Pradhan Mantri Matru Vandana Yojana Registration: या आर्टिकलमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्टेप बाय स्टेप ऑनलाइन प्रक्रिया दिलेल्या आहेत, त्यानुसार अर्ज करून मिळवा आर्थिक लाभाचे फायदे.
भारत देशामधील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 2022 रोजी पीएम मातृ वंदना योजनाची सुरुवात केली होती. या योजने अंतर्गत ज्या गर्भवती महिलांनी अर्ज केला आहे, त्यांना 5 हजार रुपये आर्थिक स्वरूपात मदत केली जाते.
Read More: PM Matru Vandana Yojana
या योजनेमध्ये सहभागी असलेल्या महिलांना तीन टप्प्यांमध्ये रक्कम दिली जाते, ज्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात 1 हजार रुपये, गरोदर असून सहा महिने पूर्ण झाल्यावर 2 हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्याची राहिलेली रक्कम बाळ जन्माच्या वेळेला देण्यात येते.
गर्भवती महिलांना योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करून घ्यावी लागतात. त्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस पार पाडण्यासाठी pmmvy.wcd.go.in च्या पोर्टलमध्ये जावे लागेल. आपल्या आर्टिकलमध्ये योजनेच्या या अधिकृत पोर्टलमध्ये जाऊन कसे अर्ज करायचे आहे? त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Read More: Janani Suraksha Yojana Online Registration
मातृ वंदना योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- तुम्हाला योजनेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये प्रवेश करायचे आहे.
- पोर्टलच्या डॅशबोर्डमध्ये आल्यावर Citizen Login च्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून Verify चे बटन दाबणे.
- तुमच्या PMMVY योजनेसाठी अकाउंट उघडण्यासाठी फॉर्म येईल.
- त्या फॉर्ममध्ये तुमचे नाव, राज्य, जिल्हा, ठिकाण, ब्लॉक, गाव आणि वॉर्ड निवडा.
- पुढे अर्ज करणाऱ्या महिलेसोबतचे नाते निवडून Create Account वर क्लिक करा.
- पुन्हा पोर्टलच्या डॅशबोर्डमध्ये येऊन Login पर्यायामध्ये जाणे.
- त्यानंतर तुमचा युजर आयडी, पासवर्ड व कॅप्चा कोड टाकून लॉगिन करून घेणे.
- पोर्टलमध्ये लॉगिन झाल्यानंतर Data Entry च्या ऑप्शनला सिलेक्ट करून Beneficiary Registration निवडणे.
- तुमच्या समोर योजनेचा फॉर्म उघडून येईल, त्यामध्ये सर्व माहिती भरून घ्या.
- माहिती भरल्यानंतर जमा केलेली कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा.
- योजने अंतर्गत तुमचा अर्ज इथे पूर्ण झालेला आहे.