SVAMITVA Yojana Objectives: स्वामीत्व योजनेचा उद्देश ग्रामीण क्षेत्रामधील नागरिकांचे जमिनीवरून होणारे वाद कमी करणे आणि जमिनीचे व्यवहार योग्यरित्या पार पाडण्यास मदत करणे आहे. त्याचसोबत योजना कधी सुरु झाली? याची सुद्धा माहिती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
स्वामीत्व योजना कधी सुरु करण्यात आली?
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे स्वामीत्व योजना 24 एप्रिल, 2020 रोजी सुरु करण्यात आली. ज्याच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामध्ये विकास उघडून आणण्यासाठी मदत केली जाते.
योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रा ज्या नागरिकांचे जमिनी आहेत, त्यांचे सर्वे केले जातात. त्याचसोबत ड्रोनसारख्या नवीन यंत्रणा वापरून प्रत्येक लाभार्थ्यांच्या जमिनीचे मॅपिंग केले जाते. मॅपिंग केल्यानंतर कोणत्या नागरिकांच्या नावाने किती जमीन नावावर आहे? त्याची संपूर्ण माहिती मिळते.
योजने अंतर्गत समावेश केलेल्या ग्रामीण विभागातील नागरिकांना मॅपिंग प्रकिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासनातर्फे प्रॉपर्टी कार्ड प्रदान केले जाते. ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थी व्यक्तीचे आपले युनिक नंबर कार्डमध्ये दिला जातो.
SVAMITVA Yojana चे उद्देश खालीलप्रमाणे
- भारत देशामध्ये ग्रामीण क्षेत्रात राहत असलेल्या नागरिकांना सामाजिक व आर्थिक दृष्टया मजबूत बनविणे.
- नागरिकांचे जमिनीचे मॅपिंग करून त्यांना जमिनीची अचूक माहिती पुरविणे.
- ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमधील जमिनीची मोजणी करण्यासाठी नवीन यंत्रणांचा वापर करणे.
- नवीन यंत्रणाचा साहय्याने त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून जमिनीचे मोजणी व इतर माहिती एकत्रित करणे.
- टेक्नॉलॉजीप्रमाणे मिळालेल्या जमिनीच्या माहितीला प्रॉपर्टी कार्डमध्ये आणणे.
- प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून योजनेमध्ये सहभागी असलेल्या नागरिकांना कर्ज मिळण्यास मदत होईल.
- त्याचप्रमाणे ग्रामीण क्षेत्रामधील जमिनीचे रिकॉर्ड योग्यरित्या घेऊन नवीन-नवीन प्रकल्पांसाठी प्लॅनिंग करणे.
- या योजनेच्या मदतीने गावागावांमध्ये जमिनी घेऊन होणारे वाद-विवाद कमी करून घेणे.
Read More: