Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana 2024: केंद्र सरकारने संपूर्ण भारतामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY) सुरु केली होती. केंद्र सरकारचे या योजनेच्या माध्यमातून मुख्य उद्देश आरोग्य सेवा प्रणालीमध्ये सुधार करण्यासाठी विविध प्रकारचे पाऊले उचलणे. ज्यामध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या मेडिकल सुविधा जागोजागी उपलब्ध असतील.
आपल्या देशामध्ये काही असे शहर आणि ग्रामीण भाग आहेत, त्याठिकाणी मेडिकल सुविधा उपलब्ध नाही. त्याचसोबत मेडिकल सुविधा जरी उपलब्ध असतील, तरीही मोठमोठ्या गंभीर आजारासाठी उपचार पद्धती नाहीत. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये योग्य सामग्री, औषधे, पायाभूत सुविधा व विविध उपचार नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य विषयी समस्यांना सामोरे जावे लागते.
अशा सर्व गोष्टींमुळे केंद्र सरकारने 2003 रोजी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनाची सुरुवात केली. जेणेकरून नागरिकांना आपल्या क्षेत्रात योग्य आरोग्य सेवा उपलब्ध होतील. आजच्या आपल्या लेखात याच योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, तर आर्टिकल शेवटपर्यंत पाहत रहा.
Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana in Marathi
वर्ष 2003 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून PMSSY म्हणजे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनाची सुरुवात करण्यात आली होती. याची अंमलबजावणी Ministry of Health and Family Welfare ही नोडल मिनिस्ट्री करते.
PMSSY योजनेच्या माध्यमातून भारत देशामध्ये AIIMS म्हणजे All India Institute of Medical Science उभारण्यात येते आणि सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये देखील सुधार केले जातात. त्याचसोबत आरोग्य सेवा संबंधित पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येते.
जेणेकरून देशभरातील सर्व नागरिकांना सुलभ व स्वस्त आरोग्य सेवा सहजरित्या प्राप्त होण्यास मदत मिळेल. त्याचसोबत कोणत्याही नागरिकांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती उपचार घेण्यास जावे लागणार नाही.
Components of Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana
केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना अंतर्गत दोन घटकांचा समावेश केला आहे, ज्यामधून आरोग्य सेवा देशभरात पसरवली जाते. याच घटकांबद्दल खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे.
Setting Up of AIIMS
PMSSY च्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामधील राज्यांमध्ये वैद्यकीय शास्त्र संस्था उभारण्यात येते. ज्यामध्ये Modular OTs व Diagnostics सुविधा, 15-20 Super Specialty विभाग, हॉस्पिटलमध्ये बेड्स, UG (MBBS) Seats व B.Sc (Nursing) Seats यांसारखे फॅसिलिटी प्रदान केली जाते. त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांच्या संशोधन व PG म्हणजेच Postgraduate शिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाते.
भारतामध्ये आतापर्यंत एकूण 22 नवीन AIIMS ची घोषणा करण्यात आली होती, त्यामधील ६ AIIMS हे तयार करून त्यामध्ये कार्य चालू आहेत. बाकीचे 16 AIIMS कॅबिनेटतर्फे उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
Upgradation of Government Medical Colleges (GMC)
संपूर्ण भारतामधील सरकारी वैद्यकीय कॉलेज संस्थेमध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनाच्या माध्यमातून सुधार करण्यात येते. ज्यामध्ये कॉलेजच्या पायाभूत सुविधांचे सुधार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. केंद्र शासनाच्या मदतीने आतापर्यंत 75 असे प्रकल्प विविध फेसमध्ये राबविण्यात आलेले आहेत.
मेडिकल कॉलेज सुधार करण्याच्या प्रकल्पात केंद्र सरकार प्रत्येक ठिकाणी 8 ते 10 Super Specialty विभाग तयार करतात. तसेच कॉलेजमध्ये आणखी नवीन 15 पदव्युत्तर जागा वाढविल्या जातात. त्याचप्रमाणे 150 ते 250 बेडच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
PMSSY Budget Chart
खर्चाचे वाटप | रक्कम |
प्रत्येक नवीन AIIMS तयार करण्यासाठी करण्यात येणारे खर्च | 820 कोटी रुपये |
अस्तित्वात असलेल्या प्रत्येक Government Medical Colleges (GMC) चे अपग्रेड करण्यासाठी खर्च | 50 कोटी रुपये |
Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana 2024 Overview
योजनेचे नाव | प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु करण्यात आली | वर्ष 2003 साली |
नोडल मिनिस्ट्री | आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | भारतामधील सर्व राज्यांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | भारत देशामधील सर्व नागरिक |
लाभ | नवीन वैद्यकीय शास्त्र संस्था व जुन्या मेडिकल कॉलेजमध्ये सुधारणा |
अधिकृत वेबसाइट | pmssy.mohfw.gov.in |
Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana Aim
केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनाचे मुख्य उद्देश संपूर्ण भारत देशामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्यसेवा प्रणालीला स्थिर ठेवणे आहे. जेणेकरून भारत देशामधील सर्व रहिवास्यांना वैद्यकीय सुविधा सहज व स्वस्त दरात प्राप्त होतील आणि त्यांना योग्यरीत्या उपचार होण्यात मदत होईल.
आपल्या देशामधील काही राज्य व भागांमध्ये नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, यामुळे त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये उपचार घेण्यासाठी जावे लागते. यासाठी केंद्र सरकारचे पहिले उद्देश आरोग्यसेवा सिस्टिममध्ये स्थिरता ठेवणे.
PMSSY योजनेच्या माध्यमातून दुसरे मोठे उद्देश म्हणजेच प्रत्येक राज्यांमध्ये वैद्यकीय शास्त्र संस्था उभारणे. ज्यामध्ये पहिल्या फेज अंतर्गत 22 AIIMS तयार करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहेत. त्याचप्रमाणे तिसऱ्या उद्देशामध्ये जुन्या आणि ब्रिटिश काळात मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व संस्था तयार करण्यात आले होते, त्यांना अपग्रेड करणे व त्यामध्ये नवीन यंत्रणा व पायाभूत सुविधा उपलब्ध करणे.
Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana Benefits
- प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनाचे फायदे म्हणजे सामान्य नागरिकांपर्यत योग्य व स्वस्त वैद्यकीय सुविधा पोहोचविल्या जातात.
- या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक राज्यामध्ये नवीन AIIMS Institutions उभारण्यात येणार.
- त्याप्रमाणे जुन्या काळातील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व संस्था अपग्रेड केले जातील.
- प्रत्येक कॉलेजमध्ये योजनाच्या मदतीने वैद्यकीय पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार.
- तसेच प्रत्येक मेडिकल कॉलेज अपग्रेड करण्यासाठी विविध राज्य केंद्रासोबत मिळून खर्च करते.
- वैद्यकीय कॉलेजमधील शिक्षणामध्ये सुधारणा करून त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार.
- PMSSY अंतर्गत केंद्र सरकारने पहिल्या फेजमध्ये 6 AIIMS Institute सेटअप केले आहेत जे कार्यशील आहेत. त्याचसोबत दुसऱ्या फेजमध्ये पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये शासनातर्फे 2 AIIMS चे सेटअप करण्यात आले.
- तसेच पहिल्या फेजमध्ये अस्तित्वात असलेले सरकारी वैद्यकीय कॉलेजमधील 13 संस्था अपग्रेड करण्यात आले आहेत आणि दुसऱ्या फेजमध्ये 6 कॉलेजमध्ये वैद्यकीय सुधारणा करण्यात आले.
- सहा वैद्यकीय शास्त्र संस्था मध्यप्रदेश, ओडिसा, राजस्थान, बिहार, छत्तीसगड आणि उत्तराखंड या राज्यामध्ये उभारण्यात आले आहेत.
- केंद्र सरकारच्या माध्यमातून राहिलेले AIIMS तयार करण्याचे काम चालू आहेत.
Improvement Data under Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana
PIB च्या माहितीनुसार प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना अंतर्गत सुधारणा करण्यात आलेल्याचा डेटा खालीलप्रमाणे तक्त्याच्या स्वरुपात मांडले आहेत.
सुधारणा | 2014 मधील संख्या | 2023 मधील संख्या |
Medical Colleges | 387 | 660 |
AIIMS | 7 | 2 |
PG Seats | 31,185 | 65,335 |
MBBS Seats | 51,348 | 1,01,043 |
Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana Funding Pattern
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या कामांसाठी केंद्र व राज्य सरकार दोघे मिळून खर्च करतात. PMSSY योजनेच्या अंतर्गत नवीन वैद्यकीय शास्त्र संस्थाचे सेटअप करण्यासाठी जवळपास 820 कोटी रुपयांची वाटप केले जाते. प्रत्येक AIIMS तयार करण्यासाठी 820 कोटी रक्कम खर्चासाठी दिले जाते.
त्याचप्रमाणे सुरुवातीला भारतामधील जुन्या सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये सुधारणा करण्यासाठी 120-125 कोटी रुपयांची वाटप केले जात होते. परंतु वाढत्या महागाईमुळे 125 कोटी रुपयांच्या रक्कमेत वाढ करून ती 150 कोटी करण्यात आलेले आहेत. प्रत्येक मेडिकल कॉलेजच्या अपग्रेडसाठी 150 कोटी रुपयांच्या खर्चामध्ये 25 कोटी रुपये राज्य सरकार तर उरलेले बाकीचे 125 कोटी केंद्र सरकार खर्च उचलते.
Pradhan Mantri Swasthya Suraksha Nidhi (PMSSN)
2021 रोजी कॅबिनेटतर्फे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधीसाठी मान्यता देण्यात आलेली होती. यामध्ये देण्यात येणारी रक्कम एक प्रकारे Non-Lapsable Reserve Fund असणार आहे, म्हणजेच यामधील जेवढे फंड असेल त्याचे 1 ते 2 वर्ष वापरले नाही तरी ते त्याचे वापर दुसऱ्या पायाभूत सुविधांच्या कामासाठी करण्यात येतात.
केंद्र सरकार 2018 रोजी Ayushman Bharat Yojana ची घोषणा करत असताना जी जुनी Education Cess 3% होती, ती वाढवून 4% आरोग्य व शिक्षण Cess करण्यात आली. यामधून स्वस्त दरात मेडिकल सुविधा उपलब्ध होणार.
त्याचप्रमाणे PMSSN निधीचा वापर Ayushman Bharat – Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB-PMJAY), Ayushman Bharat – Health and Wellness Centres (AB-HWCs), राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत, PMSSY आणि SDGs यासाठी करण्यात येतो.
निष्कर्ष
आमच्या लेखाच्या माध्यमातून Pradhan Mantri Swasthya Suraksha Yojana संदर्भात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना काय आहे? ती कधी सुरु करण्यात आली होती? कोणत्या कारणामुळे सुरु करण्यात आली? कोणासाठी सुरु करण्यात आली? सुरु करण्यामागचे मुख्य उद्देश केंद्र सरकारचे काय होते? कोणत्या घटकांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आले आहे? योजनेसाठी कश्याप्रकारे खर्च केला जातो? कोणकोणते फायदे यामधून दिले जातात? आणि मागील काही वर्षांमध्ये किती प्रगती झाली आहे? अशा सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर केंद्र व राज्य सरकारच्या येणार नवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या वेबसाइटला Subscribe करू शकता किंवा Telegram/WhatsApp ग्रुपला जॉईन करू शकता.
FAQs
प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी म्हणजे काय?
या निधीमधून आरोग्य क्षेत्रात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च जमा केला जातो.
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेची उद्दिष्टे काय आहेत?
या योजनेचे मुख्य उद्देश भारत देशामध्ये वैद्यकीय शास्त्र संस्था उघडणे व जुन्या मेडिकल कॉलेजमध्ये सुधारणा करणे आहे.
PMSSY कधी सुरू करण्यात आले?
केंद्र सरकारने PMSSY ची सुरुवात 2003 रोजी केली होती.