Pradhan Mantri Jan Dhan Yojana Eligibility: जन धन खात्यासाठी कोण पात्र आहे? जाणून घ्या संपूर्ण अटी

Pradhan Mantri Jan Dhan Yojana Eligibility: जर तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजनामध्ये खाते उघडण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला काही पात्रतेच्या अटी आमच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणे आवश्यक आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

तसे PMJDY योजनेमध्ये 18 ते 65 वर्षाखालील नागरिक सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. केंद्र सरकारने योजनेमध्ये लागू केलेल्या इतर अटींना सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. त्या अटींनुसार जे कोणी लाभार्थी असतील, त्यांना मोफत Saving Bank Account उघडून दिले जाते. 

त्याचप्रमाणे केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री जन धन योजनाच्या माध्यमातून भारतामधील गरीब वर्गातील नागरिकांना मोफत Jan Dhan Account उघडून दिले जाते. त्याच सोबत 06 महिन्यानंतर 10,000 रुपये Overdraft च्या स्वरूपात दिले जाते. 

तसेच PMJDY म्हणजे Pradhan Mantri Jan Dhan Yojana मध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना PM Jeevan Jyoti Bima Yojana, Mudra Yojana, Atal Pension Yojana आणि Suraksha Bima Yojana अंतर्गत विमा सुरक्षा प्रदान केले जाते. 

प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार आहेत? त्यासाठी किती वयाची अट लागू करण्यात आली आहे? कोणते नागरिक योजनेसाठी पात्र नसणार? आणि कोणकोणत्या अटी केंद्र सरकारने योजनामध्ये लागू केले आहेत? याबद्दल सविस्तर माहिती लेखामध्ये जाणून घेणार आहोत. 

जन धन योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी कोण पात्र आहेत? याबद्दलची संपूर्ण माहिती केंद्र सरकारने लागू केलेल्या अटीनुसार खालीलप्रमाणे दिलेली आहे. त्याच अटीप्रमाणे पात्र असलेल्या नागरिकांना PMJDY योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे फायदे दिले जातात.

  • भारत देशामधील गरीब वर्गापासून ते मध्यम वर्गातील नागरिक योजनेच्या अंतर्गत खाते उघडण्यास पात्र आहेत. 
  • 18 ते 65 वर्ष वयोगटामध्ये मोडत असलेले नागरिक योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतात. 
  • तसेच 10 वर्ष पूर्ण असलेल्या मुलांसाठी त्यांचे आई-वडील Joint Account च्या पद्धतीने खाते उघडू शकतात.
  • योजनेमध्ये पात्र असलेल्या व्यक्तींनी खाते उघडून 2 वर्ष अकाउंटचा वापर न केल्यास ते बँक अकाउंट बंद केले जातील.  
  • जे नागरिक सरकारी कार्यालयामध्ये नोकरी करत आहेत, ते योजनेमध्ये अर्ज करू शकत नाही. 
  • त्याचप्रमाणे देशामधील Tax भरत असलेले नागरिक सुद्धा योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. 
  • योजनेमध्ये अर्ज करताना अर्जदारांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. 
  • त्याचसोबत मतदान कार्ड, पॅनकार्ड, वयाचे प्रमाणपत्र आणि अर्जदाराचे फोटो असणे गरजेचे आहे. 
  • योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने कोणत्याही बँक खात्यामध्ये बचत खाते नसावे.