Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents: हे आहेत, संजय गांधी निराधार योजनाचे कागदपत्रे

Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents: नागरिकांना अर्ज करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनाचे कागदपत्रे आर्टिकलमध्ये दिलेल्या यादीनुसार जमा करणे आवश्यक आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

योजना अंतर्गत पात्र असलेल्या नागरिकांना प्रत्येक महिन्याला 1,200 रुपये आर्थिक मदत महाराष्ट्र शासनातर्फे बँक खात्यामध्ये पाठविली जाते. आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या नागरिकांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी राज्य सरकारने 2019-20 मध्ये ही योजना आणली होती. 

महाराष्ट्र राज्यामधील ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 210 हजार रुपयांच्या खाली आहे, त्यांना योजनेचा लाभ दिला जातो. त्याचसोबत गंभीर आजार असलेले, दिव्यांग व्यक्ती, ट्रान्सजेंडर आणि घटस्फोट झालेल्या महिला यांना योजनेमधून लाभ देण्यात येतो. 

आपल्या आर्टिकलमध्ये योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना अर्ज करताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे? त्याची संपूर्ण यादी क्रमानुसार खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. त्या यादीप्रमाणे अर्जदारांना सर्व कागदपत्रे रजिस्ट्रेशन दरम्यान जोडणे महत्त्वाचे आहे.

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

  • महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असलेला पुरावा 
  • अधिवास प्रमाणपत्र 
  • ओळखपत्र (पॅनकार्ड, वोटर आयडी, पारपत्र किंवा आर एस बी वाय कार्ड) 
  • वयाचे पुरावे (शिधापत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला) 
  • बँक खात्याचे पासबुक 
  • बँकेसोबत जोडलेले आधारकार्ड 
  • दिव्यांग असतील तर अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र 
  • अनाथ असलेला पुरावा 
  • विधवा असतील तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र 
  • गंभीर आजाराने त्रस्त असतील तर वैद्यकीय प्रमाणपत्र 
  • पासपोस्ट आकाराचा फोटो 
  • अर्जदारांचा ई-मेल आयडी 
  • चालू असलेला मोबाईल नंबर 
  • जातीचा दाखला 
  • वार्षिक उत्पनाचे पुरावे 
  • दारिद्रय रेषेखालील असाल तर BPL कार्ड 
  • ट्रान्सजेंडर वर्गातील असतील तर त्याचा पुरावा

Read More: