Surakshit Matritva Aashwasan Yojana 2024: गर्भवती महिलाना मिळणार फ्री डिलिव्हरी उपचार, असा घ्या लाभ

Surakshit Matritva Aashwasan Yojana 2024: भारत देशामधील गरोदर महिनाला आरोग्य सुरक्षा सेवा प्रदान करण्यासाठी सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांसाठी विविध प्रकारच्या आरोग्य सेवा व आर्थिक मदत केंद्र सरकारच्यामार्फत देण्यात येते. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

मागील लेखामध्ये Janani Suraksha Yojana संबंधित जाणून घेतले, त्यामध्ये फक्त ग्रामीण आणि अनुसूचित जाती व जमाती वर्गामधील गर्भवती महिलांना आरोग्य संबंधित आर्थिक लाभ दिला जात होता. परंतु SUMAN Yojana ही भारत देशामधील सर्व गरोदर महिलांना आरोग्य विषयी लाभ मिळवून देण्यासाठी सुरु केली आहे. 

आजच्या आपल्या लेखाच्या माध्यमातून या योजनेसंबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये योजना काय आहे? त्यांचे स्तंभ, त्याचे उद्देश, त्यामधून होणारे फायदे, पात्रतेच्या अटी, आवश्यक असणारी कागदपत्रे व रजिस्ट्रेशन अशा सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत आर्टिकल वाचा. 

Surakshit Matritva Aashwasan Yojana in Marathi

SUMAN Yojana चे संपूर्ण अर्थ सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना असा आहे. केंद्र सरकाने या योजनेची सुरुवात 10 ऑक्टोबर, 2019 रोजी गर्भवती महिलांना आरोग्य सुविधा प्रदान करण्यासाठी केली. या योजनेचे संपूर्ण अंमलबजावणी करायचे काम Ministry of Union Health and Family Welfare हे विभाग करते. 

केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांच्या डिलिव्हरी आधी व नंतर महिलेचे आणि बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी घेणार असे आश्वासन देत आहे. त्याचप्रमाणे देशभरातील सर्व गर्भवती महिलांच्या वेळे दरम्यान प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला विनामूल्य तपासणी केली जाते. तसेच प्रोग्रॅमच्या अंतर्गत महिलांना चांगल्या दर्जाचे व परवडणारे उपचार केले जाते. 

Pillars of Surakshit Matritva Aashwasan Yojana

केंद्र सरकारतर्फे सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना अंतर्गत आरोग्य सुविधा प्रदान करण्यासाठी स्तंभावरती आधारित प्रोगाम सुरु करण्यात आले आहेत, त्याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिली आहे. 

  • SUMAN योजनेच्या माध्यमातून महिलांचे आदर करणे. 
  • Mera Aspataal च्या माध्यमातून ग्राहकांचे फीडबॅक घेणे.
  • हॉस्पिटलमधील कोणत्याही समस्यांचे तक्रार 104 नंबरवर मांडणे. 
  • Maternal व Infant Death रिपोर्ट सादर करणे व त्यावरती रिव्हिव देणे. तसेच आर्थिक मदत पुरवणे. हॉस्पिटल व संस्थेला योग्य काम केल्यामुळे केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून SUMAN Champions Award सुद्धा प्रदान करते. 
  • तसेच योजने अंतर्गत Community Linkages व Support दिले जातो. 

Surakshit Matritva Aashwasan Yojana 2024 Overview

योजनेचे नावसुरक्षित मातृत्व आश्वासन योजना (SUMAN Yojana)
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
कधी सुरु झाली10 ऑक्टोबर, 2019 रोजी
कोणी सुरु केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
विभागकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार
उद्देशदेशामधील गरोदर महिलांना आरोग्य सुविधा पुरवून त्यांना संस्थात्मक डिलिव्हरीसाठी प्रोत्साहित करणे
लाभार्थीभारत देशामधील सर्व गर्भवती महिला
लाभचांगल्या दर्जाचे व परवडणारे आरोग्य सेवा
अर्ज पद्धतीऑफलाइन
अधिकृत वेबसाइटsuman.mohfw.gov.in

Surakshit Matritva Aashwasan Yojana Objective

केंद्र सरकारने सुरु केलेल्या सुरक्षित मातृत्व आश्वासन योजनाचे मुख्य उद्देश भारत देशामधील सर्व गर्भवती महिलांना योग्य व उच्च दर्जाचे उपचार प्रदान करून त्याचे आरोग्य सुरक्षित करणे आहे. जेणेकरून आपल्या भारत देशामधील बाल मृत्यू दर (IMR) व माता मृत्यू दर (MMR) कमी होण्यात मदत होईल. त्याचसोबत योजनेच्या माध्यमातून आई व बाळाचे जीव वाचविण्यात मदत होईल.

ग्रामीण क्षेत्रात आजही घरामध्ये डिलिव्हरी केली जाते, ज्यामुळे ते उपचार योग्य नसल्यामुळे बाळाला व आईला धोका जास्त प्रमाणात असतो. या समस्यां दूर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे योजनेच्या माध्यमातून संस्थात्मक उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. 

त्याचप्रकारे सर्व हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार, चांगल्या दर्जाचे उपकरणे व इतर गोष्टींवरती योजेनच्या अंतर्गत लक्ष दिले जाते. जेणेकरून आरोग्य सुविधा हॉस्पिटलमध्ये स्टॅंडर्ड लेवल असतील व उपचार व्यवस्थितरित्या होण्यात यश मिळेल. 

Surakshit Matritva Aashwasan Yojana Benefits 

  • सुरक्षित मातृत्व आश्वासन योजनाचे फायदे भारत देशामधील सर्व गरोदर महिलाना घेता येणार. 
  • या योजेनच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे लाभार्थी महिलांच्या बाळंतपणाच्या जन्मापूर्वी, जन्मानंतर व दरम्यान घेण्यात येणारी काळजी मोफत दिली जाते. 
  • तसेच जन्म घेतलेला बाळ आजारी असेल तर त्यांचीही हेल्थ संबंधित काळजी योजनेच्यामार्फत घेतली जाते. 
  • अत्यंत धोक्यात असलेल्या गर्भवती महिलांसाठी योजने अंतर्गत डिलिव्हरी प्लॅन तयार केले जाते व विशेष उपचार केले जाते. 
  • त्याचप्रमाणे योजनेच्या माध्यमातून सर्व हॉस्पिटलमधून महिलांना योग्य व स्टॅंडर्ड स्थराचे डिलिव्हरी उपचार देण्यात येतील यावर लक्ष दिले जाते. 
  • गर्भवतीच्या डिलिव्हरी नंतर 6 महिन्यापर्यंत बाळासाठी व आईसाठी मोफत केअर सुविधा उपलब्ध करून दिले जाते. 
  • तसेच आशा वर्कर अंतर्गत असलेल्या महिलांच्या माध्यमातून वॅक्सीन दिले जाते. 
  • त्याचप्रमाणे कोणतेही हॉस्पिटल किंवा संस्था योग्यरित्या काम करत असतील तर त्यांना केंद्र सरकारतर्फे IPledgeFor9 या नावाने Achievers Awards राज्य व जिल्हा स्थरावर प्रदान केले जाते. 
  • तसेच सुमन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार गरोदर महिलांच्या डिस्चार्जनंतर मोफत ट्रान्सपोर्ट सुविधा सुद्धा पुरवले जाते. 
  • हॉस्पिटल संबंधित तक्रार मांडण्यासाठी मेरा अस्पताल पोर्टल किंवा 104 नंबरवर कॉल करायची सुविधा दिली जाते. 
  • ब्लॉक लेव्हलच्या हॉस्पिटलची तक्रार 7 दिवसांमध्ये, जिल्ह्याच्या स्थरावरील 14 आणि राज्य स्थरावरील तक्रांरींसाठी 21 दिवसांमध्ये सोडविले जाते. 
  • योजने अंतर्गत जेव्हा महिलांचे महिन्याच्या 9 तारखेला रुटीन चेकअप केले जाते, तेव्हा त्याच्या आरोग्याच्या परिस्थितीनुसार काही स्टिकर दिले जाते. 
  • जर गर्भवती महिला धोक्याच्या खालील असेल तर हिरवा स्टिकर देतात आणि जर महिला जास्त धोक्यात असेल तर लाल स्टिकर दिले जाते. 
  • लाल स्टिकर देण्यात आलेल्या महिलांसाठी विशेष लक्ष देऊन उपचार केले जातात. त्याचप्रमाणे अशा महिलांना OT व इतर सुविधासुद्धा पुरवले जाते. 
  • केंद्र सरकारने हॉस्पिटलची सोयीसुविधा, गुणवत्ता व इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी LAQSHYA Program चालू केले आहेत. 
  • या योजनेच्या माध्यमातून पब्लिक हेल्थ अंतर्गत गर्भवती महिलांसाठी विनामूल्य डिलिव्हरी व C-Section सुविधा उपलब्ध करण्यात येतात. 

Surakshit Matritva Aashwasan Yojana Eligibility

महिलांना सुरक्षित मातृत्व आश्वासन योजनाची पात्रता जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या अटीनुसार पात्र असणे आवश्यक आहे. 

  • ज्या महिला SUMAN योजना अंतर्गत अर्ज करणार आहेत ते गर्भवती महिला असणे बंधनकारक आहेत. 
  • सहभागी होणाऱ्या महिला भारताचे स्थानिक रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • भारत देशामधील सर्व गरोदर महिला सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहेत. 
  • जन्मानंतर 0 ते 6 महिन्याच्या बाळांचा सुद्धा योजनेच्यामार्फत लाभ दिले जातो. 
  • ज्या महिला डिलिव्हरीनंतर आपल्या मुलांना दूध पाजत आहेत ते सुद्धा सहभाग घेऊ शकतात. परंतु फक्त 6 महिन्याच्या कालावधी पर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे. 

Surakshit Matritva Aashwasan Yojana Required Documents 

गर्भवती महिलांना अर्ज करताना सुरक्षित मातृत्व आश्वासन योजनांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. त्याच संपूर्ण कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे यादीनुसार देण्यात आली आहेत. 

  • गर्भवती महिलेचे पुरावे (हॉस्पिटलमधील पत्र) 
  • महिलेचे आधारकार्ड 
  • पॅनकार्ड 
  • ओळखपत्र (मतदान कार्ड/ड्रायविंग लायसन्स)
  • घरचा पत्ता (प्रॉपर्टी टॅक्स पावती/टेलेफोन बिल/चालू असलेलं पासपोर्ट) 
  • मोबाईल नंबर 

Surakshit Matritva Aashwasan Yojana Registration 

सुरक्षित मातृत्व आश्वासन योजनामध्ये नोंदणी करण्यासाठी महिलांना खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकियानुसार स्टेप बाय स्टेप अर्ज करावा लागेल. 

  • PM SUMAN Yojana अंतर्गत ऑफलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्या जवळच्या Civil हॉस्पिटला भेट द्यावी लागेल. 
  • हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डेस्कवरील कर्मचाऱ्यांना या योजने संबंधित संपूर्ण माहिती देणे. 
  • त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून योजनेचा अर्ज फॉर्म प्राप्त करून घेणे. 
  • अर्जाचा फॉर्म तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर आवश्यक असणारी संपूर्ण माहिती भरून घेणे. 
  • फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर लागणारी कागदपत्रे जोडून घेणे 
  • त्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याकडे फॉर्म व सर्व कागदपत्रे जमा करणे. 
  • हॉस्पिटलमधील कर्मचारी तुमचे फॉर्म तपासून घेतील. 
  • तुम्ही पात्र असाल तर योजनेमधील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. 
  • अशा पद्धतीने तुम्ही योजने अंतर्गत अर्ज करण्यास प्रकिया करू शकता. 
  • अर्ज करताना कोणत्याही समस्या आल्यास SUMAN वेबसाइट उघडून तक्रार मांडू शकता. 

निष्कर्ष 

या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Surakshit Matritva Aashwasan Yojana संबंधित संपूर्ण माहिती मार्गदर्शन केले. ज्यामध्ये सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कोणासाठी सुरु करण्यात आली? कोणाच्यातर्फे सुरु करण्यात आली? कोणते मंत्रालय यामध्ये सहभागी आहेत? योजनेचे उद्देश काय आहेत? कोणकोणते फायदे यामधून महिलांना दिला जातो? कोणत्या महिला पात्र असणार आहेत? अर्ज करताना महिलांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे? महिलांना योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करावे लागेल? तसेच योजनांसाठी कोणते पोर्टल तयार करण्यात आले? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली. 

तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गरोदर महिला असेल तर त्यांना आम्ही दिलेला हा लेख पाठवा आणि त्यांना लाभ घेण्यास मदत करा. तसेच अशाच योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करू शकता किंवा Telegram/WhatsApp चॅनेला जॉईन करू शकता. 

FAQs

सुरक्षित मातृत्व अश्वसन उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे?

या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारतामधील गरोदर महिलांना आरोग्य सेवा पुरवणे आहे. 

सुरक्षित मातृत्व म्हणजे काय?

सुरक्षित मातृत्व म्हणजे गर्भवती महिलांना हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या सर्व सुविधा योग्यरीत्या उपल्बध करू देणे. 

पीएम सुमन योजनाची सुरुवात कधी झाली? 

पीएम सुमन योजनेची सुरवात केंद्र सरकारने 10 ऑक्टोबर, 2019 रोजी केली होती. 

पुढे वाचा: