती लाभ मिळणार? यासाठी कोणती वेबसाइट सुरु केली आहे? अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे? अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत? कशा प्रकारे अर्ज करून लाभ मिळवू शकतो? व याची ऑफलाइन आणि ऑनलाइन प्रकिया कशी आहे? अशा प्रकारची संपूर्ण माहितीचे मार्गदर्शन या लेखात केले गेले आहे. 

तुम्ही या योजनेच्या माध्यमातून अर्ज करून दर महिने 600 ते 1000 रुपयांचा आर्थिक लाभ डायरेक्ट बँक खात्यामध्ये घेऊ शकता. यासाठी आम्ही दिलेल्या लेखातील माहितीनुसार प्रकिया पूर्ण करा आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनेचा आर्थिक लाभ प्राप्त करा. आमचा हा लेख जर तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या जवळील अपंग असलेल्या व्यक्तींना लेख पाठवून त्यांनासुद्धा सहभागी होऊन या योजनेत मदत मिळविण्यास प्रोत्साहन द्या. 

अशाच फायदेशीर आणि उपयुक्त योजनांबाबत माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करा आणि आमच्या Telegram/WhatsApp Channel ला Join करून नवीन अपडेट्स मिळवा. 

FAQs

UP मध्ये अपंग पेन्शनची रक्कम किती आहे?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगि आदित्यनाथ यांनी सुरु केलेल्या UP मधील अपंग पेन्शनची रक्कम दरमहा 600 रुपये इतकी आहे. 

दिव्यांग व्यक्तीसाठी काही पेन्शन योजना आहे का?

हो आहे, केंद्र सरकारने सुरु केलेली विकलांग पेंशन योजना ही देशामधील दिव्यांगांसाठीच आहे. 

अपंग व्य क्तीसाठी काय फायदा आहे?

अपंग व्यक्ती केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचे फायदे घेऊ शकतो. 

अपंग पेन्शन योजनेसाठी पात्र कोण आहेत? 

या योजनेमध्ये अर्ज करण्याऱ्या व्यक्तीचे वय 18 ते 59 वर्षा पेक्षा कमी असणे ते व्यक्ती यास पात्र आहेत. 

पुढे वाचा: