Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana 2024: भारतामधील गरीब वर्गातील कुटुंबाना मोफत अन्न पुरवठा प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सुरु करण्यात आली होती. केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून गरीब घराण्यातील नागरिकांना गहू, तांदूळ व डाळ यांसारखे फूड पोहोचविण्याचे काम करते.
2020 मध्ये पँडेमिक परिस्थितीमुळे भारत देशामधील दारिद्रय रेषेखालील व गरीब वर्गातील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध नव्हती, त्याचप्रमाणे पूर्ण देशामध्ये लॉकडाउन लागले होते. यामध्ये गरीब कुटुंबातील नागरिकांना आपले घर चालविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साधन उपलब्ध नव्हते.
जस की आपल्याला माहीतच आहे, माणसाला जगायला अन्न, वस्त्र व निवारा या तीन गोष्टींची गरज लागते. यामध्ये सुद्धा एका व्यक्तीला दिवसाला 2 वेळेचे जेवण मिळणे महत्त्वाचे आहे. अशातच पँडेमिकसारखी परिस्तिथी आल्यामुळे त्यांना रोजच्या आहारासाठी फूड उपलब्ध करणे कठीण जात होते आणि यामध्ये काही नागरिक आपल्या घरातील काही न काही सामान विकून घर चालवत होते.
या सर्व समस्यांमुळे जे गरीब होते ते आणखी गरीब होऊ नये आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था दुर्बळ होऊन नये यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली होती.
आज आपल्या लेखामध्ये PMGKAY या योजने संबंधित माहिती घेणार आहोत, ती काय आहे? कधी सुरु केली? कोणते नोडल मंत्रालय आहे? कोणते विभाग काम राबविते? कोणत्या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली? कोणकोणते फायदे यामधून दिले जातात? कोणत्या नागरिकांना यामध्ये लाभ दिला जाणार? कोण यासाठी पात्र असणार? कोणत्या प्रकारचे कागदपत्रे लागणार? आणि कशा प्रकारे योजनेचा लाभ घेऊ शकतो? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आर्टिकल शेवटपर्यंत पहा.
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana in Marathi
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाची सुरवात 3 महिन्यासाठी एप्रिल 2020 रोजी केली होती. जेणेकरून पँडेमिक परिस्थितीमध्ये गरीब कुटुंबातील नागरिक उपाशी न राहता 2 वेळेचे जेवण त्यांना मिळेल.
जे नागरिक National Food Security Act 2013 अंतर्गत सहभागी आहेत, त्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत पुरविले जाते, त्याचसोबत 1 किलो डाळ सुद्धा दिले जाते.
PMGKAY योजनेची संपूर्ण खर्च Ministry of Finance उचलते, जी या योजनेमध्ये नोडल मंत्रालय म्हणून काम करत आहे. या प्रॉग्रामची अंमलबजावणी Department of Food and Public Distribution (DFPD) अंतर्गत असलेली Ministry of Consumer Affairs Food and Public Distribution करते आहे.
PM Garib Kalyan Anna Yojana New Updates
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही पँडेमिक दरम्यात फक्त तीन महिन्यांसाठी सुरु केली होती. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून नेहमी योजनेची मुदत वाढविण्यात येत होती. 2023 च्या डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा शेवटचा कालावधी होता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडाच्या रॅलीमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षासाठी वाढविण्यात येणार अशी घोषणा केली होती. जी 01 जानेवारी, 2024 पासून ते डिसेंबर 2028 पर्यंत चालू राहणार आणि यामधून लाभार्थ्यांना फायदा पाच वर्षापर्यंत मिळत राहणार.
PMGKAY ही दुनियाची सर्वात मोठी फूड सुरक्षा प्रोग्राम आहे. यामध्ये 2024 पासून ते 2028 अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये या पाच वर्षांमध्ये योजना अंतर्गत खर्च करण्यात येणार.
PM Garib Kalyan Anna Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
नोडल मंत्रालय | वित्त मंत्रालय, भारत सरकार |
अंमलबजावणी करणारे विभाग | अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग व ग्राहक व्यवहार, अन्न आणि वितरण मंत्रालय |
सुरु झाली | एप्रिल 2020 रोजी |
सुरु कोणी केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
उद्देश | दारिद्रय रेषेखालील नागरिकांना मोफत अन्न पुरवठा करणे व अर्थव्यवस्था नियंत्रित ठेवणे |
लाभार्थी | भारत देशामधील गरीब वर्गातील कुटुंब |
लाभ | दरमहा मोफत 5 किलो तांदूळ किंवा गहू, 1 किलो डाळ |
अर्ज पद्धत | ऑफलाइन |
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Aim
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाचे मुख्य उद्देश भारत देशामधील दारिद्रय रेषेखालील (BPL) कुटुंबाना मोफत अन्न देऊन आर्थिक दृष्टया स्थिर ठेवणे आहे. जेणेकरून आपल्या देशामध्ये राहणारे दुर्बळ वर्ग आणखी गरीब होऊ नये आणि त्यांना अन्न पुरवठ्यासाठी चिंता करावी लागणार नाही.
जेव्हा या योजनेची सुरुवात करण्यात आली होती, तेव्हा केंद्र सरकारचे मुख्य उद्देश गरिबांना पँडेमिक परिस्थितीला सामना करण्यासाठी मदत करणे होते. ही योजना फक्त 3 महिन्यासाठी लागू करण्यात आली होती. परंतु 2022 च्या डेटानुसार करोडो लोक यामधून फायदा घेत आहेत. यासाठी केंद्र सरकारने योजनेची मुदत 5 वर्ष वाढवून 2028 पर्यंत केली आहे. जेणेकरून 2028 पर्यंत गरिबीमध्ये असलेल्या नागरिकांना योजनेतून अन्न पुरवठा करता येईल व त्या कुटुंबाना आर्थिक ओझे कमी होईल.
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Benefits
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनाचे फायदे भारत देशामधील जवळपास 80 कोटी लाभार्थ्यांना दिले गेला आहे.
- केंद्र सरकारने PMGKAY योजनेची कालावधी डिसेंबर 2028 पर्यंत केली आहे.
- या योजनेतून लाभार्थ्यांना दिले जाणाऱ्या मदतीसाठी केंद्र शासनाकडून अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार.
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला दुनियामधील सर्वात मोठा फूड सुरक्षा प्रोग्राम म्हणून ओळखला जातो.
- केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या दोघांना एकत्रित केले आहे.
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दररोज दोन वेळचे जेवण मिळण्यासाठी मदत होते.
- त्याचप्रमाणे देशामधील आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या नागरिकांना आर्थिक मदत होईल.
- योजनेमध्ये लाभार्थी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला केंद्र शासनातर्फे 5 kg तांदूळ किंवा 5 kg गहू दिले जाते. त्याचप्रमाणे 1 मग डाळ सुद्धा विनामूल्य दिले जाते.
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत असलेल्या व्यक्तींना अतिरिक्त या योजनेतून लाभ दिले जाते.
- NFSA अंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या राशनसोबत PMGKAY मधील अन्नधान्य सुद्धा मिळत राहणार.
What is National Food Security Act (NFSA), 2013?
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंतर्गत राष्ट्रीय फूड सुरक्षा कायदा जुलै, 2013 मध्ये लागू करण्यात आला होता. त्या वेळेला अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग व ग्राहक व्यवहार, अन्न आणि वितरण मंत्रालय हे नोडल मिनिस्ट्री होते.
या कायद्या अंतर्गत 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्याना Targeted Public Distribution System (TPDS) च्या माध्यमातून लक्ष केंद्री केले जात होते. आपल्या भारत देशामधील जवळपास ६७% लोकसंख्याना NFSA च्या माध्यमातून पुरवठा केला जातो.
यामध्ये दोन प्रकारचे लाभार्थी कुटुंबाना लाभ दिले जाते होते. त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे माहिती दिली आहे.
Categories of Beneficiary Households
- Antyodaya Anna Yojana (AAY): अंत्योदया अन्न योजना अंतर्गत नागरिकांना महिन्याला 35 kg अन्नधान्य दिले जाते.
- The Priority Households: प्राधान्य कुटुंब अंतर्गत केंद्र शासनातर्फे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 kg अन्नधान्य दर महिन्याला दिले जाते.
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Eligibility
- भारत देशामधील गरीब वर्गातील कुटुंब प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनासाठी पात्र असणार आहेत.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना भारताचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अंत्योदय अन्न योजनामधील नागरिकांना PMGKAY अंतर्गत लाभ घेण्यास परवानगी आहे. यामधील लाभार्थी कोण असणार आहेत? ते केंद्र व राज्य सरकार ठरवते.
- या योजनेमध्ये आदिम आदिवासी समाजातील नागरिक अर्ज करू शकतो.
- Priority Households (PHH) अंतर्गत असलेले नागरिकसुद्धा लाभ घेऊ शकतात, परंतु कोणते कुंटुंब यामध्ये असणार आहे? ते राज्य सरकार ठरवते.
- ज्या कुटुंबामध्ये विधवा स्त्री किंवा गंभीर आजारी व्यक्ती आहे ते सहभागी होऊ शकतात.
- त्याचप्रमाणे 60 वर्षावरील नागरिक ज्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक सपोर्ट नाही.
- जे शेतकरी ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि दुसऱ्याच्या शेतीमध्ये काम करतात.
- ग्रामीण क्षेत्रामधील कारागीर, कुली कामगार, रिक्षावाले, गाडा ओढणारे व संबंधित कॅटेगोरीमधील नागरिक अर्ज करू शकतात.
- यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील पात्र असलेल्या नागरिकांना लाभ मिळतो.
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Requirement Documents
अर्जदारांकडे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सोबतीला असणे महत्त्वाचे आहे, त्यांची संपूर्ण यादी खाली दिलेली आहे.
- अर्जदाराचे आधारकार्ड
- रेशन कार्ड (आधारकार्ड सोबत लिंक असणे)
- वार्षिक उत्पन्न दाखला
- ओळखपत्र
- AAY अंतर्गत लाभार्थी असल्याचे पुरावे
Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Registration
- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदारांना त्यांच्या जवळच्या Fair Price Shop म्हणजेच राशन दुकानामध्ये जावे लागेल.
- राशन दुकानांमध्ये गेल्यानंतर अधिकाऱ्याला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे म्हणजेच राशनकार्ड जमा करणे.
- त्यानंतर PMGKAY योजना संबंधित संपूर्ण माहिती देणे.
- माहिती दिल्यानंतर अधिकारी कागदपत्रे तपासतील.
- अर्जदार जर योजनेच्या अटीनुसार पात्र असतील तर लाभ देण्यात येईल.
- अशा पद्धतीने योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी प्रकिया करावे लागेल.
निष्कर्ष
अशा पद्धतीने या लेखाच्या माध्यमातून Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana संदर्भात संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये योजनेचे महत्त्व, त्यांचे उद्देश, त्यामधून होणारे फायदे, पात्रतेच्या अटी, त्यासाठी लागणारे कागदपत्रे, अर्ज करण्यासाठी प्रक्रिया अशा सर्व गोष्टींबद्दल सविस्तररित्या मार्गदर्शन केले.
तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर पुढील येणाऱ्या नवीन योजनांसाठी Yojana Media ला Subscribe करून ठेवा किंवा Telegram/WhatsApp ग्रुपला जॉईन करा.
FAQs
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना कधी सुरु झाली?
या योजनेची सुरवात केंद्र सरकारने पँडेमिकमध्ये एप्रिल 2020 रोजी करण्यात आली.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला किती वर्ष मुदत वाढ देण्यात आली आहे?
शासनातर्फे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला पाच वर्ष मुदत वाढ देण्यात आली आहे.
PMGKAY चा लाभ कसा घ्यावा?
PMGKAY चा लाभ तुमच्या जवळच्या राशन दुकानामध्ये जाऊन घ्यावा.
पुढे वाचा: