Rashtriya Krishi Vikas Yojana RAFTAAR 2024: केंद्र सरकारतर्फे कृषी संबंधित क्षेत्रात आणि उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) सुरु केली होती. केंद्र सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी आर्थिक मदत पुरवली जाते.
राष्ट्रीय कृषी विकास योजनाची सुरुवात 2007 रोजी करण्यात आली होती. त्या कालावधीमध्ये ही योजना Centre Sector Scheme या प्रकारच्या अंतर्गत चालू करण्यात आली होती. सेंटर सेक्टर स्किम म्हणजे योजनेमध्ये होणारा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलते.
परंतु 2014-15 च्या कार्यकाळामध्ये शासनाकडून योजनेमध्ये सेंटर सेक्टर स्किमला बदलवून Centre Sponsored Scheme मध्ये टाकण्यात आले. सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे योजनेचा काही खर्च केंद्र सरकार आणि काही राज्य सरकार उचलते. योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात वेगाने विकास करण्यासाठी 2017 रोजी Rashtriya Krishi Vikas Yojana RAFTAAR असे नाव देण्यात आले.
याच विषयावर आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये योजना काय आहे? त्यांचे उद्देश, त्यापासून होणारे फायदे, त्यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्रतेच्या अटी, अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे आणि अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेवट्पर्यंत आर्टिकल पहा.
Rashtriya Krishi Vikas Yojana in Marathi
केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजनाची सुरुवात Ministry of Agriculture and Farmers Welfare अंतर्गत ऑगस्ट – सप्टेंबर 2007 रोजी करण्यात आली होती. राज्य स्थरावर कृषी क्षेत्रात आर्थिक खर्चाचे नियोजन करण्यासाठी राज्य कृषी विभाग अंमलबजावणी करते.
2014-15 मध्ये सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम अंतर्गत बदल केल्यामुळे सामान्य राज्यामध्ये 60:40 चे प्रमाण वापरले जाते, ज्यामध्ये 60% खर्च केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार मिळून करते. त्याचप्रमाणे ईशान्यकडील व हिमालयन राज्यांमध्ये 90:10 चा फंडिंग पॅटर्न वापरला जातो आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये (UT) होणारे संपूर्ण खर्च केंद्र सरकार करते.
RKVY – RAFTAAR अंतर्गत योजनेचे लक्ष्य कृषी क्षेत्राचा विकास करून फायदेशीर शेती करण्यास प्रोत्साहन देणे आहे. ज्यामध्ये योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जोखीम कमी करून त्यांना मजबूत करणे. तसेच कृषी संबंधित व्यवसायाला चालना देणे.
केंद्र व राज्य सरकारचे प्रमुख लक्ष Pre व Post Harvest Infrastructure तयार करणे आणि कृषी उद्योजकाला innovation करण्यासाठी प्रोत्साहित करणे यावर आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात नफा होऊन आर्थिक फायदा मिळण्यात मदत होईल.
Rashtriya Krishi Vikas Yojana 2024 Overview
योजनेचे नाव | Rashtriya Krishi Vikas Yojana RAFTAAR |
प्रकार | सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
लॉन्च केली | ऑगस्ट – सप्टेंबर 2007 दरम्यान |
विभाग | कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | कृषी संबंधित क्षेत्रात आर्थिक मदत करून विकास करणे |
लाभार्थी | भारत देशामधील कृषी व संबंधित क्षेत्रातील नागरिक |
अर्ज प्रकिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://rkvy.nic.in/ |
हेल्पलाईन नंबर | 011-23070964 |
Rashtriya Krishi Vikas Yojana Objective
राष्ट्रीय कृषी विकास योजनाचे मुख्य उद्देश देशभरातील कृषी व संबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि सुविधा उपलब्ध करून विकास घडविणे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आपले उत्पादन वाढवून चांगले नफा करण्यात मदत मिळेल तसेच इकॉनॉमिकली सुद्धा वाढ होण्यात मदत मिळेल.
आपल्या भारत देशामध्ये सर्वात इकॉनॉमीमध्ये विविध क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. कारण भारताच्या प्रत्येक भागात आणि घरांमध्ये कृषी संबधित प्रॉडक्टचे वापर केले जाते. तसे बघायला गेले तर पूर्ण मानवी जीवन अन्नदाता शेतकरी यांच्यावरच अवलंबून आहे.
केंद्र सरकारचे यासाठी शेतकऱ्यांना नवीन नवीन गोष्टींबद्दल माहिती देणे, त्यांना शेतीमध्ये होणारे नुकसानीला कमी करणे आणि फूड उद्योगाला शेतकऱ्यांसोबत जोडणे हे मुख्य ध्येय आहे.
Pradhanmantri Krishi Sinchai Yojana
Rashtriya Krishi Vikas Yojana Benefits
- राष्ट्रीय कृषी विकास योजनाचे फायदे कृषी संबंधित असलेले विविध क्षेत्रामध्ये विकास घडविण्यासाठी होतो.
- केंद्र सरकारने या योजनेला 11वी व 12वी पंचवर्षीय योजनामध्ये लागू करण्यात आले होते.
- अकराव्या पंचवर्षीय दरम्यान विविध राज्यांना जवळपास 22,408 कोटी रुपये दिले गेले होते आणि जवळपास यामध्ये 5,768 प्रकल्प आणले गेले होते.
- त्याचसोबत बाराव्या पंचवर्षीय योजनामध्ये राज्यांना 3,148 कोटी रुपये देण्यात आले होते, त्यामध्ये 7600 प्रकल्प योजना अंतर्गत आणले होते.
- केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कृषी संबंधित कामासाठी 2 इंस्टॉलमेंटमध्ये 50% रक्कम ट्रान्स्फर करते.
- RKVY योजनेच्या माध्यमातून प्री व पोस्ट हार्वेस्टनंतर कृषी पायाभूत सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांना मजबूत बनविले जाते. ज्यामध्ये शेतकरी आपले फूड साठवून ठेवू शकतो किंवा विकू शकतो.
- योजनेच्यामार्फत चैन तयार करून त्यामध्ये मूल्यवान प्रॉडक्ट तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. जसे उसाच्या पिकातून साखर तयार करणे आणि त्यामधून इतर पदार्थ तयार करणे असे प्रॉडक्ट मॉडेल तयार करणे.
- योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा धोका कमी करून त्यांना जास्तीत जास्त कमाई करून देण्यासाठी विविध प्रकारचे उत्पन्नाचे स्रोत तयार करून दिले जाते. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाला दुसऱ्या स्रोतांमधून भरपाई करण्यात येईल.
- त्याचप्रमाणे तरुणांना सक्षम बनवण्यासाठी कृषी संबंधित कौशल्य विकासावर जोर देण्यात येते, कृषीमध्ये इनोव्हेशनसाठी प्रोत्साहित केले जाते आणि शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी Agribusiness मॉडल्स तयार करण्यास मदत करतात.
- केंद्र शासन राज्यांना लोकल व शेतकरी बांधवाना त्यांच्या गरजेनुसार योजनेतून आर्थिक मदत व अंमलबजावणी करण्याचे अधिकार प्रदान करतात.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गातील नागरिकांना विविध प्रकारचे शेती संबंधित माहिती पुरवली जाते. जेणेकरून नैसर्गिक आपत्ती जरी आली तरी शेतकरी योग्यरित्या उत्पन्न कमविण्यासाठी सक्षम राहतील.
राष्ट्रीय कृषी विकास योजनामध्ये समावेश असणारे क्षेत्र
- पीक संवर्धन
- पशुपालन
- फॉरेस्ट्री व वन्यजीवन
- प्लांटेशन व कृषी मार्केटिंग
- मत्स्यपालन
- दुग्ध व्यवसाय
- कृषी संशोधन
- फूड स्टोरेज व वेयरहाऊसिंग
- माती व पाणी संवर्धन
- कृषी वित्तीय संस्था
- कृषी प्रोग्राम व महामंडळ
Paramparagat Krishi Vikas Yojana
Rashtriya Krishi Vikas Yojana Eligibility
राष्ट्रीय कृषी विकास योजनामध्ये पात्र असण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या अटी जाणून घेणे. त्यानुसार पात्र ठरल्यास अर्ज करण्यास मान्यता असणार.
- सर्वात प्रथम RKVY योजनेमध्ये अर्ज करणारे नागरिक भारताचे स्थानिक रहिवासी असणे.
- जे नागरिक योजनेमध्ये अर्ज करणार आहेत ते कृषी किंवा त्यांच्या संबंधित क्षेत्रामधील असणे.
- योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय 18 पेक्षा जास्त असले पाहिजे.
- देशभरातील शेतकरी वर्गच यामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहेत.
- शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सोबतीला असणे बंधनकारक आहे.
Rashtriya Krishi Vikas Yojana Documents
शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे यादी नुसार दिलेले आहेत ते पाहून घ्या.
- शेतकऱ्यांचे आधारकार्ड
- स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक खात्याची माहिती (पासबुकचे पहिले पान)
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
Rashtriya Krishi Vikas Yojana Apply Online
केंद्र शासनाने सुरु केलेल्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनामध्ये अर्ज करणे महत्त्वाचे आहे. अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रकिया स्टेप बाय स्टेप दिलेले आहेत.
- अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला RKVY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला होमपेजमध्ये अर्जाचे पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- पर्यायामध्ये गेल्यानतंर तुमच्या समोर योजनेचा फॉर्म उघडून येईल.
- त्या फॉर्ममध्ये योजने संबंधित आवश्यक असणारी सर्व माहिती विचारली असेल.
- ती संपूर्ण माहिती वाचून अचूक फॉर्म भरून घेणे.
- योजनेचा फॉर्म संपूर्ण भरल्यानंतर गरजेचे असणारे कागदपत्रे स्कॅन करून घ्या व अपलोड करा.
- अपलोडींग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा पद्धतीने तुमचे योजनेमध्ये यशस्वीरीत्या अर्ज पूर्ण झाले आहे.
- जर ऑनलाइन पद्धतीमध्ये काही समस्या आल्यावर तुम्ही जिल्ह्यामधील कृषी विभागात किंवा तुमच्या जवळील सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज करू शकता.
निष्कर्ष
आमच्या या आर्टिकलमधून Rashtriya Krishi Vikas Yojana संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तररित्या सांगितली. ज्यामध्ये योजनेची सुरुवात कधी झाली होती? योजनेची सुरुवात का करण्यात आली होती? त्यांचे मुख्य उद्देश काय होते? त्यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? कोणत्या प्रकारचे स्कीम आहे? यामध्ये कोण लाभार्थी आहेत? लाभार्थ्यांना कशा प्रकारे फायदे करू दिले जाते? किती प्रकल्पांचा समावेश आहे? शेतकरी वर्गातील कोणते क्षेत्रांचा समावेश आहे? शेतकऱ्यांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? आणि अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकिया करावे लागतात? अशा संपूर्ण गोष्टींबद्दल माहिती सांगितली आहे
तुम्ही कृषी संबंधित क्षेत्रात काम करत असाल आणि तुमच्या क्षेत्रात विकास घडवायचा असेल, तर तुम्ही सुद्धा राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकता. त्याचसोबत इतरांना फायदा होण्यासाठी आमचा हा लेख पाठवू शकता.
अशाच शेती संबंधित योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Telegram आणि WhatsApp चॅनेल वर जॉईन करू शकता आणि नवीन माहिती जाणून घेऊ शकता.
FAQs
RKVy योजना कशी लागू करावी?
योजना लागू करण्यासाठी rkvy.nic.in या वेबसाइटमध्ये जाऊन लागू करू शकता.
RKVy चे फायदे काय आहेत?
या योजनेचे फायदे कृषी क्षेत्रातील विकास होते व शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मदत मिळते.
राष्ट्रीय कृषी विकास योजना कधी सुरू झाली?
केंद्र सरकारने ही योजना ऑगस्ट – सप्टेंबर महिन्याच्या 2007 साली केली होती.
RKVy चे पूर्ण रूप काय आहे?
RKVY चे पूर्ण रूप राष्ट्रीय कृषी विकास योजना असा आहे.
पुढे वाचा: