Sansad Adarsh Gram Yojana 2024: संसद सदस्यांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने संसद आदर्श ग्राम योजना सुरु केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून गावांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी पार्लमेंटमधील सदस्यांचे निवड केले जाते आणि त्यांच्यानुसार ग्रामीण क्षेत्रामध्ये विकास करण्यात येते.
संसद म्हणजे MP ज्याला मेम्बर ऑफ पार्लमेंट असेही म्हटले जाते, ज्यामध्ये राज्य सभा व लोकसभामधील जे सदस्य असतात, त्यांना संसद सदस्य म्हणून ओळखले जातात. या सदस्यांना योजनेच्या माध्यमातून गावांची होलिस्टिक विकास घडवून आण्यासाठी निवड केली जाते. जेणेकरून ग्रामीण क्षेत्रामधील नागरिकांना विविध सुविधांचा लाभ घेता येईल आणि देश प्रगतीच्या मार्गाने पाऊल टाकेल.
आज आपल्या लेखातून संसद आदर्श ग्राम योजनाची संपूर्ण जाणून घेण्यास मदत मिळेल. ज्यामध्ये आम्ही योजना काय आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? त्याची अंमलबजावणी कशी होते? त्यामध्ये कशा प्रकारे खर्च केला जातो? कोणकोणत्या पिलर्सचा समावेश करण्यात आला आहे? कशा प्रक्रारे गावांची सुधारणा करण्यात येणार? त्यामधून गावकऱ्यांना कोणते फायदे मिळणार? आणि गावांचे समावेश करण्यासाठी कोणती पात्रता असणार? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत आर्टिकल वाचा.
Sansad Adarsh Gram Yojana in Marathi
केंद्र सरकारने संसद आदर्श ग्राम योजनाची सुरुवात जय प्रकाश नारायण यांच्या जंयती दिवशी 11 ऑक्टोबर, 2014 रोजी करण्यात आली होती. या योजने अंतर्गत समन्वय साधण्याचे काम व देखरेख करण्याचे कार्य ग्रामीण विकास मंत्रालय करते, जी या योजनेची नोडल मिनिस्ट्री आहे.
SAGY चा पूर्ण अर्थ Sansad Adarsh Gram Yojana असा होतो. या योजनेच्या माध्यमातून संसद सदस्यांना आपल्या त्यांच्या अंतर्गत असलेल्या ग्रामीण क्षेत्रामधील गावाचे निरीक्षण करून त्या गावांना आदर्श ग्राम गाव म्हणून तयार करावे लागते. निवडलेल्या गावांमध्ये म्हणजेच एका प्रकारे दत्तक घेतलेले गावात आर्थिक व सामाजिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे लागते.
Sansad Adarsh Gram Yojana Targets for MP
केंद्र सरकारच्या माध्यमातून संसदेमधील सदस्यांना ग्रामीण क्षेत्रांचे विकास करण्यासाठी काही लक्ष्य दिले आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.
- सुरुवातीला केंद्र सरकारने सदस्यांना एकूण 8 गावांना आदर्श ग्राम म्हणून तयार करण्याचे निर्देश दिले.
- ज्यामध्ये संसदेमधील सदस्यांना 2016 व्या वर्षांमध्ये एका गावाला आदर्श ग्राम गाव म्हणून तयार करणे.
- 2019 च्या वर्षापर्यंत सदस्यांच्यामार्फत योजनांची मदत घेत 2 गावांचे विकास करणे आवश्यक आहेत.
- बाकीचे राहिलेले 5 गावे 2024 पर्यंत विकसित करून त्यांना आदर्श ग्राम गाव करणे हे मुख्य लक्ष्य देण्यात आले.
Sansad Adarsh Gram Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | संसद आदर्श ग्राम विकास योजना (SAGY) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु करण्यात आली | 11 ऑक्टोबर, 2014 रोजी |
कोणी सुरु केली | केंद्र सरकारने |
विभाग | ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | संसद सदस्यांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रांमधील गावांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे |
लाभार्थी | भारत देशामधील ग्रामीण क्षेत्र |
लाभ | विविध योजनांच्या मदतीने गावांमध्ये सुधार करून आदर्श ग्राम गाव तयार होणार |
अधिकृत वेबसाइट | saanjhi.gov.in |
Sansad Adarsh Gram Yojana Objectives
केंद्र सरकारने सुरु केलेल्या संसद आदर्श ग्राम योजनाचे मुख्य उद्देश ग्रामीण क्षेत्रातील गावांचा सामाजिक व आर्थिक दृष्टया विकास घडवून आणणे आहे. ज्यासाठी केंद्र सरकार संसद सदस्यांना गावांची निवड करून विकास घडविण्यासाठी मदत करतात. जेणेकरून गावाला आदर्श ग्राम गाव तयार करण्यासाठी मदत होते.
केंद्र सरकारतर्फे संसद सदस्यांना रक्कम दिली जाते, ज्यामधून विकास करणे व पैशांचा योग्य वापर होणे हे उद्दिष्टे आहेत. ज्यामध्ये निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमधील गावांचा विकास करणे, मानवी विकासामध्ये वाढ होणे, गावांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, अधिकार व हक्काची प्राप्ती करणे आणि असमानता कमी करणे हे मुख्य ध्येय केंद्र सरकारचे आहेत.
Village Development Factors
- समाजातील नागरिकांना एकत्र उभे राहून समाजाचा प्रेरित विकास करून घेणे.
- खेडेगावाला विकसित करण्यासाठी कोणती गरज आहे? आणि त्यांची विकास आधारित मागणी किती व कोणत्या आहेत? यावर अवलंबून असते.
- खेडेगावाचा लोकसहभागातून विकास करून आणणे.
Pillars of Sansad Adarsh Gram Yojana
संसद आदर्श ग्राम योजनाचे 8 स्तंभ आहेत, जे गावाचा विकास करण्यासाठी वापरले जातात. त्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे.
Personal Development
ग्रामीण क्षेत्रामधील नागरिकांचा वैयक्तिक विकास करण्यासाठी स्वच्छता व वर्तन विषयी शिकवण दिली जाते. त्याचप्रमाणे निरोगी सवयी वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम व खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच शरीरासाठी योग्य नसलेल्या व्यसनी पदार्थांपासून दूर राहण्यासाठी जागरूकता पसरवली जाते.
Human Development
नागरिकांचे मानवी विकास करण्यासाठी मूलभूत आरोग्य सुविधा जसे आरोग्य कार्ड, लसीकरण व वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध करून दिले जाते. योजनेच्या माध्यमातून लिंग प्रमाण संतुलित करण्यासाठी गर्भवती महिलांना 100% संस्थात्मक वितरण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. तसेच Janani Suraksha Yojana अंतर्गत गर्भवती महिलांना पोषण स्थिती सुधारण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. तसेच अपंग नागरिकांसाठी योजनामधून मूलभूत गरजा पुरविले जातात.
Social Development
गावांमध्ये सामाजिक विकास करण्यासाठी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वयंसेवक प्रचार करण्यासाठी उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे गावांमधील महिला वर्ग, स्थानिक आदर्श, शहीद आणि स्वातंत्रसैनिक याना सन्मान देण्यासाठी उपक्रम केले जातात. त्याचप्रकारे विविध महोत्सव साजरे केले जातात.
Economic Development
संसद आदर्श ग्रामीण योजना अंतर्गत आर्थिक विकास करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला उत्पन्नाचे विविध प्रकारचे सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्याचसोबत कृषी विभागातील नागरिकांसाठी कृषी सेवा केंद्र, बियाणे बँकांची स्थापना, गोबर गॅस, सूक्ष्म सिंचन आणि इतर संबधित सुविधा उपलब्ध केला जातात.
