Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana 2024: केंद्र सरकारने देशामधील बेरोजगार नागरिकांसाठी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार मदत करतात.
आपल्या देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढले आहेत. त्यामध्ये बेरोजगार नागरिकांना रोजगार जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांमुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण होते.
या समस्यांना दूर करण्यासाठी केंद्र सरकार नेहमीच नवीन नवीन योजनांची सुरुवात करत असतात. ज्यामधून बेरोजगारांना रोजगाराची संधी, आर्थिक मदत व मोफत प्रशिक्षण देऊन केंद्र सरकार मदत करत असते. या योजनेमधून व्यवसाय क्षेत्रातील मालकांना व कर्मचाऱ्यांना फायदा करून देण्यासाठी नवीन योजनेची सुरुवात केली.
आज आपल्या लेखात प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना म्हणजेच PMRPY बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही एक उद्योगपती किंवा बिजनेसमॅन असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
यामध्ये आपण जाणून घेणार आहोत, ही योजना काय आहे? त्यांचे मुख्य उद्देश कोणतं आहेत? यामध्ये कोणकोणते फायदे दिले जाते? यासाठी अर्ज करताना पात्रता काय असणार? यामध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार? आणि अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकियांना फॉलो करावे लागणार? अशा सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत लेख पहा.
Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana in Marathi
केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनांची सुरुवात ऑगस्ट 2016 मध्ये करण्यात आली होती. ही योजना लक्ष केंद्रित करते रोजगार प्रोत्साहन या विषयावर. यामध्ये उद्योगपती व बिजनेसमॅन आपल्या कामासाठी नवीन कर्मचाऱ्यांना कामावर घेत असतील आणि रोजगाराला प्रोत्साहन देत असतील तर PMRPY योजनेचा लाभ घेऊ शकतात.
केंद्र सरकाने देशभरातील बेरोजगारांना रोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. Ministry of Labour and Employment या योजनेची अंमलबजावणी करतात. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून रोजगार निर्माण करण्याऱ्या मालकांना 12% EPS योगदान प्रदान करते. तसेच EPF व EPS पेमेंट भरले जाते.
जर तुमचे ऑफिस PF अंतर्गत रजिस्टर असेल तर EPF मध्ये दोन प्रकारचे योगदान भरावे लागतात. ज्यामध्ये Employee व Employer या दोघांचे योगदान भरावे लागते आणि पीएफ अंतर्गत 12% दोघांना आहे.
जे Employer आहेत, त्यांच्यामध्ये EPF आणि EPS असे दोन योगदान असते. EPF अंतर्गत ३.६७% जमा होतात व EPS मध्ये 8.33% जमा होते. जे मिळून एकूण 12% होते. जर मालक PMRPY अंतर्गत रजिस्टर असेल आणि नवीन कमर्चारी कामावर घेत असतील तर EPS असणारे 8.33% योगदान केंद्र सरकार भरते.
Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना (PMRPY) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
लॉन्च केली | केंद्र सरकारने |
कधी लॉन्च केली | 07 ऑगस्ट, 2016 |
विभाग | श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी प्रोत्साहन करणे |
लाभार्थी | भारत देशामधील नागरिक |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | pmrpy.gov.in |
Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana Objective
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनाचे मुख्य उद्देश देशामधील बेरोजगार वर्गातील नागरिकांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी प्रोत्साहन करणे आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील उद्योग व बिजनेस करणारे नागरिक बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करत असतील तर त्यांना आर्थिक स्वरूपात मदत करणे आहे.
ज्यामध्ये केंद्र सरकार पीएफ अंतर्गत रजिस्टर असणाऱ्या कंपन्यांना किंवा कार्यालयांना बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ज्यामध्ये PMRPY अंतर्गत केंद्र सरकार ईपीएसमधील 8.33% ची रक्कम स्वतः भरते.
केंद्र सरकारचे ध्येय भारत देशामधील बेरोजगारी प्रमाण कमी करून अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे. त्याचसोबत तरुण पिढीसाठी नवीन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.
या आर्थिक मदतीमुळे बेरोजगार नागरिकांना एकाप्रकारे भविष्यासाठी पेन्शन रक्कम जमा होईल. या मिळणाऱ्या फायद्यामधून जास्तीत जास्त बेरोजगारांना प्रोत्साहन देऊन देशामधील बेरोजगारी प्रमाण कमी करणे हे लक्ष्य सरकारचे आहे.
Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana Benefits
- केंद्र सरकारतर्फे सुरु केलेल्या प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनाचे फायदे देशामधील बेरोजगार वर्ग, उद्योगपती व बिजनेस करणाऱ्या नागरिकांना होतो.
- या योजनेच्या माध्यमातून देशभरात रोजगार निर्माण करण्यासाठी आणि बेरोजगारांना काम मिळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
- ज्या कंपन्या PF अंतर्गत रजिस्टर्ड आहेत, त्यांना केंद्र सरकारकडून EPS मध्ये योगदानाची सूट दिली जाते.
- बिजनेसच्या मालकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ईपीएसमध्ये मालकांना भरावे लागणारे 8.33% केंद्र सरकार भरते.
- या आर्थिक मदतीमुळे मालकांना जास्तीत जास्त कर्मचारी कामामध्ये घेण्यास मदत मिळेल आणि बेरोजगारांना काम मिळेल.
- केंद्र सरकार अशा पद्धतीने बेरोजगारांसाठी सामाजिक सुरक्षा प्रदान करत आहेत.
- PMRPY योजनेच्या माध्यमातून देशामधील अर्थव्यवस्थेत सुधार करण्यात मदत होते.
- नवीन कर्मचारी रजिस्टर झाल्यावर पहिल्या तीन वर्षात कंपनीच्या मालकांना भरावे लागणारे १२% ईपीएस केंद्र सरकारकडून भरले जातात.
- या योजनेतून आपल्या देशामधील बेरोजगारी प्रमाण करण्यात मदत मिळते.
- केंद्र सरकारच्या या मोहिमेतून देशभरातील बेरोजगारांना नोकरी प्राप्त होऊन भविष्यात पेंशन म्हणून आर्थिक मदत मिळेल.
Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana Eligibility
नागरिकांना लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनामध्ये पात्र असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्या पात्रतेच्या अटींचा समावेश आहे? त्याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
- जे नागरिक PMRPY अंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक आहेत, ते भारताचे स्थानिक रहिवासी असणे.
- फर्म चालविणाऱ्या मालकांकडे LIN (Labour Identification Number) नंबर असणे बंधनकारक आहे.
- या योजनेचा लाभ Semi-Skilled व Unskilled Labour यांनाच घेता येणार.
- अर्ज करणाऱ्या नागरिकांचे पगार 15,000 रुपयांपेक्षा कमी असणे.
- एम्प्लॉयी EPF Act नुसार रजिस्टर असणे महत्त्वाचे आहे.
- त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांकडे आपला UAN (Universal Account Number) असणे आवश्यक आहे.
- कर्मचाऱ्यांकडे आपले सर्व कागदपत्रे व व्हॅलिड आधारकार्ड असणे.
- एप्रिल 2016 नंतर जे कर्मचारी कामामध्ये जॉईन झाले आहेत ते योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे जुने एपफ् रजिस्टर्ड नसावे.
- या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कंपन्यांना ईपीएफ ऍक्ट 1952 अंतर्गत नोंदणी केलेले असणे.
- प्रत्येक क्षेत्रातील कंपन्यांकडे बँक खाते असणे महत्त्वाचे आहे.
- कंपनीमधील नवीन कर्मचारी फक्त या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana Required Documents
नागरिकांना अर्ज करताना प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनामध्ये आवश्यक असणारे कागदपत्रे सोबतीला असणे आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे सांगितली आहे.
- अर्जदारांचे व्हॅलिड आधारकार्ड
- रेशन कार्ड
- जन्माचे प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- वार्षिक उत्पन्न दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- LIN नंबर
Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana Registration
ज्या नागरिकांना प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनामध्ये अर्ज करायचा आहे, त्यांनी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्यासाठी नागरिकांना सर्वात पहिले PMRPY च्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल.
- योजनेच्या वेबसाइटमध्ये गेल्यावर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल.
- त्या होमपेजमध्ये तुम्हाला योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अर्जाचे फॉर्म उघडून येईल.
- ते फॉर्म संपूर्ण वाचून घेणे व लक्षपूर्वक विचारली गेलेली माहिती भरून घेणे.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करणे.
- अपलोड केलेली कागदपत्रे व फॉर्म तपासून सबमिट बटनावर क्लिक करणे.
- अशा प्रकारे तुमचे अर्ज यशस्वीपणे पूर्ण होईल आणि तुम्ही पात्र असाल तर लाभ दिला जाईल.
Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana Login Process
- प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनाच्या पोर्टलमध्ये लॉगिन करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइटमध्ये जाणे.
- पोर्टलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला होमपेजमध्ये लॉगिनचा पर्याय दिसेल, त्यामध्ये जायचे आहे.
- त्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल.
- नवीन पेजमध्ये तुम्हाला तुमचे LIN नंबर किंवा PF कोड टाकावा लागेल.
- कोड टाकल्यानंतर पासवर्ड टाकून सबमिट बटनावर क्लिक करणे.
- अशा पद्धतीने पोर्टलमध्ये लॉगिन करू शकता.
निष्कर्ष
अशा प्रकारे आम्ही तुम्हाला Pradhanmantri Rojgar Protsahan Yojana संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तररित्या मार्गदर्शन केले. यामध्ये आम्ही योजनेचे महत्त्व काय होते? ती का सुरु करण्यात आली होती? त्यामधून कोणाला फायदा होत होता? ती कोणी सुरु केली होती? कशासाठी सुरु केली गेली? यामागे मुख्य उद्देश काय होते? यासाठी कोणते विभाग नेमले गेले? यामध्ये कोणते फायदे लाभार्थ्यांना दिले जात होते? त्याचप्रमाणे पात्रेच्या अटी कोणत्या लागू करण्यात आले होते? अर्जदारांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार होती? योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या प्रक्रियांना फॉलो करणे आवश्यक होते? तसेच योजनेच्या पोर्टल मध्ये कशाप्रकारे लॉगिन करू शकतो? याबद्दल संपूर्ण माहिती या लेखातून सांगितली.
आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आमच्या वेबसाइटला Subscribe करून ठेवा किंवा Telegram/WhatsApp चँनेलला जॉईन करा. जेणेकरून योजनांच्या नवीन नवीन अपडेट्स पहिल्या तुम्हाला मिळतील.
FAQs
प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना कधी सुरु केली होती?
केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात 07 ऑगस्ट, 2016 रोजी करण्यात आली होती.
PMRPY योजनेचे उद्देश काय होते?
या योजनेच्या माध्यमातून देशामधील बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी केंद्र सरकार सगळ्या सेक्टरमधील कंपन्यांना पीएफमध्ये आर्थिक मदत करून प्रोत्साहन करणे होते.
पीएम रोजगार प्रोत्साहन योजनेसाठी कोण पात्र होते?
या योजनेमध्ये 15000 रुपयांपेक्षा कमी पगार असलेले व एप्रिल 2016 नंतर कामामध्ये जॉईन झालेलं कर्मचारी पात्र होते.
पुढे वाचा: