Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana 2024: केंद्र सरकारच्यामार्फत प्रधानमंत्री जनऔषधी योजना अंतर्गत नागरिकांना मेडिकल सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. ज्यामध्ये सामान्य नागरिकसुद्धा आपले स्वतःचे मेडिकल उघडून चांगले पैसे कमवू शकतात.
आपल्या देशामध्ये खाजगी मेडिसिनचा खर्च जास्त प्रमाणात आहे, ज्यामध्ये खाजगी फार्मा कंपन्यांना ब्रॅंडिंग, मार्केटिंग, जाहिरात, पॅकेजिंगचा खर्च व इतर खर्चामुळे त्यांना जास्ती किंमतीमध्ये विक्री करावे लागतात. यामध्ये ग्राहकांना आर्थिक समस्यांना समोर जावे लागते.
परंतु जेनेरिक मेडिसिनमध्ये कोणत्याही प्रकारचे ब्रँड नसतात, त्यामुळे ग्राहकांना जनऔषधी केंद्रामधून मेडिसिन घेताना अर्ध्यापेक्षा जास्त कमी किंमतीमध्ये दिले जाते. यामुळे देशामधील गरीब व मध्यम नागरिकांना स्वस्त दरात औषधे मिळण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जनऔषधी केंद्र योजना सुरु केली आहे.
Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana Aim
केंद्र सरकारचे जन औषधी केंद्र सुरु करण्यामागचे मुख्य उद्देश देशामधील नागरिकांना जेनेरिक मेडिसिन परवडण्याऱ्या किंमतीमध्ये मिळावे, त्याचसोबत ज्या नागरिकांना मेडिकल क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देणे आहे.
आपल्या लेखामध्ये आज प्रधानमंत्री जनऔषधी योजना संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज कसे करायचे? कोणत्या नागरिकांना यामधून फायदे घेता येणार? आणि कसे मेडिकल खोलू शकतो? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यास मदत होईल.
Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana in Marathi
प्रधानमंत्री जनऔषधी योजनाची सुरुवात केंद्र सरकारने 23 एप्रिल, 2018 रोजी केली होती. केंद्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या Ministry of Chemicals and Fertilizers अंतर्गत असलेले औषध विभागाच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी केली जाते.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या क्षेत्राच्या एक किलोमीटरमध्ये 2 औषधी केंद्र उघडण्यासाठी संधी दिली जाते. केंद्र सरकारतर्फे नागरिकांना औषधी केंद्र उघडण्यासाठी आर्थिक स्वरूपात 2,50,000 लाखांपर्यंत ग्रांट रक्कम देण्यात येते. त्याचसोबत लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंत प्रोत्साहन सुद्धा दिले जाते.
त्याचप्रमाणे मेडिकलमध्ये लागणाऱ्या उपकरणांसाठी म्हणजेच लाईट, AC, पंखा, टेबल व इतर गोष्टीसाठी दीड लाख रुपये आणि इंटरनेट व कॉम्पुटर सेटअपसाठी पन्नास हजार रुपये म्हणजेच एकूण 2 लाख रुपये योजने अंतर्गत देण्यात येते. यासाठी लाभार्थ्यांना उपकरणांचे योग्य बिल सादर करणे आवश्यक आहे.
Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana Details 2024
योजनाचे नाव | प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
लॉन्च कोणी केले | प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी |
लॉन्च कधी केले | 23 एप्रिल, 2018 रोजी |
विभाग | Pharmaceuticals and Medical Devices Bureau of India (PMBI) |
मुख्य उद्देश | देशभरातील नागरिकाने स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | भारत देशामधील सर्व नागरिक |
लाभ | केंद्र सरकारच्या माध्यमातून जनऔषधी केंद्रासाठी आर्थिक मदत |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | janaushadhi.gov.in |
Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana Benefits
- प्रधानमंत्री जनऔषधी योजनाचे फायदे देशामधील नागरिकांना स्वस्त दरात जेनेरिक मेडिसिन मिळते.
- त्याचप्रमाणे नागरिकांना मेडिकल व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा केंद्र सरकारतर्फे करण्यात येते.
- योजनेच्या माध्यमातून देशभरात हजारो जाण औषधी केंद्र उभारण्यात मदत झाली आहे.
- सामान्य नागरिकांना 50% ते 90% कमी किंमतीमध्ये औषधे मिळत आहेत.
- लाभार्थ्यांना योजने अंतर्गत 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिले जाते.
- तसेच दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती वर्ग, माजी सैनिक, महिला उद्यमी , हिमालय पर्वतांमधील नागरिक आणि द्वीप समूह यांना केंद्र शासनाकडून पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त 2 लाख रुपये दिले जाते.
- General Category मधील नागरिक वगळता इतर जणांना अर्ज करतावेळी कोणतेही रक्कम भरावी लागत नाही.
- लाभार्थ्यांना जन औषधी केंद्रामध्ये विकण्यासाठी जवळपास 1800 प्रकारचे उच्च गुणवत्ता असलेले औषधे आणि उपचार उपकरण 285 प्रकारचे योजनेच्या माध्यमातून दिले जाते.
Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana Eligibility
- लाभार्थ्यांकडे प्रधानमंत्री जनऔषधी योजनामध्ये पात्र ठरण्यासाठी 120 Sq.ft क्षेत्राची जागा असणे आवश्यक आहे.
- तुमच्या जवळ एक Pharmacist नागरिक असणे आवश्यक असून त्यांचे प्रमाणपत्र सुद्धा सादर करणे बंधनकारक आहे.
- त्याचप्रमाणे बी.फार्मा व डी फार्मा शिक्षण पूर्ण झालेले नागरिकसुद्धा अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
- आर्थिक क्षमतेनुसार Affidavit कागदपात्र जमा करणे.
- तुमच्या राहत असलेल्या ठिकाणाजवळ जनऔषधी केंद्र किती आहेत? ते बघणे महत्त्वाचे आहे.
- NGO, मेडिकल कॉलेज व कोणतेही संघटना केंद्र उघडण्यासाठी पात्र आहेत.
- अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांमधील कोणतेही नागरिक दिव्यांग, महिला, अनुसूचित जाती व जमाती, माजी सैनिक, हिमालय पर्वत क्षेत्र, व उत्तर पूर्वमधील असतील तर प्रमाणपत्र सादर करावे लागणार.
- कोणतेही नागरिक सामान्य कॅटेगरीमधील असल्यास त्यांना रजिस्ट्रेशन दरम्यान अर्जासाठी ५००० रुपये रक्कम भरावी लागणार.
- 10 लाखांच्या लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 1 किलोमीटर अंतरामध्ये फक्त 2 केंद्र उभारू शकतो.
- तसेच 10 लाखांच्या खाली लोकसंख्या असलेल्या शहरी व जिल्हा भागांमध्ये 1.5 किलोमीटर अंतर्गत फक्त 2 औषधी केंद्र असणे.
Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana Required Documents
प्रधानमंत्री जनऔषधी योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अर्ज करताना सादर करणे बंधनकारक आहेत, यासाठी अर्ज करण्याआधी तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे खालीलपैकी असलेल्या यादीनुसार जमा करावे लागेल.
- केंद्रसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधारकार्ड व पॅनकार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- स्त्री असेल तर महिला उद्यमी
- क्षेत्राचे संपूर्ण पत्ता
- मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
- बँक खात्याचे पुरावे
- अनुसूचित जाती व जमाती वर्गामधील असल्यास जातीचा दाखला
- दिव्यांग असतील तर अपंगत्व प्रमाणपत्र
- फार्मासिस्ट प्रमाणपत्र
- दोन वर्षांचा आयटीआर (ITR)
- स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
- जीएसटी नंबर
How to find Jan Aushadhi Kendra near your place?
- जनऔषधी केंद्र तपासण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला केंद्र शासनाने उघडलेल्या janaushadhi पोर्टलमध्ये जावे लागेल.
- पोर्टलमध्ये तुम्ही गेल्यानंतर डॅशबोर्डमधील PMBJP या पर्यायाला क्लिक करा.
- त्यामध्ये काही पर्याय उघडून येतील, त्याच्यामधील Locate Kendra ऑपशनवर क्लिक करा.
- त्यापुढे तुमच्या समोर स्क्रीन ओपन झाली असेल, त्यामध्ये तुमचे राज्य व जिल्हा निवडून Search बटन दाबा.
- त्यानंतर तुमच्या समोर जिल्ह्यामधील उपस्थित असलेल्या सर्व मेडिकल केंद्रांची यादी उघडून येईल.
- अशा प्रकार तुम्ही जनऔषधी केंद्राची पाहणी करू शकता.
Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana Apply Online
Step-1: प्रधानमंत्री जनऔषधी योजनाची अधिकृत वेबसाइट उघडा
- तुम्हाला प्रधानमंत्री जनऔषधी योजनामध्ये ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमधील स्क्रीनवर अर्जाचे पर्याय दिसेल किंवा मेनूबारमधील Apply For Kendra यावर क्लिक करा.
- पुढे तुम्चाला काही circular व योजने संबंधित पीडीफ फाइल दिसतील ते तुम्ही पाहू शकता.
- त्याच स्क्रीनमध्ये तुम्हाला Click Here To Apply च्या पर्यायाला क्लिक करा.
Step-2: लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करणे
- तुम्हाला लॉगिन करण्यासाठी आयडी व पासवर्ड तयार करावे लागेल, यासाठी रजिस्ट्रेशन प्रकिया पूर्ण करणे.
- तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामधील Register Now या बटनावर क्लिक करा.
- लॉगिन आयडीसाठी रजिस्ट्रेशन फॉर्म उघडून येईल, त्यामध्ये तुमचे नाव, लिंग, जन्म दिनांक, मोबाईल नंबर आणि राज्य भरून घ्या.
- पुढे नवीन यूजर आयडी व पासवर्ड तयार करून Terms व Conditions च्या बॉक्सला टिकमार्क करून सबमिट करा.
- तुमचे यूजर आयडी व पासवर्ड तयार होऊन मोबाईल नंबर व ई-मेल आयडीवर पाठविले जातील.
- नंतर तयार केलेला आयडी व पासवर्ड व्यवस्थित ठिकाणी नोंद करून घ्या.
Step-3: पोर्टलमध्ये लॉगिन करून घेणे
- रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला यूजर आयडी व पासवर्ड टाकायचे आहे.
- पुढे लॉगिन प्रकारामध्ये दोन पर्याय दिसतील, त्यामधील Applicant हा पर्याय निवडा.
- त्यानंतर कॅप्चा कोड दिसेल तो भरून लॉगिनच्या बटनावर क्लिक करा.
Step-4: प्रधानमंत्री जनऔषधी योजनाचा फॉर्म भरून घेणे
- लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर योजनाच्या रजिस्ट्रेशन फॉर्मचा डॅशबोर्ड उघडून येईल.
- डॅशबोर्डमध्ये जे सामान्य वर्गातील असतील, त्यांना पाच हजार भरावे लागणाऱ्या बँकेचे संपूर्ण माहिती मिळेल.
- तसेच जे काही कागदपत्रांचे pdf नाव असेल, त्यामध्ये कोणत्या गोष्टी नसावे याची माहिती मिळेल.
- स्क्रोल करून खाली आल्यावर तुम्हाला Application Category Gov, Individual व NGO असे पर्याय दिसतील, त्यामधील Individual ची निवड करा किंवा तुम्ही इतर वर्गातील असेल तर इतर पर्याय निवडा.
- पुढे Sub Category मिळेल, त्यामध्ये विविध प्रकारचे पर्याय असतील, त्यामधील निवड करणे.
- General Category तुम्ही निवडत असाल, तर अर्जाची फी भरायची ऑपशन उघडून येईल. एकदा अर्ज करून पैसे भरल्यानंतर परत होणार नाही तर योग्यरित्या विचार करून पर्याय सिलेक्ट करा.
- पुढे तुम्हाला बँक खात्याची माहिती भरावी लागणार हे फक्त सामान्य कॅटेगरीच्या नागरिकांना लागू आहे.
- त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव व कायमचा पत्ता, राज्य आणि जिल्हा टाकून घ्या.
- तुमचे मोबाईल नंबर व पर्यायी नंबर आणि ई-मेल आयडी भरून घ्या.
- पुढे तूम्हाला आधारकार्ड व पॅनकार्ड नंबर अचूक भरून Go To Next Step बटनावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामध्ये Application नंबर मिळेल.
- त्याच डॅशबॉर्डमध्ये तुम्हाला Fill Reg. Form या बॉक्समधील बाणाला क्लिक करायचे आहे.
- पुन्हा एक स्क्रीन ओपन होऊन येईल, त्यामध्ये स्टेप 2 मधील माहिती भरावी लागेल.
- तुम्हाला जिथे जनऔषधी केंद्र उघडायचे आहे, त्या ठिकाणाचा पत्ता, राज्य, जिल्हा आणि पिनकोड भरून घ्या.
- त्यानंतर तुमचा आधारकार्ड सोबत लिंक असलेला नंबर द्यावा लागेल.
- पुढे केंद्राचा नंबर भरणे ते पर्यायी आहे, नंतर ई-मेल आयडी टाका.
- जर तुम्ही Ex Servicemen असाल तर Yes करा अथवा No सिलेक्ट करणे.
- तसेच तुम्ही फार्मासिस्ट असाल तर Yes किंवा No करून घ्या.
Step-5: योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करणे
- तुम्हाला आधारकार्ड व पॅनकार्डचे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे.
- त्यानंतर तुमच्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट पीडीफ फाइलनुसार अपलोड करून घेणे.
- टर्म्स व कंडिशन व्यवस्थितपणे वाचून सबमिट बटण क्लिक करणे.
- सबमिट केल्यावर तुमचे रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या पूर्ण होईल.
- त्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तुमचे अर्ज तपासले जातील व तुम्ही पात्र असाल तर लाभ देण्यात येतील.
Conclusion
आम्ही आशा करतो की, Pradhan Mantri Jan Aushadhi Yojana संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल. ज्यामध्ये आम्ही प्रधानमंत्री जनऔषधी योजना म्हणजे काय? त्यामधून किती रक्कम देण्यात येते? त्यासाठी कोणते कागदपत्रे अपलोड करावी लागणार? कोणत्या नागरिकांना मेडिकल टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली? आणि योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी कोणती ऑनलाइन प्रकिया करावी लागेल? याबद्दलची सर्व माहिती सांगितली.
तुम्हाला सुद्धा मेडिकल टाकायचा आहे, पण आर्थिक अडचणीमध्ये फसला असाल तर या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घ्या.
FAQs
पंतप्रधान जन औषध योजना कधी जाहीर झाली?
पंतप्रधान जन औषध योजना 23 एप्रिल 2018 मध्ये जाहीर झाली.
जनऔषधी कोणी सुरू केली?
जनऔषधी योजनेची सुरुवात भारतचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केली होती.
प्रधान मंत्री मेडिकल स्टोअरचे फायदे काय आहेत?
प्रधानमंत्री मेडिकल स्टोअरचे फायदे 50% ते 90% प्रमाणे कमी किंमतीमध्ये ग्राहकांना उच्च गुणवत्तेचे औषधे मिळतात.
Read More: