Vidya Lakshmi Yojana Apply Online 2024: जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विद्या लक्ष्मी योजनाच्या अंतर्गत कर्ज घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनी आर्टिकलमध्ये दिलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रकिया स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.
सुरुवातीला योजनेच्या माध्यमातून साडेचार लाखांपर्यंत शिक्षणासाठी लोन दिले जात होते. परंतु 06 नोव्हेंबर, 2024 च्या कॅबिनेट बैठकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली त्याची रक्कम 10 लाखांपर्यंत करण्यात आली. यामध्ये 75 गॅरेंटी क्रेडिटनुसार विद्यार्थ्यांना 7.5 लाखांपर्यंत मॉर्गेजशिवाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Read More: Vidya Lakshmi Yojana Loan
विद्या लक्ष्मी योजनामध्ये अर्ज करण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या Vidya Lakshmi Portal वर जाऊन अर्ज करावे लागेल. पोर्टलसाठी कोणती लिंक आहे? त्यामध्ये रजिस्ट्रेशन कसे करायचे? आणि शैक्षणिक कर्जासाठी कसे अर्ज करायचे याची माहिती आर्टिकलामध्ये दिलेली आहे.
Read More: Vidya Lakshmi Yojana Eligibility
विद्या लक्ष्मी योजनामध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये विद्या लक्ष्मी पोर्टलची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- पोर्टलमध्ये प्रवेश केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये Register बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यामध्ये तुमचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करून सबमिट बटन दाबणे.
- त्यानंतर तुमच्या ई-मेल आयडीमध्ये पोर्टद्वारे मेलमध्ये लिंक येईल ती ऍक्टिव्ह करून घेणे.
- पुन्हा पोर्टलमध्ये येऊन लॉगिनमध्ये Student Login ऑपशनला सिलेक्ट करा.
- पुढे तुमचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घेणे.
- तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामध्ये Loan Application Form च्या पर्यायामध्ये जाणे.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर Vidya Lakshmi Portal Application Form उघडून येईल.
- त्यामध्ये तुमची वैयक्तिक, बँक आणि शैक्षणिक कोर्सची माहिती योग्यरीत्या भरून घेणे.
- पुढे तुम्हाला शिक्षणासाठी किती खर्च लागणार? त्याची माहिती भरावी लागेल.
- पोर्टलमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या यादीनुसार सर्व PDF,JPG किंवा PNG फाईल 2 MB च्या आत स्कॅन करून अपलोड करून घ्या.
- संपूर्ण योजनेचा फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
- कर्ज मिळविण्यासाठी डॅशबोर्डमध्ये या त्यामध्ये Search and Apply for Loan Scheme यामध्ये जावा.
- त्यानंतर कोर्स कुठे व कोणता करणार आहे? ते निवडा.
- पुढे ते कोर्स करण्यासाठी किती लोनची गरज आहे? ती सुद्धा निवडून Search करा.
- तुम्ही निवड केल्याप्रमाणे डॅशबोर्डमध्ये बँकांची यादी आली असेल.
- त्या यादीमध्ये बँकेचे नाव तपासून Apply बटनावर क्लिक करून घेणे.
- अशा पद्धतीने तुमचे योजनेमध्ये कर्जासाठी अर्ज पूर्ण झाले आहेत.