Environmental Development
योजनेतर्फे पर्यावरणाचा विकास करण्यासाठी वृक्षारोपणसारखे उपक्रम राबिविले जातात, त्यामध्ये रस्ताच्या बाजूला, घरांजवळ, शाळांमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. त्याचसोबत पाऊसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी सोया केली जाते. प्रदूषण कमी करण्यासाठी Ujjawala Yojana अंतर्गत मोफत LPG गॅस कनेक्शन करून दिले जाते.
Basic Amenities and Services
नागरिकांना ग्रामीण शहरातून स्थलांतर कमी करण्यासाठी मूलभूत सुविधा व सेवा पुरविले जाते. ज्यामध्ये ज्या नागरिकांकडे स्वतःची घरे नाही, त्यांना PM Awas Yojana Gramin अंतर्गत पक्की घरे उपलब्द करतात. त्याचसोबत घरांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी Jal Jeevan Mission Yojana सारखे प्रोग्राम राबविण्यात येतात.
Social Security
ग्रामीण क्षेत्रामधील कुटुंबाना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध केली जाते. ज्यामध्ये महिलांना गरिबीमधून बाहेर पाडण्यासाठी Deendayal Antyodaya Yojana मार्फत मोफत प्रशिक्षण व रोजगाराची संधी देतात.
Good Governance Development
ग्रामीण भागामध्ये योग्य विकास करण्यासाठी व लोकशाही टिकून ठेवण्यासाठी जबाबदार ग्रामपंचायत तयार केले जाते. ग्रामपंचायतद्वारे विविध कार्यक्रमांसाठी सभा भरविले जातात. ग्रामपंचायतमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती व कामाचे निरीक्षण केले जाते.
Sansad Adarsh Gram Yojana Funding Pattern
संसद आदर्श ग्राम योजनासाठी सदस्यांना वेगळे फंड दिले जात नाही. सदस्यांना योजनेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी विविध प्रकारच्या योजनांच्या मदतीने करू शकतात, त्या विविध योजनेच्या माध्यमातून विशेष क्षेत्रासाठी आर्थिक मदत केली जाते. या आर्थिक मदतीचा व योजनेचा वापर विकास करण्यासाठी करावा लागतो.
प्रत्येक संसद सदस्यांना Member of Parliament Local Area Development Program (MPLAD) अंतर्गत मतदार संघाचे विकास करण्यासाठी निधी दिला जातो. त्यामधील काही निधीचा वापर सदस्य SAGY अंतर्गत करू शकतो. तसेच ग्राम पंचायततर्फे काही महसूल गोळा केला जातो, त्याचसुद्धा वापर सदस्य करू शकतो.
त्याचप्रमाणे संसद सदस्यांना Corporate Social Responsibility Funds अंतर्गत ग्रांटच्या स्वरूपात कमिशन दिले जाते, त्या पैशांचाही उपयोग करून गावाचा विकास करू शकतात. अशा पद्धतीमध्ये योजनामध्ये फंडिंग पॅटर्न लागू केला जातो.
MPLAD Scheme काय आहे?
MPLAD Scheme ही सेंट्रल सेक्टर स्कीम असून त्याची स्थापना केंद्र सरकारतर्फे डिसेंबर, 1993 मध्ये करण्यात आली होती. MPLAD Scheme चा पूर्ण अर्थ म्हणजे संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना असा आहे. या योजनेमधून सदस्यांना आपल्या मतदार संघाचे विकास करण्यासाठी निधी मंजूर केला जातो. या योजनेची अंमलबजावणी Ministry of Statistics and Programme Implementation करते, ज्यामध्ये योजनेसाठी पॉलिसी तयार करणे, निधी उपलब्ध करणे आणि देखरेख करण्याचे काम या विभागाकडून केले जाते.
संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनाच्या माध्यमातून मतदार संघामध्ये रस्ते सुविधा, पायाभूत सुविधा, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची सोय यांसारखी कामे करण्यासाठी निधी दिला जातो. केंद्र सरकारे जून, 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियान, सुगम्य भारत अभियान व संसद आदर्श ग्राम योजनासाठी MPLAD निधीचा उपयोग करण्यासाठी मान्यता दिली आहे.
संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनाच्या माध्यमातून सदस्यांना प्रत्येक वर्षी दोन हफ्त्यांच्या स्वरूपात एकूण 5 कोटी रुपये निधी दिला जातो. त्याचप्रमाणे जर सदस्यांकडून दिलेला निधी वर्षभरात खर्च नाही झाला तर त्यांना पुढील वर्षांमध्ये वापरण्यास परवानगी आहे.
Sansad Adarsh Gram Yojana Eligibility
सदस्यांना गावांची निवड करताना संसद आदर्श ग्राम योजनाच्या पात्रतेच्या अटीनुसार निवड करावी लागते, यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या अटींचा समावेश असतो.
- सर्वात प्रथम सदस्यांना ग्रामीण क्षेत्रामधील सपाट जागा जिथे 3000 ते 5000 लोकसंख्या असणे गरजेचे आहे.
- ग्रामीण भागामधील डोंगराळ, अवघड आणि आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये कमीत कमी 1000 पासून ते 3000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांची निवड करावी लागेल.
- संसदमधील सदस्यांना आपल्या गावाची किंवा आपल्या जोडीदाराच्या गावाची निवड न करणे.
- आदर्श ग्राम गाव तयार करण्यासाठी सदस्यांना योग्य ग्रामपंचायत निवडणे आवश्यक आहे.
- लोकसभेमधील सदस्याला आपल्या मतदार संघातून ग्रामीण भागातून गावांची निवड करावी लागेल.
- राज्य सभामधील सदस्यांना राज्यामधील कोणत्या जिल्ह्यांमधील गावांची निवड करून विकास करू शकतात.
- केंद्र सरकारने निवडलेल्या राज्य सभेमधील सदस्य कोणत्या राज्य व जिल्ह्यांमधील गावांचा विकास करण्यासाठी पात्र असतात.
- जे सदस्य शहरी भागातून येतात ते त्यांच्या जवळील ग्रामतदार संघामधील ग्रामीण क्षेत्राची निवड करून विकास करू शकतो.
- सदस्यांना गावाचे विकास करण्यासाठी योजनेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे आर्थिक मदत दिली जात नाही. त्यांना केंद्र व राज्य सरकारतर्फे कामे करण्यासाठी दिलेल्या रक्कमेतून खर्च करावे लागते.
निष्कर्ष
आमच्या लेखातून Sansad Adarsh Gram Yojana संबंधित संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. आर्टिकलमधून आम्ही योजनाचे महत्त्व, त्यांचे उद्देश, त्यांचे लक्ष्य, गावांचे विकास होण्यासाठी घटक, योजनेचे स्तंभ, खर्चाचे पॅटर्न आणि पात्रता याबद्दल सविस्तर माहिती दिली.
आमचा हा लेख आवडला असेल तर ग्रामीण क्षेत्रामध्ये राहत असलेल्या नागरिकांना पाठवा. तसेच अशाच योजनेच्या माहितीसाठी आमच्या योजना मीडियाच्या चॅनेला Subscribe करा.
FAQs
SAGY म्हणजे काय आहे?
SAGY म्हणजे संसद आदर्श ग्राम योजना ज्याच्या माध्यमातून राज्य व लोकसभेमधील सदस्य गावाचा विकास करतात.
संसद आदर्श ग्राम योजनेची सुरुवात कधी झाली?
या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 11 ऑक्टोबर, 2014 रोजी केली होती.
SAGY साठी कोणते मंत्रालय आहेत?
या योजनेची अमलबजावणी ग्रामीण विकास मंत्रालय करते.