Vidya Lakshmi Yojana Loan: विद्या लक्ष्मी योजनाच्या माध्यमातून कमी व्याजदरामध्ये विद्यार्थ्यांना लाखांपर्यंतचे कर्ज सरकारच्यातर्फे उच्च शिक्षणासाठी देण्यात येणार. ही योजना काय आहे? हे या आर्टिकलच्यामार्फत जाणून घ्या.
आपल्या देशामध्ये खूप तरुण आहेत, त्यांना 12 वी पूर्ण केल्यानंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घ्यायचे होते. त्याचसोबत मोठ्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे होते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ही सर्व स्वप्ने पूर्ण होत नाही.
Read More: Vidya Lakshmi Yojana Eligibility
शिक्षणाच्या खर्चासाठी जेव्हा आपण वेगवेगळ्या बँकेमध्ये कर्ज घेण्यास जातो, तेव्हा विविध प्रकारचे गॅरेंटी पुरावा मागितला जातो. त्यामध्ये हे कागदपत्रे घेऊन या, इतके गॅरेंटर घेऊ या आणि काही तरी मॉर्गेज ठेवा अशा समस्यांमुळे आपले सर्व स्वप्ने अशीच राहून जातात.
आपल्या देशामध्ये असे काही तरुण मुले असतात, जी शिक्षणामध्ये खूप हुशार आहेत. ते योग्य उच्च शिक्षण प्राप्त करून देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात. परंतु आर्थिक परिस्थिती आणि बँकेमधून कर्जासाठी नकार दिल्यामुळे हवे तसे उच्च शिक्षण घेणे होत नाही.
आता येणाऱ्या काळामध्ये जी मुले मेहनत करतात, ज्यांना उच्च शिक्षण प्राप्त करायचे आहे. त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण होऊ शकते. सध्या कॅबिनेटमध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत बैठक झाली. त्यामध्ये तरुणांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी कर्जा स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
Read More: Vidya Lakshmi Yojana Apply Online
सरकारने कोणती योजना आणली? ती कधी सुरु झाली? आणि कोणकोणते फायदे विद्यार्थ्यांना योजनेमध्ये देण्यात येणार? ही सर्व माहिती लेखातून जाणून घेण्यास मिळेल.
विद्या लक्ष्मी योजना काय आहे?
विद्या लक्ष्मी योजनाची सुरुवात केंद्र सरकारच्या माध्यमातून युनिअन कॅबिनेटद्वारे 06 नोव्हेंबर 2024 करण्यात आली. 2024-25 ते 2030-31 वर्षाच्या कालावधीमधील योजनेच्या खर्चासाठी 3,600 कोटी रुपये बजेट शासनाकडून घोषित करण्यात आले.
या संस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठी योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करू देण्यात येणार. योजनेमधून विद्यार्थ्यांना घेताना कोणत्याही प्रकारचे मॉर्गेज आणि गॅरेंटी द्यावी लागणार नाही.
केंद्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 75% क्रेडिट गॅरेंटीप्रमाणे 7.5 लाख रुपयेपर्यंत लोनचे लाभ देण्यात येणार. ज्या कोणत्याही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना 10 लाखांच्या लोनवरती 3% व्याज सबसिडी सरकारकडून दिले जाणार.
Read More: