Stand Up India Yojana 2024: केंद्र सरकारतर्फे स्टॅन्ड अप इंडिया योजना देशामधील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशामधील अनुसुचित जाती व जमातींच्या नागरिकांना तसेच स्त्रियांना व्यवसाय सेटअप करण्यासाठी बँकेतर्फे लोन उपलब्ध करून दिले जाते.
तुमचे योजनामीडियामध्ये स्वागत आहे. मागील काही आर्टिकल्समध्ये आम्ही सांगत आलो आहे की, नवीन बिजनेस सेटअपसाठी लागणाऱ्या रक्कमेची आवश्यकता असते, ती सरकारी योजनेच्या माध्यमातून कसे पूर्ण करू शकतो? यासाठी आम्ही मागील आर्टिकल्समध्ये SBI स्त्री शक्ती योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना यामधून लोन प्राप्त करून कसा फायदा घेऊ शकता? हे सांगितले.
देशामधील नागरिकांना बिजनेस स्टार्टअपमध्ये आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने आणखी एक इंटरेस्टिंग योजना सुरु केली आहे, ती म्हणजे Stand Up India. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून 10 लाख ते 1 कोटी रुपयांचे लोन बँकेतर्फे उपल्बध करून दिले जाते.
तर आजच्या आर्टिकलमध्ये स्टॅन्ड अप इंडिया योजना संबंधित संपूर्ण माहिती बघणार आहोत. या योजनेमधून कशाप्रकारे लोन घेऊ शकतो? यासाठी पात्रतेच्या अटी काय आहते? कोणाला लोन दिले जाणार? कुठून लोन मिळणार? कोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? त्याचसोबत लोकांचे समस्या असतात की, लोनसाठी अर्ज केले परंतु ते रिजेक्ट केले. तर कोणती अशी कारणे असतात, ज्यामुळे एप्लिकेशन नाकारले जातात? कशाप्रकारे लोनसाठी यशस्वीरित्या ऑनलाइन अर्ज करू शकतो? आणि कुठे करू शकतो? याबद्दलची संपूर्ण माहिती लेखातून जाऊन घेणार आहोत.
नेहमीप्रमाणे हा सुद्धा लेख माहितीपूर्ण असेल आणि आम्ही प्रयत्न करतो की, तुमच्यापर्यंत उपयुक्त आणि संपूर्ण माहिती दिली जाईल. हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुमच्या बिजनेसमध्ये काही फायदे होतील.
Stand Up India Yojana in Marathi
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांनी स्टॅन्ड अप इंडिया योजनाची सुरुवात 5 एप्रिल, 2016 रोजी केली. या योजने अंतर्गत देशामधील अनुसुचित जाती (SC) व जमाती (SC) समुदायातील नागरिकांना आणि महिलांना उद्योगासाठी आर्थिक सपोर्ट मिळवा यासाठी सुरु करण्यात आली. जेणेकरून देशामधील नागरिकांना रोजगार निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध होईल आणि देशाची आर्थिक वाढ होण्यास चालना मिळेल.
ही योजना नवीन नवीन उद्योजकांना आपले बिजनेस सेटअप टाकण्यासाठी मदत व्हावी यासाठी चालू करण्यात आलेली आहे. जसे तुम्ही एक नवीन उद्योजक आहात आणि तुम्ही नवीन फ्रेश व्यवसाय चालू करत आहात. तर या केसमध्ये बिजनेस स्टार्टअप चालू करण्यासाठी सरकार तुम्हाला 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा लोन उपलब्द करून देतात.
फक्त यामध्ये अट आहे की, तुमचा प्रोजेक्ट नवीन असला पाहिजेत. ज्याला आपण ग्रीन फील्ड व्यवसाय म्हणून ओळखतो. यामधून अस्थित्वात असलेल्या बिजनेससाठी लोन दिले जात नाही. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करत असाल, तर तुमच्यासाठी ही योजना इंटरेस्टिंग असेल.
Stand Up India Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | Stand Up India Scheme |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
लॉन्च कधी केली | 5 एप्रिल, 2016 रोजी |
लॉन्च कोणी केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी |
विभाग | आर्थिक सेवा मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | देशातील SC व ST समुदाय आणि महिला वर्गाना उद्योगासाठी आर्थिक मदत करणे |
लाभार्थी | अनुसूचित जाती व जमातीमधील नागरिक व महिला |
लाभ | 10 लाख ते 1 कोटी रुपयांचे लोन |
अर्ज पद्धत | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | standupmitra.in |
What is Stand Up India Yojana?
स्टॅन्ड अप इंडिया ही योजना भारत सरकारने खास महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी 2016 साली सुरु केली. या योजनेच्या मदतीने सरकार अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना आणि महिलांना 10 लाख ते 1 करोड पर्यंतचा लोन उपलब्ध करते. या योजनेच्या माध्यमातून मिळणारी लोन रक्कम आपल्या बिजनेसमध्ये लावून चांगला रोजगार करू शकतात.
या योजनेच्या अटीनुसार एका बँकेतील ब्रांचने कमीत कमी दोन व्यवसायीक प्रकल्पासाठी फंडकरावे लागते. ज्यामध्ये एक SC व ST समाजातील आणि एक महिला वर्गातील नागरिकांना दिले जाते.
एक महत्त्वाची गोष्ट माहित असणे गरजेचे आहे, या मिळलेल्या लोन रक्कमेचे आपल्या वैयक्तिक गोष्टींसाठी वापर करू शकत नाही. फक्त व्यवसाय सुरु करण्यासाठी या पैश्यांचा वापर करू शकता. कर्ज देणारी बँक तुमच्या बँक खात्यामधील व्यवहाराची पूर्ण हिस्टरी ठेवत असते.
हे लोन रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जात नाही, तर तुम्हाला बँकेकडून RuPay Card दिले जाते. या कार्डच्या मदतीने बिजनेससाठी लोनची अमाऊंट खर्च करू शकता. जेव्हा तुम्ही यामध्ये अर्ज करून तुम्ही लाभार्थी होता, तेव्हा सरकार लोन सोबत प्री लोन ट्रेनिंगसुद्धा प्रदान देते, ज्यामध्ये Marketing, Factoring आणि Facilitating लोनबद्दल दिले जाते.
Stand Up India Yojana Aim
केंद्र सरकारने सुरु केलेल्या स्टॅन्ड अप इंडिया योजनाचे मुख्य उद्देश महिला बिजनेस स्टार्टअपसाठी आर्थिक मदत मिळवून देणे आणि देशाची इकॉनॉमी वाढविणे. या योजनाच्या मदतीने स्त्रिया स्वतंत्रपणे व्यवसाय सुरु करतील आणि आत्मनिर्भर राहण्यात मदत होईल.
सरकारतर्फे मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे महिलांना आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येईल आणि पुरुषांसोबत पाऊले टाकत बिजनेससुद्धा करण्यात पुढे राहतील.
Stand Up India Yojana Benefits
- स्टॅन्ड अप इंडिया योजनेचे फायदे अनुसुचित जाती व जमातीमधील लोक आणि महिला वर्ग घेऊ शकतो.
- या योजनेच्या माध्यमातून महिला आपला बिजनेस स्टार्टअप करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
- केंद्र सरकारतर्फे लाभार्थींना 10 लाख रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत लोन अमाऊंट दिली जाते.
- लाभार्थींना जेवढेपण Schedule Commercial बँकेतून मिळू शकेल.
- त्याचप्रमाणे लाभार्थी त्यांच्या स्टेटनुसार मुख्य जिल्हा व्यवस्थापकद्वारे सुद्धा लोनसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.
- या योजनेच्या अंतर्गत मिळणारे लोनचे व्याज दर हे RBI Guidelines च्या हिशोबाने नॉमिनल असते.
- लाभार्थीना मिळणारे लोन हे टर्म लोन किंवा वर्किंग कॅपिटल लोनसुद्धा असू शकते.
- बँकेमधून लाभार्थींच्या एकूण प्रकल्पाच्या खर्चाचे 75% लोन प्राप्त होते.
- सरकार CGFSIL च्या अंतर्गत लोनसाठी गॅरेंटी घेते, त्यामुळे लाभार्थीना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा ठेव देण्याची गरज लागत नाही.
- यामध्ये मिळणाऱ्या लोनचा कार्यकाळ 7 वर्षाचा असतो आणि स्थगिती कालावधी ही 18 महिन्यांची असते.
Stand Up India Yojana Eligibility
सरकारने सुरु केलेल्या स्टॅन्ड अप इंडिया योजनाची पात्रतेच्या अटीनुसार पात्र असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी खालीलप्रमाणे अटी दिलेल्या आहेत.
- या योजनेमध्ये फक्त देशामधील अनुसूचित जाती/जमातीचे लोक आणि महिला वर्ग अर्ज करू शकतात.
- या योजने अंतर्गत सहभागी होणारी महिला किंवा लोक 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील असणेया आवश्यक आहे.
- जे नागरिक यामध्ये अर्ज करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी मागील कोणतेही लोन अमाऊंट चुकवलेली नसावी.
- जर तुमची एखादी कंपनी असेल तर या केसमध्ये ST/SC/स्त्री यामधील असून 51% कंपनीचे shares असणे गरजेचे आहे.
- तुमचे बिजनेस manufacturing, services आणि trading संबंधित क्षेत्रामध्ये असेल तरच लोन मिळेल.
- नागरिकांना शेतीच्या क्रियांसाठी लोन दिले नाही जाणार, परंतु तुम्ही शेती संबंधित क्रियांसाठी अर्ज करू शकता.
Stand Up India Yojana Required Documents
अर्ज करणाऱ्या व्यक्तीसाठी स्टॅन्ड अप इंडिया योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे. त्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे.
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- वार्षिक उत्पन्न दाखला
- वोटर आयडी
- पासपोर्ट
- रहिवासी प्रमाणपत्र (इलेक्ट्रिक बिल/ टेलेफोन बिल)
- जातीचा दाखला
- Good Project Report
- बिजनेसच्या पत्त्याचा पुरावा (Rent Agreement)
- कंपनीचे कागदपत्रे जसे (Incorporation Certificate, Partnership Deed, ITR (Individual), प्रोजेक्ट बॅलन्स शीट, PCB License)
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
Stand Up India Yojana Online Apply
- महिलांना स्टॅन्ड अप इंडिया अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइटला जाणे.
- त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल, त्यामधील Apply for a Loan च्या लिंकवर क्लिक करणे.
- निवड केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल.
- त्यामध्ये तुम्हाला तीन कॅटेगरी विचारली जातील जसे New Entrepreneur/ Existing Entrepreneur/Self Employed Professional त्यापैकी तुमच्यानुसार निवडणे.
- निवडून झाल्यानंतर तुमचे नाव, ई-मेल आयडी व मोबाईल नंबर टाकणे.
- त्यानंतर ओटीपी जनरेटच्या बटनावर क्लिक करणे आणि लॉगिन करणे.
- लॉगिन केल्यानंर तुमचे मोबाईल नंबर टाकून ओटीपीसाठी विनंती करणे.
- त्यानंतर मोबाईलमध्ये आलेला ओटीपी टाकून नेक्स्ट करणे.
- नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल.
- त्या नवीन पेजमध्ये योजनेचा फॉर्म दिसेल.
- त्या फॉर्ममध्ये विचारले गेलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून घेणे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर लागणारे कागदपत्रे अपलोड करणे.
- सगळंकाळी झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करणे.
- अशाप्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
Stand Up India Yojana Rejection Reasons
- जर तुमचे बिजनेस प्रोजेक्ट रिपोर्ट चांगले नसतील तर बँक लोन रिजेक्ट करते. त्यामुळे योग्यरीत्या प्रोजेक्ट रिपोर्ट बनविणे महत्त्वाचे आहे.
- जर बँकेला कोणत्याही प्रकारचे स्किल्सची कमी वाटली तर बँक लोन रद्द करते. यासाठी तुम्हाला तुमचे स्किलसेट वाढवणे आवश्यक आहे.
- काही वेळेला बँकेमधील कर्मचारी जबरदस्ती उशीर करतात किंवा कोणतेही कागदपत्रे हरवणे यामुळे रिजेक्ट होऊ शकते. यासाठी उपाय आहे तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे. जेव्हा ऑनलाइन एप्लिकेशन करतो, तेव्हा पुरावा असतो. त्याचसोबत, अर्जाचे स्टेटससुद्धा पाहू शकता.
FAQs
स्टँड अप इंडियासाठी किती सबसिडी?
या योजनेसाठी लाभार्थीना ७५% सबसिडी दिली जाते.
स्टँड अप इंडिया योजना कधी सुरू झाली?
ही योजना केंद्र सरकारने ५ एप्रिल, २०१६ रोजी सुरु होती.
स्टँड अप इंडिया योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेसाठी अनुसूचित जाती व जमातीचे लोक आणि महिला पात्र आहेत.
पुढे वाचा: