Sukanya Samriddhi Yojana Interest Rate 2024: जाणून घ्या, या वर्षीचे सुकन्या समृद्धी योजना व्याजदर 

Sukanya Samriddhi Yojana Interest Rate: आपल्या या आर्टिकलच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारने 2024 मध्ये सुकन्या सुमृद्धी योजनाचे व्याजदर  किती लावले आहे? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारताची आर्थिक व सामाजिक दृष्ट्या चांगली वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकार देशामधील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या पैसे बचत करण्यासाठी योजना घेऊन येत असतात. ज्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना फिक्स इनकम मिळण्यात मदत होते. 

आजच्या आपल्या लेखामध्ये अशाच उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे नाव सुकन्या समृद्धी योजना असे आहे. आपल्या लेखामध्ये आता योजनेच्या माध्यमातून किती व्याज दर लाभार्थ्यांना दिला जातो आहे? हे पाहणार आहोत, तर लेख शेवटपर्यंत पहा.

सुकन्या समृद्धी योजनाची माहिती 

या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने Beti Bachao Beti Padhao या मोहीम अंतर्गत केली होती. ज्यामध्ये देशामधील 18 वर्षाखालील लहान मुलींच्या नावाने गुंतवणूक केली जाते. जेणेकरून त्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिक्षणासाठी आणि लग्नासाठी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. 

या गुंतवणुकीमध्ये मुलीचे आई-वडील तिच्या नावाने SSY खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. मुलीच्या पालकांना गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 250 रुपये तर जास्तीत जास्त 1,50,000 रुपये रक्कम वर्षाला भरावी लागते. भरलेल्या रक्कमेवर व्याजदर लावला जातो, ज्यामध्ये लाभार्थ्यांना गॅरंटी रिटर्न भविष्यात मिळतो

सुकन्या समृद्धी योजनाचे व्याजदर 

केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक तिमाही योजनेचा व्याजदर तपासला जातो. त्यामध्ये योजनेचे इंटरेस्ट रेट बदलत नाही. पालकांनी आपल्या मुलींसाठी गुंतवलेल्या रक्कमेवर 2024 मध्ये 8.2% व्याजदर चालू आहे.

Read More: