Top 3 Education Yojana in India: आर्टिकलमध्ये दिलेल्या टॉप 3 शिक्षण योजना ज्याच्या माध्यमातून भारत देशामधील शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगाने विकास होत आहे. त्या टॉप 3 शिक्षण योजना कोणत्या आहेत? त्याची माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल पहा.
मागील काही वर्षांमध्ये भारताच्या शिक्षणामध्ये विकास घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने विविध प्रकारच्या शैक्षणिक सुविधा व आर्थिक मदत करणाऱ्या योजनांची सुरुवात केली. ज्याच्या माध्यमातून देशामधील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण, पायाभूत सुविधा, चांगले प्रशिक्षण, नवीन उपकरणे, रोजगाराची संधी आणि आर्थिक मदत यांसारखे फायदे करून दिले जाते.
Read More: 3 Things To Know About Vidya Lakshmi Yojana
आर्टकिलमध्ये अशाच टॉप 3 शिक्षण योजनाच्या बद्दल माहिती दिलेली आहे. जी भारतामधील शिक्षणाच्या इकोसिस्टिममध्ये विकास घडवून आणण्यास मदत करत आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे.
भारतामधील टॉप ३ शिक्षण योजना
Vidya Lakshmi Yojana
विद्या लक्ष्मी योजनाची सुरुवात 06 नोव्हेंबर 2024 मध्ये युनियन कॅबिनेटमार्फत करण्यात आली. ज्यामध्ये देशामधील आर्थिक स्थिती मध्यम असलेल्या कुटुंबामधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी कमी व्याजदरामध्ये 7.5 लाख रुपयांचे कर्ज कोणतेही गॅरेंटी व पुराव्याशिवाय दिले जाते. ज्याच्यासाठी केंद्र सरकारने 3,600 कोटी रुपयांचा बजेट देखील मंजूर केला आहे.
PM SHRI Yojana
भारतामधील 14,500 पेक्षा जुन्या शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधार आणि त्यानंतर त्यामध्ये स्मार्ट उपकरणे व यंत्रणांचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने 05 सप्टेंबर, 2022 रोजी पीएम श्री योजनेची सुरुवात केली. ज्यामध्ये शाळांमध्ये सुधार करण्यासाठी आर्थिक मदत केंद्र व राज्य सरकार मिळून करते.
Diksha Yojana
Diksha योजनेचा पूर्ण अर्थ Digital Infrastructure for Knowledge Sharing असा आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल ई लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ज्यामध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामधील शैक्षणिक ज्ञान डिजिटल प्लॅटफॉर्म अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येते. देशामधील विद्यार्थ्यांना शिक्षण प्राप्त होण्यासाठी अँप व प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले. ज्यामध्ये विडिओ, लेसन प्लॅन व ई कॉन्टेन्ट उपलब्ध आहेत.