Pradhan Mantri Mudra Yojana 2024: केंद्र सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत देशभरातील नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन देत आहे. ही योजना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आधी 50 हजार रुपये ते 10 लाख लोन व्यवसाय सुरु करण्यासाठी दिले जायचे, परंतु 2024 च्या अर्थसंकल्पनेत वित्त मंत्री निर्मला सीतारमण घोषणा यांनी घोषणा केली की, लोनची मर्यादा 10 लाखांपेक्षा वाढवून 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे.
मागील काही आर्टिकल्समध्ये आम्ही सांगितले, छोटे-छोटे व्यवसाय सुरु करण्यासाठी कशाप्रकारे सरकार ने सुरु केलेल्या योजनांच्या माध्यमातून तुम्ही लोन घेऊ शकता. या लेखात सुद्धा अशाच बिजनेस लोनच्या योजना संदर्भात जाणून घेणार आहोत, ज्याचे नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना असे आहे. या योजनेच्या माध्यमातून देशामधील नागरिक छोटे व मध्यम व्यवसाय सुरु करण्यासाठी मुद्रा लोन घेऊ शकता.
तुम्हाला सुद्धा छोटा व्यवसाय चालू करायचा आहे आणि तुम्ही या योजनेसाठी इच्छुक असाल, तर आम्ही या लेखात योजने संबंधित संपूर्ण माहिती सांगितली आहे. ती शेवटपर्यंत पहा. यामध्ये आम्ही योजना काय आहे? त्यांचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रकिया याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
Pradhan Mantri Mudra Yojana in Marathi
केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनाची सुरवात 8 एप्रिल, 2015 रोजी केली. या योजनेच्या माध्यमातून देशामधील गरीब व मध्यम वर्गातील नागरिकांना आपले व्यवसाय सुरु करण्यासाठी लोनच्या स्वरूपात आर्थिक मदत मिळवून दिली जाते. सरकारने सुरु केलेली ही योजना भरपूर प्रमाणात लोकप्रिय झाली. या योजनेच्या माध्यमातून मागील आठ वर्षांमध्ये देशामधील 40 करोडपेक्षा जास्त लोकांनी लोन घेतले आहे.
मुद्रा ही एक बँक नसून ती रिफायनान्सिंग संस्था आहे. मुद्रा मधून डायरेक्ट लोन मिळत नाही यासाठी लोन बँकेतर्फेच दिले जाते. केंद्र सरकार बँकेला मुद्रा योजनेतुन फायनांन्स पुरवतो. त्यामुळे ज्या ही नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून छोटे व मध्यम उद्योग चालू करण्यासाठी लोन पाहिजे ते जवळच्या बँकेत जाऊ शकतात.
Types of Mudra Loans Yojana
नागरिकांना प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत तीन प्रकारच्या योजनांमधून लोन दिले जाते ते खालील प्रमाणे दिलेले आहेत.
Shishu Yojana
शिशु योजना अंतर्गत नागरिकांना पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. जेव्हा तुमचे व्यवसाय नवीन नवीन आहे आणि छोटा आहे अशा परिस्थिती या योजनातुन कर्ज दिले जाते. नागरिकांना शिशु लोन अंतर्गत बँकेमध्ये आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे लावावे लागत नाही.
Kishore Yojana
किशोर योजना म्हणजे जेव्हा तुमचा व्यवसाय थोडा मोठा झाला आहे आणि अजून वाढवायचा बघत असाल तर त्या केसमध्ये ५० हजार रुपये ते ५ लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकेल.
Tarun Yojana
तरुण योजना अंतर्गत ज्या नागरिकांचे व्यवसाय मोठे झाले आहे आणि त्यांना व्यवसाय डायव्हर्सिफाय करायचा आहे, त्यांना 5 लाख ते 20 लाख कर्जासाठी अर्ज करू शकता.
Pradhan Mantri Mudra Yojana Details 2024
योजनाचे नाव | प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
कोणी सुरु केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
कधी सुरु केली | 8 एप्रिल, 2015 रोजी |
एजन्सी | मायक्रो युनिट्स डेव्हलोपमेंट्स आणि रिफायनान्स एजन्सी लिमिटेड |
उद्देश | देशामधील नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन उपलब्द करून देणे. |
लाभ | पन्नास हजार रुपये ते वीस लाख रुपयेपर्यंत लोन |
लाभार्थी | छोटे व मध्यम व्यवसाय सुरु करणाऱ्या नागरिकांसाठी |
अर्ज पद्धत | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | mudra.org.in |
Pradhan Mantri Mudra Yojana Aim
भारत सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनाचे मुख्य उद्देश देशामधील नागरिकांसाठी रोजगार निर्मिती करून उत्पन्न वाढविण्यास प्रोत्साहन देणे हे आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब वर्गातील नागरिकांना आपला उद्योग चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे समस्यांना सामोरे जाऊ नये यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
जर एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सुरु करायचा असेल, परंतु त्याच्याकडे रोजगाराचे पुरावे नसतील तर बँकेतून लोन भेटणे कठीण होते. तसेच ज्या नागरिकांकडे इनकमचा पुरावा आहे, तर त्यांना बँकेतून बिजनेस लोन दिले जाते, परंतु तिथे जास्त व्याजदर द्यावा लागतो, त्याचसोबत काहींना काही ग्यारंटी द्यावी लागते.
केंद्र सरकारच्या PMMY योजनेत देशामधील कोणत्याही नागरिकांना आपले बिजनेस सुरु करण्यासाठी ग्यारंटी शिवाय सहज लोन दिले जाते. केंद्र सरकारचे मुख्य ध्येय हेच आहेत की नागरिकांनी छोटे-मोठे व्यवसाय उघडून प्रत्येक राज्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
Pradhan Mantri Mudra Yojana Benefits
- प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे फायदे देशामधील गरीब कुटुंबातील नागरिक घेऊ शकतात.
- या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सेटअप करण्यासाठी नागरिकांना लोनच्या स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
- नागरिकांना मिळणारे हे लोन नागरिक जवळच्या कोणत्याही बँकेमधून काढू शकतात.
- लाभार्थींना या योजने अंतर्गत कमी व्याज दरात लोन देण्यात येते.
- या योजने अंतर्गत नागरिक आपल्या व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपासून ते 20 लाख रुपयांच्या आत लोन रक्कमसाठी अर्ज करू शकतो.
- नागरिकांना मुद्रा लोनसाठी बँकेतर्फे वर्षाला 9% ते 10% व्याज दर लावला जातो.
- नागरिकांना मुद्रा लोन घेताना कोणत्याही प्रकारचे ग्यारंटी बँकेला द्यावी लागत नाही.
- ग्रामीण व शहरी क्षेत्रात राहणारे व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- या योजनेतून Salon, Beauty Parlour, Gym, Tailoring shop व Garage या व्यवसायासाठी सुद्धा लोन घेता येईल.
- देशामधील जे नागरिक टिफिन सेवा व कॅन्टीन चालवतात त्यांना सुद्धा योजनेचा लाभ दिला जातो.
- त्याचप्रमाणे टेक्सटाइल व हॅन्डलूम जसे चिकनकरी, खादी, शिलाई याप्रकारे कोणतेही व्यवसाय करायचे असले तरी साकारतर्फे लोन दिले जाते.
- सरकार शेतीच्या उद्देशासाठी यामधून लोनसाठी मंजुरी देत नाही. परंतु संबंधित व्यवसाय करण्यासाठी जसे दूध डेरी, मधमाशी पालन, मस्त्यपालन, पशुधन यासाठी कर्ज दिले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना Term Loans व Working Capital Loans या दोन्ही प्रकारचे कर्ज दिले जाते.
- नागरिक Public, Private Banks, RRB, Small Finance Banks, MFIs व NBFCs या बँकेतून योजने अंतर्गत कर्ज घेऊ शकतात.
Pradhan Mantri Mudra Yojana Eligibility
नागरिकांना बिजनेस लोनचे लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनासाठी पात्र खालीलप्रमाणे दिलेल्या पात्रतेच्या अटीनुसार असणे आवश्यक आहेत.
- लाभ घेण्यासाठी या योजने अंतर्गत लाभार्थी भारताचा स्थानिक रहिवासी असणे.
- या योजनेमधून फक्त Non-Corporate बिसनेस करणाऱ्या व्यक्तीलाच लोन दिले जाते.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीला सर्वात प्रथम उद्यम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
- मोठ्या व्यवसाय करणाऱ्या कंपनीला लोन दिले जात नाही.
- सरकारतर्फे योजनेमधून स्मॉल आणि मायक्रो बिजनेससाठी लोन दिले जाते.
- व्यवसाय चालू करणारे व्यक्ती व नवीन बिजनेस सुरु करणारे व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकतात.
- लाभार्थींना योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी 18 ते 65 वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- योजनेतुन लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या आधीचे कोणतेही लोन चुकलेले नसावे.
- त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचे क्रेडिट्स स्कोर खराब असेल तर लोन मिळू शकणार नाही.
- यामध्ये individuals, Proprietors, Partnership आणि Companies लोनसाठी अर्ज करू शकतात.
- जे नागरिक Traders, shop keepers, Manufacturing, Retail, Services व Vendors या क्षेत्रात आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत.
- ज्या नागरिकांना व्यावसायीक उद्देशाने ट्रान्सपोर्ट वाहन जसे रिक्षा, टॅक्सी, ट्रॅक्टर व ई-रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करत असाल तर अर्ज करू शकता.
- फूड उद्योग क्षेत्रातील व्यापारीसुद्धा यामध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत.
- जे नागरिक फ्रुट व्यवसाय व किराणा दुकान चालवितो तो सुद्धा अर्ज करू शकतो.
Pradhan Mantri Mudra Yojana Required Documents
नागरिकांना अर्ज करताना प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे यादीनुसार दिलेली आहेत.
- आधारकार्ड
- पॅनकार्ड / पासपोर्ट
- वोटर आयडी
- रहिवासी प्रमाणपत्र (टेलेफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा प्रोपोर्टी टॅक्स पावती)
- २ पासपोर्ट साइज फोटो
- जातीचा दाखला
- बिजनेस पत्त्याचा पुरावा
- इनकम टॅक्स रिटर्न (ITR)
- बँक पासबुक
- बँक स्टेटमेंट (6 महिन्यांचा)
- सेल्स टॅक्स रिटर्न (STR)
- मोबाईल नंबर
- बिजनेस प्लान (लिखित पत्र)
- प्रोजेक्ट बॅलन्स शीट
- लास्ट सेल्स
- प्रोजेक्ट रिपोर्ट
Pradhan Mantri Mudra Yojana Registration
नागरिकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियानुसार स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करावे लागेल.
- सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल.
- त्या होमपेजमध्ये तीन पर्याय जसे शिशु, तरुण आणि किशोर यापैकी तुमच्यानुसार एकाची निवड करणे.
- निवड केल्यानंतर तुमच्या समोर त्या योजनेचा Application Form उघडून येईल.
- तो एप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करून घ्या.
- प्रिंट झाल्यानंतर त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा.
- फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी सगळी कागदपत्रे सोबत जोडा.
- तो भरलेला फॉर्म व कागदपत्रे नीट तपासून तुमच्या जवळील बँकेत जाऊन जमा करणे.
- त्यानंतर बँकेतील अधिकाऱ्याकडून तुमचे फॉर्म तपासले जातील..
- तुम्ही पात्र असाल तर कर्जाची रक्कम 20 दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
- अशा प्रकारे तुमचे या योजनेसाठी अर्ज प्रकिया पूर्ण झालेली आहे.
निष्कर्ष
आम्ही आशा करतो की, Pradhan Mantri Mudra Yojana संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. यामध्ये आम्ही योजने महत्व, लॉन्च डेट, त्यांचे उद्देश, त्यांचे फायदे, यासाठी पात्रता, लागणारे आवश्यक कागदपत्रे, स्टेप बाय स्टेप अर्ज प्रकिया आणि योजनांचे प्रकार या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तारित्या मार्गदर्शन केले. तुम्ही सुद्धा व्यवसाय करू पाहत आहेत, परंतु लोन भेटण्यात मदत होत नसेल तर ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
आमचा हा लेख आवडला असेल तर आमच्या वेबसाइटला Subscribe करू शकता किंवा Telegram/WhatsApp ला जॉईन करू शकता. जेणेकरून नवीन नवीन योजनांची माहिती पहिली तुम्हाला मिळेल.
FAQs
मुद्रा कर्जासाठी कोण पात्र आहे?
या कर्जसाठी छोटे व मध्यम व्यवसाय करणारे व्यक्ती पात्र आहेत.
मुद्रा लोन व्याजदर किती आहे?
वर्षाला 9% ते 10% मुद्रा लोन व्याजदर घेतले जाते.
मुद्रा लोनसाठी काय करावे लागेल?
या लोनसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून व फॉर्म भरून कोणत्याही बँकेत जमा करावे लागेल.
पुढे वाचा: