Rojgar Hami Yojana 2024: ग्रामीण भागातील बेरोजगारांना मिळणार रोजगारांची संधी

Rojgar Hami Yojana 2024: ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी रोजगार हमी योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगार नागरिकांना वर्षातून शंभर दिवसाचा गॅरंटी रोजगार प्रदान केला जातो. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण क्षेत्रात नागरिकांना नोकरी करण्यास संधी फार कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यात काही नागरिक शहरी भागात नोकरीच्या शोधात येतात, तर काही नागरिक ग्रामीण भागातच राहतात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे कुटुंब गरिबीमध्ये असल्यामुळे त्या कुटुंबाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. नागरिकांना आर्थिक समस्या आल्यामुळे योग्य शिक्षण घेणे परवडत नाही. 

आर्थिक दृष्टया कमकुवत असलेले नागरिक या परिस्तिथीमुळे दारिद्रयामध्ये अजून फसत जातो आहे. या समस्यांचा विचार करता, महाराष्ट्र सरकारने ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी रोजगार हमी योजनाची सुरुवात केली. 

ग्रामीण भागातील बेरोजगारीमध्ये असलेल्या नागरिकांना या योजनेचे लाभ घेण्यासाठी आम्ही दिलेला हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत पहावा लागेल. यामध्ये आम्ही ही योजना काय आहे? ती सुरु करण्यामागचे उद्देश काय आहेत? त्यांचे फायदे कोणते आहेत? कोणत्या मंत्रालयाचा समावेश आहे? यासाठी कोण-कोण पात्र असणार आहेत? अर्ज करतेवेळी लागणारे कागदपत्रे कोणती? यामध्ये अर्ज कशाप्रकारे करू शकतो? आणि अर्ज केल्यानंतर यादी कशी तपासायची? याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. 

Rojgar Hami Yojana in Marathi 

महाराष्ट्र सरकारतर्फे रोजगार हमी योजनाची सुरुवात वर्ष 2005 साली बेरोजगार नागरिकांच्या समस्यांना दूर करण्यासाठी केली होती. त्यानंतर देशामधील बेरोजगारीचा आकडा बघता केंद्र शासनाने सुद्धा वर्ष 2008 रोजी या योजनेला केंद्रात लागू केले. केंद्रामध्ये सरकारतर्फे MNREGA म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गँरंटी अधिनियम योजना या नावाने सुरुवात केली गेली. 

ही योजना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाररिक स्वरूपात बेरोजगार असलेल्या व्यक्तींना रोजगार स्वरूपात आर्थिक मदत व्हावी यासाठी सुरु केली गेली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शारीरिक दृष्टया सक्षम असणाऱ्या बेरोजगारांना काम करण्यासाठी एका वर्षामधून 100 दिवसांसाठी गॅरंटी रोजगार प्रदान केला जातो. या योजनेतून बेरोजगारांना रोजगारसोबत ग्रामीण भागातून निवास स्थानाजवळील कामाची संधी दिली जाते.

रोजगार हमी योजना माहिती 2024

योजनाचे नावMaharashtra Rojgar Hami Yojana
श्रेणीमहाराष्ट्र सरकारी योजना
सुरु कोणती केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
कधी झाली सुरुवर्ष 2005 रोजी
विभागनियोजन विभाग, महाराष्ट्र
उद्देशग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त करून देणे
लाभार्थीमहाराष्ट्र ग्रामीण क्षेत्राचे बेरोजगार वर्ग
लाभगॅरंटी रोजगार
अर्ज पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://mahaegs.maharashtra.gov.in/
हेल्पलाईन नंबर1800-120-8090

Rojgar Hami Scheme Aim 

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या रोजगार हमी योजनाचे मुख्य उद्देश राज्यातील ग्रामीण क्षेत्रात राहत असलेल्या बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देऊन त्यांना चांगला रोजगार प्राप्त करता येईल. या रोजगाराच्या मदतीमुळे त्यांच्या जीवनातील आर्थिक दृष्टया समस्या कमी होतील. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बेरोजगारीची टक्केवारी कमी होईल. 

अलीकडे शहरी भागातसुद्धा बेरोजगार नोकरीच्या संधीत इथे तिथे भटकत असतात. शहरी भागात येणारे नागरिक हे काही प्रमाणात ग्रामीण क्षेत्रामधून नोकरीच्या शोधात आलेले असतात. योग्यरीत्या शिक्षण व अनुभव नसल्यामुळे बेरोजगार वर्गातील नागरिकांना नोकरी करून पैसे कमविणे कठीण जाते. 

या समस्यांचा विचार करता राज्य सरकारने या उपयुक्त योजनांची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिक त्याच ठिकाणी राहून रोजगार निर्माण करू शकतात  आणि आपल्या ग्रामीण क्षेत्राला विकसित बनविण्यात मदत करू शकतात. 

Rojgar Hami Yojana Benefits 

  • राज्य सरकारने सुरु केलेल्या रोजगार हमी योजनाचे फायदे महाराष्ट्रातील ग्रामीण क्षेत्रामधील बेरोजगार नागरिकांना दिले जातात. 
  • या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रामधील बेरोजगार नागरिकांना रोजगार उपलब्ध केला जातो. 
  • राज्य सरकार आर्थिक मदतीच्या स्वरूपात बेरोजगार नागरिकांना शंभर दिवसाचे गँरंटी रोजगार प्रदान करते. 
  • महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या या योजने अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामधील बेरोजगारी कमी करण्यात मदत मिळते. 
  • या योजनेमध्ये बेरोजगार नागरिक अर्ज करून आपल्या आर्थिक समस्यांना दूर करण्यात मदत करू शकतो. 
  • महाराष्ट्र सरकार या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्थानिक ठिकाणी विविध कामाची संधी पुरवतो. 
  • या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी नागरिकाला स्वतंत्रपणे कामाची निवड करण्यासाठी संधी दिली जाते. 
  • लाभार्थ्यांच्या मदतीमुळे ग्रामीण क्षेत्रामधील उत्पादक मालमत्तेची निर्मिती केली जाते. 
  • ग्रामीण भागातील पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लाभार्थींची मदत घेतली जाते. 
  • राज्य सरकारचे ध्येय ग्रामीण भागातील शहरात जाण्यासाठीचे स्थलांतरण कमी करणे हे आहे. 
  • त्याचसोबत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी या योजनेची मदत होते.

Rojgar Hami Yojana Eligibility 

सरकारतर्फे चालू केलेल्या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी नागरिकांना आधी रोजगार हमी योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. यासाठी खालीलप्रमाणे पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत. 

  • या योजने अंतर्गत सहभागी होणारे नागरिक महाराष्ट्र राज्याचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. 
  • फक्त महाराष्ट्रातील ग्रामीण क्षेत्रामधील बेरोजगार नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो. 
  • जो बेरोजगार नागरिक या योजनेमध्ये अर्ज करण्यास इच्छुक आहे त्याचे वय कमी कमीत 18 वर्ष असणे. 
  • सरकारच्या या योजने अंतर्गत अर्ज करणारा बेरोजगार नागरिक बारावी पास असणे आवश्यक आहे. 
  • बेरोजगार नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक असणारे कागदपत्रे सोबत असणे.

Rojgar Hami Yojana Required Documents

बेरोजगार नागरिकांना अर्ज करताना खालील दिलेल्या रोजगार हमी योजनेचे कागदपत्रे आवश्यक आहेत. 

  • अर्जदार नागरिकांचे आधारकार्ड 
  • स्थानिक रहिवासी दाखला 
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • वार्षिक उत्पन्न दाखला 
  • शैक्षणिक पुरावे जसे मार्कशीट 
  • ड्रायविंग लायसन्स 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • बँक पासबुकचे पहिले पान

Rojgar Hami Yojana Online Apply 

जे नागरिक ग्रामीण भागातील असून रोजगार हमी योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील, त्यांनी खालील दिलेल्या रजिस्ट्रेशन प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करावा. 

  • नागरिकांना रोजगार हमी योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम नियोजन विभागाची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. 
  • अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर होमपेज उघडून येईल. 
  • त्यानंतर तुमच्या समोर होमपेजमध्ये Registration चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे. 
  • त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर योजनेचा फॉर्म उघडून येईल. 
  • त्या फॉर्ममध्ये तुमच्या वैयक्तिक माहितीबद्दल विचारले असेल जसे तुमचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका, गावाचे नाव, पिनलोड मोबाईल नंबर. 
  • फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घेणे. 
  • फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 
  • त्यामध्ये तुमचा चालू असलेला नंबर टाकून तुम्हाला आलेला ओटीपी टाकून घेणे. 
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे यूजर आयडी नाव व पासवर्ड टाकावा लागेल. 
  • शेवटी सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर बटनावर क्लिक करायचे आहे. 
  • अशा प्रकारे तुमचे या योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत.

Rojgar Hami Scheme List Check 

लाभार्थ्यांनी या योजने अंतर्गत अर्ज केलेला आहे आणि त्यांना रोजगार हमीच्या यादीमध्ये आपले नाव तपासायचे असल्यास खालील दिलेल्या प्रक्रियेनुसार नाव तपासू शकतात. 

  • सर्वात प्रथम अर्जदारांना यादी बघण्यासाठी नियोजन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 
  • त्यानंतर तुमच्या होमपेजमध्ये स्टेट असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे. 
  • त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर देशामधील सगळ्या स्टेटची नावे दिसतील. 
  • त्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये आर्थिक वर्ष, जिल्हा, ब्लॉक व पंचायत असेल विचारलेले असेल. 
  • त्या विचारलेल्या माहितीनुसार तुम्ही प्रत्येक ब्लॉकचे निवड करून घेणे. 
  • संपूर्ण निवड करून झाल्यानंतर शेवटी Proceed बटनावर क्लिक करणे. 
  • प्रोसिड करून झाल्यावर तुमच्या समोर मोठी यादी उघडून येईल ती डाउनलोड करून घेणे. 
  • त्यानंतर त्यामध्ये तुमचे नाव व जॉब कार्ड नंबर शोधायचे आहे 
  • अशाप्रकारे तुम्ही यादीमध्ये नाव तपासण्यासाठी प्रकिया करू शकता.

रोजगार हमी योजना अंतर्गत मिळणारे कार्य 

बेरोजगारांना अर्ज करून या योजनेतून मिळणाऱ्या रोजगारांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. या रोजगाराच्या यादीनुसार राज्य सरकारतर्फे नागरिकांना काम करण्याची संधी प्राप्त करून दिली जाते. 

  • झाडे लावणे 
  • रस्ते स्वच्छ करणे 
  • तलाव स्वच्छ करणे 
  • दगडी उचलणे 
  • सामान उचलणे 
  • बांधकामातील साहित्य तयार करणे 
  • रस्त्यांवरील नाले सफाई करणे 
  • कामगार नागरिकांना पाणी देणे
  • सिंचन संबंधित खोदण्याची कामे 
  • बेबीसीटिंग करणे (अधिकाऱ्याच्या लहान मुलांचा सांभाळ करणे) 
  • विहीर तयार करणे

रोजगार हमी योजनामध्ये समावेश असलेले मंत्रालय व त्यामधील अधिकारी 

  • पंचायत विकास अधिकारी 
  • ग्रामीण विकास मंत्रालय 
  • केंद्र व राज्य रोजगार गॅरंटी परिषद 
  • ग्राम पंचायत 
  • ग्राम रोजगार सहाय्यक 
  • ज्युनियर इंजिनिअर 
  • कार्यक्रम अधिकारी 
  • तांत्रिक सहाय्यक 
  • क्लर्क

Conclusion 

आम्ही या लेखात Rojgar Hami Yojana या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगितली. यामध्ये योजनेचे महत्त्व काय आहेत? त्यांचे उद्देश काय? त्यांचे फायदे कोणते आहेत? यासाठी कोणते नागरिक पात्र असणार? अर्ज करताना नागरिकांना कोणते कागदपत्रे द्यावी लागणार? यामध्ये कोणत्या प्रकारे अर्ज करू शकतो? कसा अर्ज करू शकता? अर्ज केल्यानंतर यादी कशी तपासायची? यामध्ये कोणते कार्यालय सहभागी आहेत? तसेच कोणकोणत्या कामांचा समावेश केलेला आहे? अशा संपूर्ण माहितीबद्दल मार्गदर्शन केले. 

तुम्ही सुद्धा ग्रामीण क्षेत्रातील असून बेरोजगारीच्या जाळ्यात अडकले असतील तर ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आमचा हा लेख तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर गरजू लोकांना पाठवा आणि त्यांनाही रोजगार मिळण्यास मदत करा. 

अशाच उपयुक्त योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला Telegram आणि WhatsApp वर फॉलो करू शकता आणि नवीन माहिती मिळवू शकता. 

FAQs

रोजगार हमी योजना काय आहे?

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी संधी प्राप्त करून दिली जाते. 

महाराष्ट्र रोजगार हमी योजना कधी सुरू झाली?

महाराष्ट्रामध्ये या योजनेची सुरवात वर्ष 2005 साली करण्यात आली होती. 

रोजगार हमी योजनेमध्ये अर्ज कसा करायचा? 

नागरिकांना या योजनेत अर्ज करण्यासाठी नियोजन विभागाच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल. 

पुढे वाचा: