Skip to content
Yojana Media
  • Home
  • Sarkari Yojana
  • Krushi Yojana
  • PM Yojana
  • Yojana News
  • About Us

Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024: १० वर्ष पूर्ण झाली जन धन योजनेला, जाणून घ्या माहिती

01/09/2024 by surajgadre5
pradhan mantri jan dhan yojana

Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024: भारत देशामधील गरीब नागरिकांना विविध प्रकारचे आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना सुरु केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या या योजनेला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरातील करोडो गरीब लोकांनी यामधून विविध प्रकारचे फायदे सुद्धा घेतले आहेत. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

Table of Contents

Toggle
  • Pradhan Mantri Jan Dhan Yojana in Marathi 
    • Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 Overview
  • Pradhan Mantri Jan Dhan Yojana Purpose
    • Pillars of PM Jan Dhan Yojana 
  • Pradhan Mantri Jan Dhan Yojana Benefits
  • Pradhan Mantri Jan Dhan Yojana Eligibility
  • Pradhan Mantri Jan Dhan Yojana Required Documents 
  • Pradhan Mantri Jan Dhan Yojana Registration 
  • निष्कर्ष 
  • FAQs
    • जन धन योजना योजना काय आहे?
    • जनधन योजना कधी सुरू करण्यात आली?
    • जन धन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

आपल्या देशामध्ये पैशांची बचत करायची एक संस्कृती आहे, जी प्रत्येक घरा घरांमधे दिसून येते. जास्त प्रमाणात कुटुंबामध्ये पैशांची बचत करण्यासाठी महिला वर्ग पुढे असतो. त्यामध्ये त्यांची बचत केलेली रक्कम ही घरात जमा करून ठेवली जाते. 

घरात रक्कम जमा करून ठेवल्यामुळे विविध सुविधांचा फायदा मिळत नाही. जसे बँकेमध्ये जमा करून ठेवल्यावर रक्कमेवर व्याज दर दिले जाते, विविध ठिकाणी गुंतवणूक करून मिळणारे रिटर्न्स आणि बँकेत पैशांची उलाढाल केल्यास Cibil Score चांगला होऊन लोन मिळण्यास मदत होईल. 

त्याचप्रमाणे सरकारच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मिळणारी सबसिडीचा सुद्धा फायदा होतो. परंतु देशामध्ये बचत करायची सवय लागल्यामुळे पुढे जाऊन आर्थिक समस्यांना समोर जावे लागते. ज्यामध्ये हेअल्थसाठी खर्च, शिक्षणासाठी लागणारी फी, घर घेण्यासाठी लोन आणि अशा इतर समस्यांमुळे आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागते. 

या सर्व गोष्टीना गृहीत धरून एकाच ठिकाणी विविध प्रकारचे आर्थिक सुविधा नागरिकांना मिळण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी PMJDY म्हणजेच Pradhanmantri Jan Dhan Yojana अस्तित्वात आणली. 

आज आपण याच प्रधानमंत्री जन धन योजना संबंधित संपूर्ण माहिती आपल्या लेखातून जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये योजनेची सुरुवात कधी करण्यात आली होती? कशासाठी सुरु केली होती? यामध्ये मुख्य उद्देश काय होते? यामधून किती प्रकारचे फायदे नागरिकांना दिले जातात? यासाठी कोण कोण पात्र असणार आहेत? त्याचप्रमाणे अर्ज करून लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात? आणि अर्ज करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला जातो? अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत तर लेख शेवटपर्यंत पहा.  

Pradhan Mantri Jan Dhan Yojana in Marathi 

केंद्र सरकारने 28 ऑगस्ट, 2014 रोजी प्रधानमंत्री जन धन योजनाची सुरुवात केली होती आणि या योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम Ministry of Finance करते. PMJDY योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब कुटुंबातील प्रत्येक नागरिकांना मोफत Saving Bank Account उघडण्याची संधी दिली जाते. त्याचसोबत इतर सुविधासुद्धा पुरविले जाते. 

केंद्र सरकारचे या योजनेमध्ये फक्त मोफत बँक अकाउंट उघडून देणे हे उद्देश नसून, त्यामध्ये लाभार्थ्यांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे आहे. ज्यामध्ये क्रेडिटकार्ड, विमा, पेन्शन, परवडणारे लोन आणि सेविंग व ठेव खाते अशा विविध प्रकारच्या आर्थिक सुविधांचा लाभ दिला जातो. 

त्याचसोबत लाभार्थ्यांना Jan Dhan Account मध्ये 10,000 रुपयां पर्यंतची रक्कम सुद्धा वापरायला दिली जाते. तसेच 1 लाख रुपयांचे अपघाती विमा आणि जीवन कव्हर म्हणून 30,000 रुपये अशी आर्थिक मदत सुद्धा प्रदान केली जाते. लाभार्थ्यांपर्यंत सर्व सुविधांची रक्कम योग्यरीत्या थेट बँकेत जमा होण्यासाठी केंद्र सरकारने DBT म्हणजे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर पर्याय सुरु करून दिला आहे. 

Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024 Overview

योजनेचे नावप्रधानमंत्री जन धन योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
स्थापना28 ऑगस्ट, 2014 रोजी
सुरुवात केलीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
विभागवित्त मंत्रालय, भारत सरकार
उद्देशदेशभरात आर्थिक सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे
लाभार्थीभारत देशामधील नागरिक
लाभविनामूल्य बँक खाते व इतर आर्थिक सुविधा
अर्ज प्रकियाऑफलाइन
Official Websitepmjdy.gov.in

Pradhan Mantri Jan Dhan Yojana Purpose

केंद्र सरकारचा प्रधानमंत्री जन धन योजना सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश देशामधील कोणत्याही नागरिकाला बँकेमध्ये जाऊन विनामूल्य बँक अकाउंट ओपन करण्याची सुविधा व परवडणारे सेवा उपलब्ध करून देणे आहे.  जेणेकरून देशामधील गरीब कुटुंबातील सदस्यसुद्धा बँकिंग सेक्टरचा फायदा घेईल आणि आपली सामाजिक सुरक्षा मजबूत बनवेल. 

गरिबीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खाजगी बँकेत जाऊन अकाउंट उघडणे परवडत नाही. त्याचसोबत इतर सुविधांपासून सुद्धा वंचित राहतात. यामुळे त्यांना आर्थिक खर्चाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. गरिबीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या दिवसाच्या कमाईवर त्यांचे पोट चालते. अशा परिस्थिती त्यांना इतर आर्थिक गोष्टींमध्ये खर्च करण्यासाठी पैसे उरत नाही. 

नागरिकांच्या अशा समस्यांना दूर करण्यासाठी आणि त्यांना आधुनिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने देशामधील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जन धन योजनेचा प्रचार करत आहेत. 

Pillars of PM Jan Dhan Yojana 

  • Universal Banking Services: नागरिकांना ठिकठिकाणी परवडणारे सुविधा उपलब्ध केले जाते. 
  • Overdraft Facility: पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकांना 10 हजार रुपये वापरायला दिले जाते. 
  • Financial Literacy Programme: विविध पेन्शन, क्रेडिट, विमा आणि डिजिटल सुविधांचा प्रचार केला जातो. 
  • Credit Guarantee Fund: सरकारतर्फे बँकेतील शाखेना आर्थिक मदत दिली जाते. 
  • Insurance Benefit: लाभार्थ्यांना यामध्ये अपघाती व जीवन विमा सुरक्षा प्रदान करतात. 
  • Pension Scheme: खाते धारकांना व असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना पेन्शन सुविधा देण्यात येते. 

Pradhan Mantri Jan Dhan Yojana Benefits

  • प्रधानमंत्री जन धन योजनाचा फायदा देशामधील सामान्य नागरिकांना घेता येतो. 
  • या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना Jan Dhan Account उघडण्यासाठी खर्च करावा लागत नाही. 
  • कोणत्याही नागरिकांना विविध कागदपत्रांची जुळवणी करावी लागणार नाही, कारण फक्त आधार नंबरची गरज आहे.  
  • लाभार्थ्यांनी अकाउंट उघडल्यानंतर मोफत Rupay Debit Card दिले जाते, ज्याचा उपयोग कोणत्याही ठिकाणी करू शकता. 
  • जण धन खाते धारकांना 2 लाखांपर्यतचा Accident Insurance Cover सुद्धा दिला जातो. 
  • नागरिकांना अकाउंट उघडून झाल्याच्या 6 महिन्यानंतर 10,000 रुपयांचे Overdraft (OD) सुविधा सुद्धा पुरविली जाते. 
  • त्याचप्रमाणे दहा हजार रुपयांमधील 2,000 रुपये वापरण्यासाठी कोणत्याही अटीची गरज लागत नाही. 
  • गरिबांना विविध आर्थिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी Financial Literacy Programme च्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. 
  • बँकेला खातेदारकांकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक अडचणी होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने Credit Guarantee Fund सुद्धा प्रदान करते. 
  • केंद्र सरकारने योजनेच्या अंतर्गत Direct Benefit Transfer (DBT) सुविधा सुद्धा उपलब्ध केली आहे, जेणेकरून नागरिकांना सहजरित्या थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात मदत होते. 
  • तसेच लाभार्थ्यांना PMJDY अंतर्गत PM Jeevan Jyoti Bima Yojana, Atal Pension Yojana, Pradhan Mantri Suraksha Bima Yojana आणि Pradhan Mantri Mudra Yojana फायदे घेण्यासाठी पात्र ठरतात.
  • खाते धारकांना 30,000 रुपयांपर्यंतचे Life Insurance Cover चा सुद्धा लाभ दिले जातो.
  • PMJDY अंतर्गत आता पर्यंत 23.12 लाख कोटी रक्कम अकाउंटमध्ये जमा आहेत. ज्यामधून बँकिंग सेक्टरला सुद्धा फायदा मिळत आहे. 
  • संपूर्ण भारत देशामधील जवळपास 53 कोटी लोकांनी योजने अंतर्गत खाते उघडले आहेत. 

Pradhan Mantri Jan Dhan Yojana Eligibility

नागरिकांना अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजनामध्ये पात्र असणे आवश्यक आहे, यासाठी खाली दिलेल्या अटी जाणून घेणे. 

  • PMJDY अंतर्गत फक्त भारत देशामधील स्थानिक रहिवासी नागरिक अर्ज करू शकतात. 
  • या योजनेमध्ये अर्ज करण्याच्या व्यक्तीचे वय 18 ते 65 वर्षांच्या आत असणे. 
  • सरकारी नोकरीमध्ये असलेला नागरिक योजनेसाठी पात्र नाही. 
  • जे नागरिक टॅक्स भरत आहेत, ते सुद्धा यामध्ये अर्ज करण्यासाठी पात्र नाही. 
  • योजनेमध्ये 10 वर्षाच्या मुलांचासुद्धा Joint Account उघडायची परवानगी आहे. 
  • खाते धारकांनी 2 वर्ष अकाउंट वापरले नाही तर बंद करण्यात येईल. 

Pradhan Mantri Jan Dhan Yojana Required Documents 

प्रधानमंत्री जन धन योजनामध्ये आवश्यक असणारी कागदपत्रे अर्जदारांकडे असणे बंधनकारक आहे. या सर्व कागदपत्रांची यादी खाली क्रमाने दिली आहे. 

  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधारकार्ड 
  • पॅनकार्ड 
  • मोबाईल नंबर 
  • स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • ई-मेल आयडी 
  • वयाचे प्रमाणपत्र

Pradhan Mantri Jan Dhan Yojana Registration 

नागरिकांना प्रधानमंत्री जन धन योजनामध्ये अर्ज करून खाते उघडण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियांना फॉलो करणे आवश्यक आहे. 

  • जन धन खाते उघडण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा तुमच्या जवळील कोणत्याही बँक शाखेत जाऊन उघडू शकता. 
  • योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. 
  • बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्याशी योजने संबंधित संपूर्ण माहिती द्या. 
  • त्यांनतर तुम्हाला अधिकाऱ्याकडून योजनेचा फॉर्म दिले जाईल. 
  • त्या फॉर्ममध्ये खाते उघडण्यासाठी संबंधित माहिती विचारली असेल ती सविस्तर भरून घेणे. 
  • सविस्तर माहिती भरून झाल्यानंतर कागदपत्रांची झेरॉक्स करून फॉर्म सोबत जोडणे. 
  • त्याचप्रमाणे पासपोर्ट आकाराचे फोटो फॉर्ममध्ये चिपकविणे. 
  • खाते उघडायचा फॉर्म भरून झाल्यानंतर बँकेत किंवा पोस्टामध्ये जमा करणे. 
  • अशा पद्धतीने तुम्ही खाते उघडायला प्रक्रिया करू शकतात. 

निष्कर्ष 

आपण या लेखामधून Pradhan Mantri Jan Dhan Yojana संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतली. यामध्ये योजना काय आहे? सुरुवात का करण्यात आली? कोनातर्फे सुरु करण्यात आली? यामध्ये कोणत्या लोकांना फायदा होणार? यांचे मुख्य उद्देश काय होते? नागरिकांना कोणते लाभ दिले जाते? कोण या योजनेसाठी पात्र आहेत? लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागते? योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कुठे जावे लागेल? आणि कसे अर्ज करायचे? अशा सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेतली. 

तुम्हाला सुद्धा ऑलराऊंडर बँक खाते उघडायचे आहे जिथे सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील तर या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घ्या. हा आमचा आर्टिकल व संपूर्ण माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा पाठवा. 

केंद्र व राज्य सरकारच्या अशाच फायदेशीर योजनांच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या Telegram किंवा WhatsApp चॅनेलला join करा. 

FAQs

जन धन योजना योजना काय आहे?

या योजनेमधून लाभार्थ्यांना मोफत बँक सेविंग अकाउंट व इतर सुविधा प्रदान करण्यात येते. 

जनधन योजना कधी सुरू करण्यात आली?

केंद्र सरकारने योजनेचे सुरुवात 28 ऑगस्ट, 2014 रोजी केली होती. 

जन धन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

भारत देशामधील 18 ते 65 वयोगटातील नागरिक अर्ज करू शकतो. 

Annasaheb Patil Loan Yojana 2024: बिनव्याजी १५ लाख रुपयांचे लोन घ्या, व्यवसाय उघडा
Rashtriya Krishi Vikas Yojana 2024: राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून शेतकऱ्यांना होणार लाभ

Recent Posts

  • E Shram Card Balance Check: घरी बसल्या 2 मिनिटांमध्ये चेक करा ई श्रम कार्डचे पैसे, जाणून घ्या प्रकिया
  • E Shram Card Payment List: सरकारने जाहीर केली ई श्रम कार्ड 1000 रुपयांची नवीन पेमेंट लिस्ट
  • PM Kisan New Registration Process: सुरु झाले पीएम किसान योजनाचे नवीन रजिस्ट्रेशन, शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये
  • Education Loan Yojana: विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचे शैक्षणिक लोन, अर्ज करणे झाले सोपे
  • Bima Sakhi Yojana: झाली सुरु बीमा सखी योजना, महिलांना मिळणार प्रतिमाह ७००० रुपये

YOJANA MEDIA

केंद्र आणि राज्य सरकार यांनी लोकहितासाठी सुरु केलेल्या योजनांचे तपशीलवार आणि लेटेस्ट माहितीसाठी आम्ही ही वेबसाइट सुरु केली आहे. यामध्ये योजने संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मराठी भाषेत योग्य पद्धतीने सादर करणे हेच आमचे ध्येय आहे.

Site Links

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Disclaimers
  • Terms of Service

Category

  • Sarkari Yojana
  • PM Yojana
  • Krushi Yojana
© 2025 - YOJANA MEDIA | All Rights Reserved