Ramai Awas Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने नागरिकांना मोफत घर उपलब्ध करून देण्यासाठी रमाई आवास योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गरीब वर्गातील नागरिकांना सरकारकडून मोफत घर दिले जात आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये दारिद्रय रेषेखालील तसेच आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबाकडे स्वतःचे घर उपलब्ध नाही. त्यामुळे कालांतराने त्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ज्यामध्ये सगळ्यात सामान्य समस्या आहे, ती म्हणजे आर्थिक अस्थिरता.
गरीब वर्गातील नागरिकांना याच समस्यांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घरकुल योजनाची सुरुवात केली आहे. जेणेकरून गरिबीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला आपला संसार सुखाने जगता येईल, त्याचसोबत त्यांच्या जीवन शैलीमध्ये सुधारणा होण्यास मदत मिळेल.
आज आपण या लेखात रमाई आवास योजना काय आहे? त्याचसोबत ती कोणासाठी आहे? ती कोणी चालू केली? कशासाठी चालू केली? याचे मुख्य उद्देश कोणते? यामध्ये लाभार्थ्यांना कोणते फायदे मिळणार? कोण-कोण यासाठी पात्र असणार आहेत? अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? अर्ज कशाप्रकारे करायचा आहे? आणि शेवटी महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये व किती लोकांना मोफत घरे वाटप झाली? यांची यादीसुद्धा सांगणार आहे. यासाठी हा लेख शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा.
Ramai Awas Yojana in Marathi
महाराष्ट्र सरकारतर्फे रमाई आवास योजनाची सुरुवात करण्यात आली आणि ही योजना रमाई आवास घरकुल योजना या नावानेसुद्धा ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय नागरिकांना मोफत घर दिले जाते. मागासवर्गामधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवं बौद्ध या कुटुंबियांना सरकारकडून मोफत घर उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेची योग्यरीत्या पूर्तता करण्यासाठी सरकारतर्फे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग नेमले गेले आहे. जेणेकरून अनुसूचित वर्गामधील आर्थिक दृष्टया दुर्बळ असलेल्या कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता यावा. सरकारने या योजनेच्या अंतर्गत राज्यामधील विविध जिल्ह्यांमधील गरीब कुटुंबाना स्वतःचे घर उपलब्ध करून दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारकडून घरकुल योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 1.5 लाख घरे प्रत्येक राज्यातील गरीब कुटुंबाना वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे सरकारने आता विविध राज्यामधील कुटुंबाना 51 लाखांपेक्षा जास्त घर वाटप करण्याचे ध्येय हाती घेतले आहे. यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे? आणि किती घरे कोणत्या जिल्ह्यात वाटली जाणार याची यादी लेखाच्या शेवटी सादर केलेली आहे.
रमाई आवास योजना माहिती 2024
योजनेचे नाव | Ramai Awas Gharkul Yojana, Maharashtra |
श्रेणी | महाराष्ट्र सरकारी योजना |
सुरु कोणी केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
कधी सुरु झाली | 2023 |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन |
उद्देश | राज्यातील गरिबीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला मोफत घर प्रदान करणे |
लाभार्थी | अनुसूचित जाती व जमाती आणि नव बौद्ध वर्गातील कुटुंब |
लाभ | मोफत घर |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | https://rdd.maharashtra.gov.in |
Ramai Awas Gharkul Yojana Purpose
महाराष्ट्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या रमाई आवास योजनाचे मुख्य उद्देश राज्यातील मागासवर्गीय कुटुंबातील नागरिकांना मोफत घर प्रदान करणे हे आहे. जेणेकरून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना स्वतःचे राहण्यासाठी छप्पर मिळेल. त्याचसोबत त्याचा आर्थिक व सामाजिक दृष्टया सुधार होण्यास मदत मिळेल.
या घरकुल योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील नव बौद्ध, आदिवासी आणि अनुसुचित जाती या वर्गातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर नाही, त्यांना चांगले व पक्के घर मोफत उपलब्ध करून देणे हे सरकारचे यामागचे धोरण आहे.
Ramai Awas Yojana Benefits
- रमाई आवास योजनाचा फायदा महाराष्ट्र राज्यामधील मागासवर्गीय नागरिकांना दिला जातो.
- महाराष्ट्रामधील अनुसूचित जाती, आदिवासी व नव बौद्ध वर्गातील सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक दृष्टया गरीब नागरिकांसाठी या योजनेतून मोफत घर उपलब्ध करून दिले जाते.
- या घरकुल योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने दीड लाखाहून अधिक परिवारांना आपले स्वतःचे घर मिळवून दिले आहेत.
- या योजनेचा लाभ ग्रामीण व शहरी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबाला घेता येतो.
- त्याचप्रमाणे सरकारतर्फे या योजनेच्या माध्यमातून मातंग समुदायातील कुटुंबाना कमीत कमी 25 हजार घरांचे मोफत वाटप केले जाणार आहेत.
Ramai Awas Yojana Eligibility
अर्जदारांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी रमाई आवास योजनेच्या पात्रता खालील दिलेल्या अटीनुसार असणे आवश्यक आहेत.
- सर्वात प्रथम या घरकुल योजना अंतर्गत अर्ज करणारा नागरिक महाराष्ट्र राज्याचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- या योजनेमध्ये फक्त अनुसूचित जाती, नव बौद्ध वर्ग आणि अनुसूचित जमातीमधील नागरिक सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.
- जे नागरिक मागासवर्गीय असून त्यांचे जीवन गरिबी रेषेखालील आहेत ते अर्ज करू शकतात.
- अर्ज करणाऱ्या नागरिकांकडे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे उपलब्ध असणे.
- मुंबईसारख्या महानगर क्षेत्रामधील मागासवर्गीयांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत असणे.
- महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा कमी असणे.
- जे नागरिक महानगर पालिकेच्या क्षेत्रात राहतात, त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजार पेक्षा जास्त नसावे.
Ramai Awas Yojana Required Documents
नागरिकांना अर्ज करताना रमाई आवास योजनासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे ती जमा करून ठेवणे.
- अर्जदाराचे आधारकार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- ओळखपत्र
- जातीचा प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- वार्षिक उत्पन्नाचा दाखला
Ramai Awas Yojana Online Apply
जे नागरिक सरकारने सुरु केलेल्या या उपक्रमातून घर मिळविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी रमाई आवास योजनेचे रजिस्ट्रेशन खालील दिलेल्या प्रकियानुसार स्टेप बाय स्टेप जाणून घेऊन अर्ज करावा.
- नागरिकांना अर्ज करण्यासाठी सर्वात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट ओपन करावी लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर वेबसाइटचे होमपेज उघडून येईल.
- त्या होमपेजमध्ये तुम्हाला रमाई आवास योजना ऑनलाइन अर्ज असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामध्ये रमाई आवास योजना फॉर्म दिसेल.
- त्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये जी काही माहिती विचारण्यात आलेली आहे ती लक्षपूर्वक भरून घेणे.
- फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे.
- फॉर्म व कागदपत्रे व्यवस्थित तपासणी करून सबमिट बटनावर क्लिक करणे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन करण्यासाठी तुम्हाला पुन्हा होमपेजमध्ये जाऊन लॉगिन पर्यायावर क्लिक करणे.
- त्या पर्यायामध्ये तुम्हाला लॉगिन आयडी व पासवर्ड विचारतील तो टाकून लॉगिन करणे.
- अशा प्रकारे तुमचे घरकुल योजनासाठी ऑनलाइन अर्ज प्रकिया पूर्ण झालेली आहे.
Ramai Awas Gharkul Yojana List Check
ज्या नागरिकांनी घरकुल योजने अंतर्गत अर्ज केला आहे आणि त्यांना रमाई आवास योजनेच्या यादीमध्ये आपले नाव तपासायचे असल्यास खालील दिलेल्या प्रकिया फॉलो करा.
- सर्वात प्रथम तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर होमपेज ओपन होईल, त्यामध्ये नवीन यादी असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे.
- त्या पर्यायामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे अर्ज नंबर व नाव टाकावे लागेल.
- ती प्रकिया केल्यानंतर तुमच्या समोर या योजनेची संपूर्ण यादी उघडून येईल.
- यादी उघडून आल्यानंतर तुमचे नाव शोधणे.
- अशाप्रकारे तुम्ही योजनेची यादी तापसण्यासाठी प्रकिया करू शकता.
Ramai Awas Gharkul Yojana District Approval List
जिल्ह्यांचे वर्णन | शहरी भाग | ग्रामीण भाग |
नाशिक | 346 | 14864 |
पुणे | 5792 | 8720 |
मुंबई | 86 | 1942 |
नागपूर | 2987 | 11677 |
औरंगाबाद | 7565 | 30116 |
लातूर | 2770 | 24274 |
अमरावती | 3210 | 21978 |
रमाई आवास योजना संबंधित मंत्रालयाचे संपर्क तपशील
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
- हेल्पलाइन संपर्क: 022-22025251/022-22028660
- ई-मेल आयडी: min.socjustice@maharashtra.gov.in
- पत्ता: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय, पहिला मजला, अंनेक्स बिल्डिंग, मंत्रालय, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, नरिमन पॉईंट, मुंबई – 400032
Conclusion
आम्ही या लेखातून Ramai Awas Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरित्या सांगितली आहे. यामध्ये योजना का सुरु करण्यात आली? कोणातर्फे सुरु करण्यात आली? कोणासाठी सुरु करण्यात आली? यामध्ये कोणते विभाग काम करत आहेत? सुरु करण्याचे मुख्य उद्देश काय होते? त्यामधून काय फायदे मिळणार? कोणत्या नागरिकांना यामध्ये सहभागी होता येणार? सहभागी होण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार? सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रकिया काय आहेत? तसेच अर्ज केल्यानंतर लाभार्थी यादी कशी तपासायची? आणि कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार? अशा सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही तुम्हाला लेखातून मार्गदर्शन केले.
तुम्ही सुद्धा या योजनेत पात्र असाल आणि अर्ज करून लाभ घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही दिलेल्या लेखामधून अर्जाची प्रकिया जाणून घेऊ अर्ज करा आणि तुमच्यासाठी सरकारकडून मोफत घर मिळवा. त्याचप्रमाणे आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कुटुंबातील गरजू नागरिकांना पाठवून त्यांचीसुद्धा मदत करा.
सरकारकडून सुरु होणाऱ्या अशाच नवीन योजनांसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करू शकता आणि Telegram/WhatsApp ला जॉईन करून लेटेस्ट अपडेट्स मिळवू शकता.
FAQs
महाराष्ट्रात घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नव बौद्ध वर्गातील नागरिक पात्र आहेत.
घरकुल साठी काय काय कागदपत्रे लागतात?
घरकुलासाठी आधारकार्ड, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आणि वार्षिक उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र लागतात.
आवास योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन जाऊन करू शकतो.
रमाई आवास योजनेचा फायदा काय?
या आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत घर भेटण्याचा फायदा मिळतो.
पुढे वाचा: