Ration Card LPG Seeding: भारत देशामधील कुटुंबाना विविध प्रकारे मदत करण्यासाठी केंद्र सरकार योजना घेऊ येत असतात, त्यामध्ये स्वस्त दरात गॅस परवड्यासाठी राशन कार्ड एलपीजी योजनाची सुरुवात सरकारने केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशामधील गरीब घरातील कुटुंबाला 450 रुपये प्रमाणे एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी रॅशनकार्ड सिडींग सुविधा सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य उद्देश देशभरातील राशनकार्ड धारकांना स्वस्त दरात गॅस उपलब्द करणे आणि त्याचसोबत सबसिडीचा लाभ देखील देणे आहे.
Ration Card LPG Seeding योजना काय आहे?
राशन कार्ड एलपीजी योजना ही एक नवीन कल्पना आहे, ज्याच्या माध्यमातून राशन कार्ड असलेल्या नागरिकांना गॅस सिलेंडरवर सबसिडी प्रदान केली जाते. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शनची माहिती त्यांच्या राशनकार्डसोबत जोडावी लागेल.
त्यानंतर लाभार्थी Ration Card EKYC प्रकिया पूर्ण करून योजनेमधून मिळणाऱ्या लाभाचा फायदा करून घेऊ शकतात. ज्यामध्ये नागरिकांना 450 रुपये प्रमाणे गॅस सिलेंडर प्राप्त करता येणार आणि सबसिडीचा लाभ देखील घेता येणार. योजनेतून मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर याद्वारे थेट पाठिवले जाणार.
एलपीजी गॅस सबसिडी योजनाची माहिती
एलपीजी गॅस सबसिडी योजना ही सरकारने सुरु केलेल्या उज्ज्वला योजना अंतर्गत राबविले जाते. ज्यामध्ये योजने अंतर्गत सहभागी असलेल्या नागरिकांना गॅस सिलेंडरवरती सबसिडी प्रदान केली जाते आणि ही सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. या प्रकारे देशभरातील नागरिकांना स्वस्त दरात गॅस सिलेंडर प्राप्त होतो आणि आर्थिक खर्च कमी करता येतो.
राशन कार्ड एलपीजी सिडींगसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधारकार्ड
- त्यांच्या नावाचे राशन कार्ड
- बँक खात्याची माहिती
- गॅस कनेक्शन आयडी
राशन कार्ड एलपीजी सिडींग कसे करायचे?
- सिडींग प्रकिया पार पाडण्यासाठी सर्वात प्रथम आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करणे.
- त्यानंतर सर्व कागदपत्रे घेऊन राशन कार्ड ऑफिसमध्ये जाऊन जमा करणे.
- पुढे ऑफिसमधील कर्मचारीला ईकेवायसी प्रकिया पूर्ण करण्यास विनंती करा.
- तुमचे ईकेवायसी प्रकिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला सबसिडीचा लाभ देण्यात येईल.
- महत्त्वाची गोष्ट म्हणजे राशन कार्ड एलपीजी सिडींग करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर, 2024 आहे.
Read More:
- PM LPG Panchayat Yojana 2024: काय आहे प्रधानमंत्री एलपीजी पंचायत योजना?
- Pradhan Mantri Ujjwala Yojana 2.0 Online Registration: फ्री गॅस कनेक्शनसाठी, असे करा रजिस्ट्रेशन
- PM Ujjwala Yojana Registration: असे अर्ज करून मिळवा, फ्री LPG गॅस कनेक्शन
- Gas Cylinder Yojana Online Registration 2024: फ्री गॅस सिलेंडरसाठी सुरु झाले ऑनलाईन रजिस्ट्रेशन, असे करा अर्ज