SBI Stree Shakti Yojana: केंद्र सरकारने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सहकार्य करून देशामधील महिलांना आर्थिक स्वरूपात मजबूत बनविण्यासाठी SBI स्त्री शक्ती योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशामधील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात लोन उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून भारतातील स्त्रिया स्वतःचा व्यवसाय करून आत्मनिर्भर बनू शकतील.
केंद्र सरकार देशामधील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अशाच प्रकारचे निरनिराळ्या योजना वेळोवेळी सुरु करत असतात. महिलांना आपला चांगला रोजगार निर्माण करून आर्थिक स्थिती चांगली व्हावी तसेच देशामध्ये व्यवसाय अधिकतम वाढण्यासाठी सरकार महिलांना आर्थिक मदत उपलब्ध करून देत आहेत. त्याचप्रमाणे महिलांना आपला व्यवसाय सुरु करताना आर्थिक समस्या न होण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
जर तुम्ही सुद्धा व्यवसाय सुरु करून रोजगार निर्माण करायचा विचार करत आहात पण लोन मिळत नाहीये तर सरकारच्या या योजनेमध्ये लवकरात लवकर अर्ज करून लाभ घ्या. यासाठी आम्ही दिलेला लेख संपूर्ण शेवटपर्यंत पहा. यामध्ये आम्ही तुम्हाला स्त्री शक्ती योजना संबंधित महत्त्वपूर्ण माहिती, त्यांचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.
SBI Stree Shakti Yojana in Marathi
आपल्या देशातील सगळ्यात मोठी बँक State Bank of India सोबत केंद्र सरकारने सहकार्य करून महिलांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी लोनच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळावी यासाठी SBI स्त्री शक्ती योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत अर्ज करून लाभ घेणाऱ्या महिलांना व्यवसाय चालू करण्यासाठी बँकेतर्फे 25 लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत सहकार्य केल्यामुळे महिलांना कमी व्याज दारात लोन दिले जाते.
जर महिला योजनेच्या माध्यमातून उद्योगासाठी 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज घेत असतील तर त्यांना त्यावर फक्त 0.5% व्याज दर द्यावा लागेल. या योजने अंतर्गत जर महिला व्यवसायासाठी 5 लाखांपर्यंतचे लोन घेत असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचे गॅरेंटी देण्याची गरज लागत नाही. देशामधील स्त्रियांना स्त्री शक्ती योजनामध्ये अर्ज करून कर्ज मिळविण्यासाठी बिजनेसमध्ये 50% ची भागीदारी असणे आवश्यक आहे. या योजनेच्यामार्फत स्त्रिया आपल्या बिजनेससाठी कमीत कमी 50,000 रुपये ते जास्तीत जास्त 25,00,000 रुपयांपर्यंतचे कर्ज प्राप्त करू शकतात.
SBI स्त्री शक्ती योजनाची माहिती 2024
योजनेचे नाव | SBI Stree Shakti Yojana |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
कोणी सुरु केली | केंद्रातील सरकारने |
कधी सुरु केली | 2024 |
उद्देश | देशातील महिलांना बिजनेसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | भारत देशामधील महिला वर्ग |
लाभ | 25 लाखांपर्यंत लोन |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
SBI Stree Shakti Scheme चे उद्देश
केंद्र शासनाने सुरु केलेल्या SBI स्त्री शक्ती योजनाचे मुख्य उद्देश भारत देशामधील महिलांना कमी व्याज दारात बिजनेस लोन प्राप्त करून देणे आहे. त्याचप्रमाणे महिलांना आपला व्यवसाय सुरु करून त्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करून आत्मनिर्भर व सक्षम राहतील. या मिळणाऱ्या कर्जातून महिला योग्यरीत्या कमाई करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण चांगल्या प्रकारे करू शकते. त्याचसोबत आपल्या देशाचे इकॉनॉमी वाढविण्यास मदत करू शकतील.
तसेच कोणताही व्यापार सुरु करताना सर्वात जास्त कठीण असते, ते म्हणजे व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल आणि त्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. यासाठी स्त्रियांना आपला स्वतःचा व्यापार चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, त्यामुळे सरकारने या योजनाची सुरुवात केली. प्रत्येक राज्यामधील स्त्रिया या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लोनमधून आपला स्वतःचा व्यवसाय उभारू शकते आणि आत्मनिर्भर राहून स्वतंत्रपणे आपले आयुष्य जगू शकते.
SBI Stree Shakti Yojana चे फायदे
- केंद्र सरकारच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे देशभरातील महिलांना व्यवसायासाठी लोनची सुविधा दिली जात आहे.
- या योजनेच्या अंतर्गत व्यवसाय करू पाहणाऱ्या स्त्रियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कर्ज उपलब्ध करून जातो.
- महिलांना आपला व्यापार चालू करण्यासाठी 50 हजार रुपये ते 25 लाख रुपये कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे दिले जाते.
- स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे मिळणाऱ्या कर्जाचा व्याज दर हा वेगवेगळ्या कॅटेगरी आणि बिजनेसनुसार ठरतो.
- तसेच महिलांना बँकेमधून 2 लाखांपेक्षा अधिक कर्जाच्या रकमेवर फक्त 0.5 टक्के व्याज दर द्यावा लागेल.
- या योजनेमधून स्त्रियांना 5 लाखांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी कोणत्याही प्रकारची गॅरेंटी द्यावी लागत नाही.
- देशातील ग्रामीण व शहरी भागातील स्त्रिया छोट्या – छोट्या व्यवसायासाठी अर्ज करून लोन प्राप्त करू शकतात.
- इतर बँकांच्या तुलनेत योजनेतून कमी व्याज दर असल्या कारणाने अर्ज करून मिळालेल्या कर्जातून अधिक पैसे वाचण्यात मदत होईल.
SBI स्त्री शक्तीमध्ये समावेश असलेले व्यवसाय
- कपडे तयार करायचा उद्योग
- कृषी संबंधित जुडलेले उद्योग
- दुग्ध व्यवसाय
- पापड बनविण्याचा व्यवसाय
- डिटर्जंट आणि 14 सी साबण
- कुटीर उद्योग जसे अगरबत्ती व मसाले तयार करणे
- कॉस्मॅटिक वस्तू किंवा ब्युटी पार्लरचा व्यवसाय
SBI Stree Shakti Yojana ची पात्रता
एसबीआय स्त्री शक्ती योजना अंतर्गत महिलांना अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या माहितीनुसार पात्र असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारी महिला भारत देशामधील मूळची स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- व्यवसाय चालू करणारी महिला 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची असणे
- या योजनेतून स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मिळणारी लोनची रक्कम प्राप्त करण्यासाठी महिला आपल्या व्यवसायमधील 50 टक्के भागीदारी असणे गरजेचे आहे.
- देशामधील ग्रामीण व शहरी क्षेत्रामधील महिलांना योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदार महिलांना छोटा व्यवसाय चालू करण्यासाठी सुद्धा या योजनेचा फायदा घेता येऊ शकतो.
- अर्जदार महिला आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने या योजनेच्या माध्यमातून कर्ज काढू शकत नाही.
- या योजनेमध्ये अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रेसोबत असणे.
- अर्जदार महिलेचे आधारकार्ड बँक खात्यासोबत जोडलेले असणे.
SBI Stree Shakti Yojana चे आवश्यक कागदपत्रे
अर्जदार महिलांना अर्ज करताना SBI स्त्री शक्ती योजनाचे आवश्यक कागदपत्रे सोबत असायला पाहिजेत. ते खालील प्रमाणे यादीनुसार सांगितले आहे.
- अर्जाचे फॉर्म
- अर्जदार महिलेचे आधारकार्ड (बँक लिंक असणे)
- ओळखपत्र
- महिलेचे पॅनकार्ड
- व्यवसाय प्लॅन व नफा तोट्याचे विवरण
- रहिवासी दाखला
- व्यवसायाचे मालकी हक्क असलेले प्रमाणपत्र
- बँक स्टेटमेंट्स
- बँक पासबुकचे पाहिले पान
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- मागील दोन वर्षाचा आयटीआर
- जर व्यवसाय पार्टनर असतील तर त्यांचे कागदपत्रे
SBI Stree Shakti Yojana साठी अर्ज कसा करायचा?
कोणत्याही महिलांना अर्ज करून लोन प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या SBI स्त्री शक्ती योजनामध्ये रजिस्ट्रेशन करायची प्रकिया खालीलप्रमाणे दिलेली आहेत त्यानुसार स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
- सर्वात प्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रांचमध्ये जावे लागेल.
- तुम्ही बँकेच्या ब्रांचमध्ये गेल्यानंतर तेथील अधिकारीसोबत संबंधित योजनाबद्दल लोन प्राप्तीसाठी चर्चा करून घ्या.
- चर्चा दरम्यान अधिकाऱ्याकडून तुम्हाला हवी असलेली संपूर्ण माहिती व काही शंका असतील तर जाणून घ्या.
- त्यानंतर अधिकाऱ्याकडून तुम्हाला लोन अर्ज करण्यासाठी फॉर्म प्राप्त करून घ्या.
- तुम्हाला मिळालेल्या अर्जाच्या फॉर्ममध्ये विचारले गेलेली संपूर्ण माहिती ध्यानपूर्वक भरून घ्या.
- फॉर्ममधील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक असणारे संपूर्ण कागदपत्रे सोबत जोडून घ्या.
- भरलेला फॉर्म व कागदपत्रे जमा करण्याआधी नीट तपासून घ्या.
- त्यानंतर पुन्हा फॉर्म व कागदपत्रे घेऊन बँकेमधील अधिकाऱ्याजवळ जमा करून घ्या.
- बँक अधिकारी तुमचे अर्जाचे फॉर्म व कागदपत्रे तपासून घेईल आणि पुढे पाठवतील.
- जर तुम्ही लोनसाठी पात्र ठरलात तर तुम्हाला मान्यता दिली जाईल.
- मान्यता मिळाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 24 ते 48 तासांमध्ये लोनची रक्कम पाठविली जाईल.
- अशाप्रकारे तुम्ही या योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन पूर्ण करून अर्ज करून लाभ मिळवू शकता.
निष्कर्ष
अशाप्रकारे आम्ही या लेखातुन SBI Stree Shakti Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितली. यामध्ये आम्ही योजना काय आहे? का चालू करण्यात आली? कधी चालू करण्यात आली? कोणी चालू केली? कोणासाठी चालू केली? चालू करण्यामागचे उद्दिष्टये काय होती? यामध्ये फायदे काय आहेत? अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे? कोणत्या व्यवसायांचा समावेश आहे? अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? तसेच कशा प्रकारे अर्ज करून लाभ मिळवू शकतो? या संदर्भात तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केले.
तुम्ही महिला आहात आणि तुम्हाला सुद्धा स्वतःचा व्यवसाय चालू करून चांगला रोजगार निर्माण करायचा आहे. या योजनेत अर्ज करून लोन प्राप्त करायचे असल्यास आम्ही दिलेल्या या संपूर्ण लेखाच्या मदतीने अर्ज करून लाभ मिळवा. आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या कुटुंबातील व्यवसाय करू पाहणाऱ्या महिलांना पाठवून त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी मदत करा.
अशाच उपयुक्त आणि फायदेशीर योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून अपडेट्स मिळवू शकता आणि नवीन योजनांसाठी आमच्या वेबसाईटला Subscribe करू शकता.
FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
स्त्री शक्ती योजना काय आहे?
ही योजना महिलांना व्यवसाय करण्यासाठी लोन मिळवून देण्यासाठी आहे, जी केंद्र सरकाने स्टेट बँक ऑफ इंडियासोबत सहकार्य करून चालू केली आहे.
महिलांना किती लोन मिळू शकते?
या योजनेच्या माध्यमातून महिला SBI बँकतर्फे कमीत कमी 50 हजार ते जास्तीत जास्त 25 लाख रुपयांपर्यंत लोन प्राप्त करू शकतात.
शक्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
शक्ती योजनेसाठी अर्जदार महिलेचे आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, व्यवसाय मालकी हक्क प्रमाणपत्र, बँक स्टेटमेंट, 2 वर्षाचा आयटीआर, बँक पासबुक आणि फोटो आवश्यक कागदपत्रे आहेत.
पुढे वाचा: