Pradhan Mantri Jan Arogya Yojana 2024: नेमकी काय आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना?

Pradhan Mantri Jan Arogya Yojana 2024: केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) भारतामधील नागरिकांना आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केली. जेणेकरून देशामधील नागरिकांना आरोग्य विषयक खर्च परवडण्यासाठी आणि त्यांना योग्य मेडिकल सुविधा पुरविण्यासाठी मदत होईल. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आजही आपल्या भारत देशामध्ये योग्य मेडिकल सुविधा उपलब्ध नाही आणि त्याचसोबत हॉस्पिटलमध्ये प्रत्येक उपचाराच्या खर्चासाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे मध्यम वर्गातील नागरिक अजून गरिबीमध्ये जातात आणि गरीब वर्गातील नागरिक दारिद्रय रेषेखाली जातात. 

भारत देशामधील नागरिकांना योग्य मेडिकल सुविधा व परवडणारे उपचार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने PMJAY म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरु केली. आजच्या आपल्या लेखामध्ये याच योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा. 

Pradhan Mantri Jan Arogya Yojana in Marathi 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाची सुरुवात 23 सप्टेंबर, 2018 रोजी रांची, झारखंड येथे केली होती. या योजनेचे आधीचे नाव National Health Protection Scheme (NHPS) असे होते. 

त्याचप्रमाणे 2008 मध्ये Rashtriya Swasthya Bima Yojana लॉंच केली होती, ती सुद्धा PMJAY अंतर्गत समावेश करण्यात आले. ज्यामध्ये  राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजनेमधील जे कोणी लाभार्थी असतील? त्यांनासुद्धा यामधून लाभ घेता येतो. 

तसेच राष्ट्रीय आरोग्य पॉलिसी 2017 अंतर्गत भारतामध्ये Universal Health Converge चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने Ayushman Bharat Yojana ची सुरुवात केली होती. 

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात टिकाऊ विकास करून मेडिकल सुविधा उपलब्ध करून देणे हे लक्ष्य आहेत. 

Implementation Agency under PMJAY

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाची अंमलबजावणी Union Ministry of Health and Family Welfare अंतर्गत असलेली National Health Authority विभाग करतो. हा विभाग राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण विभाग केंद्र सरकारतर्फे 02 जानेवारी, 2019 रोजी सुरु करण्यात आला होता. 

Components of PMJAY

केंद्र शासन प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामध्ये काही घटक समावेश केले आहेत, त्यांची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. 

Ayushman Bharat Health and Wellness Centres 

सध्याच केंद्र सरकारने आयुष्यमान भारत हेल्थ व वेलनेस सेंटरचे नाव बदलून Ayushman Arogya Mandir ठेवण्यात आले आहे. नागरिकांसाठी प्रथम घटकाच्या माध्यमातून देशभरात जवळपास 1,50,000 हेल्थ व वेलनेस केंद्र सुरु करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहेत. 

जेणेकरून नागरिकांना घराजवळच प्रायमरी उपचारासाठी वेलनेसमध्ये जाण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे योजने अंतर्गत मेडिकलचा जेवढा खर्च असेल तो कव्हर केला जातो. 

या केंद्रामध्ये फक्त Comprehensive Primary Health Care (CPHC) सुविधा प्राप्त करता येणार. ज्यामध्ये महिलांना व त्यांच्या बाळांना आरोग्य सेवा पुरविली जाते. यामध्ये असंसर्गजन्य रोग व Diagnostic सेवांचा समावेश असतो. केंद्र सरकारने पहिले हेल्थ व वेलनेस केंद्र 14 एप्रिल, 2018 रोजी बिजापूर, छत्तीसगड येथे सुरु केले होते. 

Pradhan Mantri Jan Arogya Yojana

दुसऱ्या घटकामध्ये केंद्र सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षा कव्हर प्रदान करते, ज्यामध्ये गरीब व असुरक्षित कुटुंबामधील नागरिकांचा समावेश असणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना Secondary व Tertiary Care सुविधा पुरविली जाते. 

तसेच कव्हरमध्ये प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येतो. ज्यामध्ये कुटुंबामधील कितीही सदस्य लाभ घेऊ शकतात. यासाठी कोणतीही मर्यादा सरकारतर्फे लावण्यात आलेली नाही. 

आरोग्य सुरक्षा कव्हर अंतर्गत लाभार्थी आधीपासून असलेल्या रोगासाठी सुद्धा उपचार करू शकतात.  त्याचप्रमाणे हॉस्पिटलमधील 3 दिवस अगोदरचे व पोस्ट 15 दिवसांचे खर्च सुद्धा कव्हर केले जाते. 

Nodal Agency under AB PM-JAY

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाची नोडल मिनिस्ट्री राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आहे जी सेंट्रलमध्ये काम करत आहे. परंतु राज्य स्थरावर आयुष्यमान भारताचे नोडल मिनिस्ट्री State Health Agency (SHA) काम करते. 

Pradhan Mantri Jan Arogya Yojana Implementation Model

  • Trust Model: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य एजेन्सी आपल्या राज्यामध्ये ट्रस्ट तयार करतात, या राज्यामधील ट्रस्टमध्ये रजिस्टर असलेले व्यक्ती मेडिकल उपचारासाठी खर्च घेऊ शकतो. 
  • Insurance Model: यामध्ये राज्य सरकार कोणत्याही लाभार्थीचे मेडिकल खर्च स्वतः न उचलता विमा कंपन्याना उचलायला संधी देतात. 
  • Mixed Model: यामध्ये नागरिकांना मेडिकल खर्चासाठी विमा कंपनीकडे जावे लागते, परंतु कंपन्यांना राज्य सरकार आर्थिक मदत करते. 

Pradhan Mantri Jan Arogya Yojana 2024 Overview

योजनाचे नावप्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
प्रकारसेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम
कधी लॉन्च केली23 सप्टेंबर, 2018 रोजी
कोणी लॉंच केलीदेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी
विभागकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत असलेली राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण विभाग
उद्देशगरीब व मध्यम वर्गातील नागरिकांना उच्च दर्जाच्या व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे
लाभार्थीसामाजिक आर्थिक आणि जातिगणना 2011 (SECC) अंतर्गत असणारे नागरिक
लाभकुटुंबासाठी 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा
अधिकृत वेबसाइटpmjay.gov.in

Pradhan Mantri Jan Arogya Yojana Aim

केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाचे मुख्य उद्देश देशाच्या प्रत्येक भागात, शहरात, ग्रामीण क्षेत्रात व केंद्र शासित प्रदेशामध्ये मेडिकल सुविधा उपलब्ध करून देणे आहे. जेणेकरून सामान्य नागरिकांना आरोग्य विषयक आर्थिक भार कमी होईल आणि चांगल्या मेडिकल सुविधा प्राप्त होईल. 

काही वेळेला कुटुंबामधील सदस्यांना काही समस्या होत असेल तर त्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरपूर प्रमाणात खर्च होतो. यामुळे कोणतेही कुटुंब दारिद्रय रेषेच्या जाळ्यात अडकतात. अशा नागरिकांना आर्थिकदृष्टया स्थिर ठेवण्यासाठी व त्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा प्राप्त करण्यासाठी केंद्र सरकारचे ध्येय आहे. 

Pradhan Mantri Jan Arogya Yojana Benefits

  • या योजनाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये आर्थिक कव्हरेज, महिलांचे सक्षमीकरण, कोणतेही कॅप नाही, कॅशलेस प्रकिया, सोप्या पद्धती, आरोग्य सेवा व इतर सुविधा पुरवले जाते. 
  • PMJAY योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे मेडिकल कव्हर प्रदान केले जाते. 
  • त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना त्यामध्ये Secondary व Tertiary Care सुविधा पुरवल्या जातात. 
  • केंद्र सरकारने योजने अंतर्गत 50 कोटी लाभार्थ्यांना फायदे देण्याचा टार्गेट ठेवला आहे. 
  • PMJAY अंतर्गत लाभार्थ्यांना Cashless व paperless सेवा दिली जाते, ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचे खर्च व कागदपत्रे जमा करावी लागत नाही. 
  • तसेच लाभार्थ्यांना प्री व पोस्ट मेडिकल फॅसिलिटी प्रदान करण्यात येते. 
  • लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हेल्थ बेनिफिट पॅकेजमध्ये Surgery, Day Care Treatment, मेडिसिन खर्च, मेडिकल आणि Diagnostics अशा समस्यांचा समावेश करण्यात आले आहेत.
  • राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजनेमधील कुटुंब सुद्धा PMJAY अंतर्गत कव्हर केले जातात. 
  • राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण योजनेचे निरीक्षण करत असतात. ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये योग्य सुविधा, स्वच्छता, सामग्री, आणि उपचार या संबंधित क्षेत्रामध्ये होणाऱ्या कामाचे निरीक्षण केले जाते. 
  • PMJAY ही दुनियामधील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. 

Pradhan Mantri Jan Arogya Yojana Funding Pattern

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, ज्यामध्ये केंद्र व राज्य या दोन्ही सरकारचे आर्थिक योगदान असते. योजनेचे खर्च सामान्य राज्यांसाठी 60:40 चे प्रमाण ठेवण्यात आले, ज्यामध्ये केंद्र सरकार 60% आर्थिक खर्च उचलते व राज्य सरकार 40% खर्च उचलते. 

त्याचप्रमाणे ईशान्येकडील व हिमालय राज्यांमध्ये 90:10 चा प्रमाण लागू करण्यात आला आहे आणि केंद्र शासित प्रदेशामधील विधी मंडळाशिवाय असलेल्या राज्यांसाठी 100% खर्च केंद्र सरकार करते.  

Pradhan Mantri Jan Arogya Yojana Eligibility Criteria 

अर्जदारांना लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाची पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे, यासाठी खालीलप्रमाणे पात्रतेच्या अटी सांगण्यात आलेल्या आहेत. 

  • या योजनेमध्ये कुटुंबातील कितीही सदस्य हेल्थ विमामधून फायदा घेण्यासाठी पात्र असणार. 
  • ग्रामीण व शहरी भागात राहत असलेले मध्यम व गरीब वर्गातील कुटुंब पात्र असणार. 
  • Socio Economic Caste Census 2011 (SECC 2011) मध्ये ज्या वर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामधील नागरिक योजनामध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार. 

निष्कर्ष 

आमच्या लेखाच्या माध्यमातून Pradhan Mantri Jan Arogya Yojana संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे? ती का चालू करण्यात आली? कोणासाठी करण्यात आली? यामध्ये कशाप्रकारे अंमलबजावणी केली जाते? कोणकोणत्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे? यासाठी कोणती नोडल मिनिस्ट्री नियुक्त करण्यात आली? योजना सुरु करण्यामागे कोणते उद्देश आहेत? कोण यामध्ये लाभार्थी असणार? कशाप्रकारे योजनेमध्ये खर्च केला जातो? अर्ज करण्यासाठी कोणकोणते नागरिक पात्र असणार आहेत? अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. 

तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये पात्र असाल तर लाभ घेऊ शकता. तसेच अशाच फायदेशीर योजनांच्या माहितीसाठी Subscribe करू शकता किंवा आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून नवीन अपडेट्स मिळवू शकता. 

FAQs

जन आरोग्य योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सामाजिक आर्थिक आणि जातिगणना 2011 (SECC) अंतर्गत असणारे नागरिक पात्र आहेत. 

पीएम जन आरोग्य योजनेची सुरुवात कधी करण्यात आली?

पीएम जन आरोग्य योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 23 सप्टेंबर, 2018 रोजी केली होती. 

PMJAY चा पूर्ण अर्थ काय आहे? 

PMJAY चा पूर्ण अर्थ प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा आहे.

पुढे वाचा: