Swadhar Yojana Online Form: स्वाधार योजनेचा फॉर्म ऑनलाइन कसा भरायचा? वापरा ही प्रकिया

Swadhar Yojana Online Form: महाराष्ट्र राज्य सरकारकडून 2024 मध्ये स्वाधार योजनाचे ऑनलाईन फॉर्म सुरु करण्यात आलेले आहे. या आर्टिकलमध्ये योजनेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा? याची संपूर्ण प्रकिया स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

स्वाधार योजनामध्ये पात्र असलेल्या विद्यार्थ्याना महाराष्ट्र शासनातर्फे उच्च शिक्षण घेण्यासाठी 51 हजार रुपये वर्षाला देण्यात येतात. त्यामध्ये राज्यामधील दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती आणि नव बौद्ध कुटुंबातील विद्यार्थ्यां रजिस्ट्रेशन करू शकतात. 

2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल तयार केले आहे, त्यामध्ये पात्र असलेले सर्व विद्यार्थी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकिया वापरून अर्ज करू शकतात. 

स्वाधार योजना ऑनलाईन फॉर्म भरायची प्रकिया 

  • ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला hmas.mahait.org ही वेबसाइट मोबाईल किंवा डेस्कटॉपवर उघडायची आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला आधी लॉगिन आयडी पासवर्ड तयार करावे लागेल, यासाठी Registration च्या पर्यायामध्ये प्रवेश करा. 
  • त्यामध्ये तुमचे यूजर नेम, पासवर्ड, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून घ्या. 
  • पुढे सेंड ओटीपीवर क्लिक करून आलेले कोड भरा. 
  • त्यानंतर कॅप्चा कोड टाकून Save या बटनावर क्लिक करा. 
  • पुन्हा डॅशबोर्डमध्ये येऊन तयार केलेला आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा. 
  • तुम्हाला आधारकार्ड नंबर टाकावा लागेल तो टाकून ओटीपीत व्हेरिफाय करून घ्या. 
  • त्यानंतर आधारकार्ड प्रमाणे तुमची सर्व माहिती ऑटोमॅटिकली स्क्रीनवर येईल, ती तपासुन Save बटन दाबणे. 
  • डॅशबोर्डमध्ये Proceed Application च्या ऑपशनवरती क्लिक करून पुढे जावा. 
  • त्यानंतर तुमच्या समोर योजनेचा संपूर्ण फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्त्ता, पालकांचा पत्ता, शिक्षणाची माहिती, मागील झालेले शिक्षण आणि राहणार असलेला हॉस्टेलचे तपशील सर्व नीट वाचून भरून घेणे. 
  • त्यानंतर पोर्टलमध्ये विचारलेले सर्व कागदपत्रे 250 kb साईजच्या PDF फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करणे. 
  • पुढे Preview & Submit च्या बटनावर क्लिक करून सर्व माहिती व्यवस्थित वाचून Apply to Proceed करणे. 
  • डॅशबोर्डमधून फॉर्म आणि भरलेली पावती डाउनलोड करून प्रिंट घ्या. 
  • ती प्रिंट तुमच्या जवळील समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करायची आहे.

Read More: