Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2024: आपल्या देशामधील ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) सुरु करण्यात आली. सरकारने सुरु केलेल्या या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील छोट्या व मोठ्या गावांचे पक्के रस्ते तयार करून शहरातील रस्त्यांना जोडले जातात.
केंद्र सरकार आपल्या देशातील ग्रामीण विभागांचा विकास होण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत असते. यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याचे व्यवस्थापन ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून केले जाते.
आज आपण या लेखातून PMGSY संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तररित्या जाणून घेणारआहोत. यामध्ये योजनेचे उद्दिष्ट्ये, लाभ, वैशिष्ट्ये, प्लॅनिंग प्रकिया, अंमलबजावणी प्रकिया, निधी आणि तक्रार याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्यात येणार असून लेख शेवटपर्यंत पहा.
Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Marathi
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाची सुरुवात भारताचे पूर्व पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी वर्ष 2000 रोजी केली होती. देशामधील प्रत्येक गावांमध्ये पक्के रस्ते बनविणे, ही योजना सुरु करण्यामागचे त्यांचे मुख्य उद्देश होते.
केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांच्याद्वारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा फेस वर्ष 2019 मध्ये सुरु करण्यात आला. या योजनेच्या अंतर्गत देशामधील ज्या ज्या ग्रामीण क्षेत्रातील गावाने रस्ते बनविले, त्या त्या गावातील रस्ते खराब झाल्यास परत दुरुस्तही केले जातात. त्याचसोबत छोट्या मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून पक्के रोड बनविले जातात.
हल्ली, गावातील कच्या रस्त्यांमुळे गावकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. गावकरी ग्रामपंचायतमध्ये तक्रार मांडून गावातील कच्चे रस्ते दुरुस्त करून घेऊ शकतो आणि आपल्या गावातली सुधारणा या योजनेच्या मार्फत करू शकतो.
PMGSY Scheme Details
योजनेचे नाव | प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
विभाग | ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार |
सुरु कधी झाली | वर्ष 2000 रोजी |
सुरु कोणी केली | पूर्वीचे प्रधानमंत्री श्री अटल वाजपेयी यांनी |
उद्देश | ग्रामीण क्षेत्रांचा विकास करणे |
लाभार्थी | भारतामधील सगळे नागरिक |
लाभ | गावातील रोड शहरी रस्त्यांना जोडले जातील |
अधिकृत वेबसाइट | pmgsy.nic.in |
PM Gram Sadak Scheme Purpose
केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाचे मुख्य उद्देश ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागांना जोडणे असे आहे.
जेणेकरून देशामधील प्रत्येक नागरिकांना सुरळीत यात्रा करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे ग्रामीण क्षेत्रामधील कोणत्याही नागरिकांना शहरी भागात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
या योजनाच्या माध्यमातून रस्ते तर जोडले जातील परंतु ग्रामीण क्षेत्रामधील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा मदत करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी नागरिकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत मिळेल.
त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणांना जसे शाळा, पर्यटन स्थळ, मंदिरे, हॉस्पिटल्स आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना रस्त्यांद्वारे जोडल्यामुळे प्रत्येक राज्यातील गावांमध्ये सुधार होण्यास मदत मिळेल. तसेच गावातील नागरिकांना योग्यरीत्या रोजगार निर्माण करण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित जाण्यात मदत मिळेल.
Pradhan Mantri Gram Sadak Yojana Benefits
- केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा फायदा ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या गावांना जोडण्यासाठी होतो.
- या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील रोड व ग्रामीण भागातील रोड एकत्र जोडले जातात.
- कोणत्याही ग्रामीण क्षेत्रामधील गावांमध्ये रस्ते व्यवस्थित नसल्यास रस्ते दुरुस्तसुद्धा केले जाते.
- प्रत्येक गावात पक्के रस्ते जोडण्यासाठी केंद्र सरकार ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि नगरपालिकासोबत मिळून काम करत आहेत.
- प्रत्येक गावागावांमध्ये पक्के रस्ते तयार करण्यासाठी स्थानिक रहिवासी ऑनलाइन किंवा ग्रामपंचायतमध्ये तक्रार करून अर्ज करू शकता.
- या योजनेच्यामार्फत प्रत्येक गावात रस्ते तयार केल्यामुळे आणि शहरी भागाला ते रस्ते जोडल्यामुळे गावांचा विकास होण्यास मदत मिळते.
- गावांचा विकास झाल्यामुळे रोजगार निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध होतात.
- शहरी भागातील रस्ते गावाला जोडल्यामुळे देशामधील नागरिकांना येण्या जाण्यास सुद्धा मदत होते.
Pradhan Mantri Gram Sadak Yojana Registration
- अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटमध्ये जावे लागेल.
- त्यानंतर होमपेजवरील रजिस्ट्रेशनच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये फॉर्म दिसेल.
- त्या फॉर्ममध्ये आवश्यक असलेली संपूर्ण माहिती भरून घ्यावी लागेल.
- त्यानंतर फॉर्म भरून झाल्यावर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सगळंकाही नीट तपासून सबमिट बटनावर क्लिक करणे.
- अशा तऱ्हेने तुम्ही अर्ज करण्यासाठी या प्रक्रियांचा उपयोग करू शकता.
PM Gram Sadak Scheme Planning Process
- केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनाच्या रस्त्यासाठी सर्वात प्रथम नियोजन प्रकिया तयार केली जाते.
- प्रत्येक गावामधील रस्ते बनविण्यासाठी प्लँनिंग जिल्ह्यांमधील पंचायतद्वारे तयार केले जाते.
- गावच्या रस्त्यासाठी प्लँनिंग तयार करताना पंचायत आणि स्टेट लेवल स्टँडिंग कमेटीला सहभागी केले जाते.
- याचे स्टेट लेवल स्टँडिंग कमेटीच्या माध्यमातून ऑपेरेशन करण्यासाठी ब्लॉक लेवल आराखडा बनविला जातो.
- त्यानंतर कोणत्या गावाचे रोड नेटवर्क कोणत्या शहराला जोडलेले आहेत हे ब्लॉकद्वारे ओळख केली जाते.
- त्यानंतर कोणत्या गावाचे रोड शहरामधील रोड नेटवर्कला जोडलेले नाही ते काढून त्या गावचे रस्ते शहरांसोबत जोडण्यासाठी प्रकिया सुरु केली जाते.
PM Gram Sadak Yojana Proposal
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या प्रस्तावासाठी ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय ग्रामीण रोड विकास एजेंन्सीची स्थापना केली आहे.
- ग्रामीण भागातील रस्त्यांचे ऑपेरेशन आणि मॅनेजमेंट स्पोर्ट त्या एजेंन्सीद्वारे केले जाते.
- त्यानंतर इम्पॉवर्ड कमेटीद्वारे राष्ट्रीय ग्रामीण रोड विकास एजेंन्सीद्वारे जमा केलेल्या प्रकल्पांचे रिव्यू केले जाते.
- शेवटी प्रकल्पांचे प्रस्ताव कार्यालयातील मंत्रीकडे मंजुरी मिळण्यासाठी पाठविले जाते.
PM Gram Sadak Scheme Implementation
- प्रकल्पाचे प्रस्तावावर मिनिस्टर यांच्या मंजुरी दरम्यान राज्य सरकारकडे पाठविले जातात.
- योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कडून रस्त्याच्या प्रकल्पासाठी मंजूर रक्कम पाठविले जाते.
- त्यानंतर टेंडरसाठी विविध काँट्रॅक्टर्सना कमेटीद्वारे आमंत्रित केले जाते.
- त्या कॉन्टॅक्टर्सच्या टेंडरमधील योग्य टेंडर निवडून रोड बांधकामासाठी मान्यता दिली जाते.
- रस्त्याच्या कामांची सुरुवात मान्यता मिळाल्याच्या पंधरा दिवसानंतर केली जाते.
- त्यानंतर कमीत कमीत 9 महिने कामासाठी दिले जातात.
- जर काही समस्या आल्यास जास्तीत जास्त 12 महिनेसाठी कामाची सवलत दिली जाते.
- काही प्रकारच्या क्षेत्रामध्ये जसे डोंगरभाग अशा ठिकाणी काम करण्यासाठी 18 महिने ते 2 वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जातो.
Pradhan Mantri Gram Sadak Scheme Fund
- ग्रामीण भागातील रस्त्यावरील काम करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत दोन इंस्टालमेंटमध्ये फंड दिला जातो.
- रस्त्यावरील प्रकल्पाच्या पूर्ण खर्चानुसार 50 टक्के रक्कम काम करण्यास दिली जाते.
- पहिल्या इंस्टालमेंटचे 60 टक्के वापरल्यानंतर किंवा 80% काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच दुसरे इंस्टालमेंट दिले जाते.
- म्हणजेच बाकीचे 50 टक्के थकबाकी रक्कम दिली जाते.
- काँट्रॅक्टर्सना दुसऱ्या रकमेच्या अर्जासाठी Utilization Certificate Audit Statement Account सर्टिफिकेट जमा केल्यानंतर इंस्टालमेंट देण्यात येते.
PM Gram Sadak Yojana Grievance Filing Process
- तक्रार मांडण्यासाठी सर्वात प्रथम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल, त्यामधील Grievance Redressal वर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये Sign In च्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर लॉगिन फॉर्म येईल तो भरून लॉगिन करून घेणे.
- लॉगिन केल्यानंतर पुन्हा नवीन पेज उघडेल, त्यामध्ये फॉर्म असेल.
- त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून पुढे पाठविणे
- अशा प्रकारे तुम्ही Grievance साठी अर्ज करू शकता.
- त्यानंतर तक्रारीचे स्टेटस पाहण्यासाठी खालील दिलेल्या प्रकियानुसार माहिती घेऊ शकता.
Pradhan Mantri Gram Sadak Yojana Grievance Status Check
- तक्रारीचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या वेबसाइटमध्ये जावे लागेल.
- वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर Grievance Redressal ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- त्या पर्यायामध्ये गेल्यानंतर तुम्हाला View Details च्या पर्यायाला निवडायचे आहे.
- त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन नंबर, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर भरून घेणे.
- त्यानंतर तुम्हाला सिक्योरिटी कोड टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
- तुमच्या समोर तुम्ही पाठविलेले तक्रारीचे स्टेट्स पाहायला मिळेल.
- अशाप्रकारे तुम्ही स्टेट्स तपासण्यासाठी प्रकिया फॉलो करू शकता.
निष्कर्ष
अशाप्रकारे आम्ही तुम्हाला Pradhan Mantri Gram Sadak Yojana संबंधित संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितली आहे. या योजनेतून ग्रामीण क्षेत्रात फक्त रस्ते जोडले जात नाही तर देशामधील प्रत्येक गावातील परिस्थिती सुधारून विकास होण्यास मदत सुद्धा होत आहे. यामध्ये आम्ही योजना का सुरु करण्यात आली? कोणत्या परिस्थितीमध्ये सुरु करण्यात आली? केव्हा सुरु करण्यात आली? सुरु करण्यामागील उद्देश काय होते? कोणत्या भागांना याचा फायदा होईल ? कशाप्रकारे फायदा होईल? ग्रामीण भागात रस्ते तयार करण्यासाठी कसा अर्ज करायचा? त्यामध्ये किती प्रकिया असते? तसेच काही समस्या आल्यास तक्रार कशी पाठवायची? याबद्दल तुम्हाला सविस्तारित्या मार्गदर्शन केले.
तुम्ही सुद्धा ग्रामीण क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी आहात आणि तुमच्या गावामध्ये कच्चे रोड आहेत, तर आम्ही दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण लेख वाचा आणि तुमच्या गावात रोड तयार करण्यासाठी सरकारकडून मदत घ्या. हा लेख उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या आजूबाजूमधील गावकऱ्यांना पाठवून या योजनेची माहिती द्या.
आम्ही अशाच प्रकारचे उपयुक्त योजनांची माहिती नागरिकांपर्यंत आणतो, तुम्हाला सुद्धा माहिती त्वरित मिळण्यासाठी आमच्या वेबसाइटला Subscribe करा आणि आमच्या Telegram अथवा WhatsApp चॅनेलला जॉईन करा.
FAQs
पीएम सडक योजना काय आहे?
या योजनाच्या माध्यमातून ग्रामीण ठिकाणामधील गावांचे रस्ते शहरी रस्त्याला जोडले जाते.
प्रधानमंत्री सडक योजना कधी सुरु झाली?
पंतप्रधान श्री अटल वाजपेयी यांनी वर्ष २००० रोजी ही योजना सुरु करण्यात आली.
सडक योजनाचे फायदे काय आहेत?
या योजनेच्यामार्फत गावातील रस्ते दुरुस्त केले जाते आणि नवीन रस्ते बनविले जाते.
पुढे वाचा: