Pradhan Mantri Fasal Bima Yojana Online Registration 2024: या आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजनामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन CSC अंतर्गत कशा प्रकारे करू शकता? याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घेण्यास मिळेल. त्याचसोबत किती kb व कसे कागदपत्रांना अपलोड करावे? हे देखील पाहायला मिळेल.
आपल्या आजच्या लेखामध्ये CSC अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री फसल योजना अंतर्गत कसे ऑनलाईन अर्ज करायचे? त्यामध्ये कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे? या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर लेख शेवटपर्यंत पहा आणि अर्ज करून लाभ मिळवा.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2024 Details
स्कीमचे नाव | PM Fasal Bima Yojana (PMFBY) |
रजिस्ट्रेशन प्रकिया | ऑनलाईन |
रजिस्ट्रेशन पोर्टल | सामान्य सेवा केंद्र (CSC) |
लाभार्थी | भारत देशाचे शेतकरी |
योजनेची सुरुवात | 18 फेब्रुवारी 2016 |
डिपार्टमेंट | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार |
लक्ष्य | शेतकरी वर्गाला विमा सुरक्षा प्रदान करणे |
विमा सुरक्षा कव्हर | 2 लाख रुपयापर्यंत |
सरकारी वेबसाइट | pmfby.gov.in |
Pradhan Mantri Fasal Bima Yojana साठी आवश्यक कागदपत्रे
CSC पोर्टलमध्ये अर्ज करताना असताना शेतकऱ्याचे प्रधानमंत्री फसल बीमा योजनामध्ये आवश्यक असणारे कागदपत्रे खालील दिलेल्या यादीनुसार जमा करून घेणे महत्त्वाचे आहे.
- शेतकऱ्याचे आधाकार्ड (बँकेच्या खात्यासोबत जोडलेले)
- अर्जदाराचे बँक खात्याची माहिती व पासबुक
- शेतकरी बांधवाचे घोषणापत्र
- जमिनीचे कागदपत्रे
- कायदेशीर भाड्याचे प्रमाणपत्र (भाड्यांनी असल्यास)
- मोबाईल नंबर
- नॉमिनीचे कागदपत्रे (पर्यायी)
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Apply Online through CSC Portal
CSC अंतर्गत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजनामध्ये ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहे? हे स्टेप बाय स्टेप जाणून घेण्यासाठी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रकिया फॉलो करावे लागतील.
Step-1: Pradhan Mantri Fasal Bima Yojana CSC Login करणे
- PMFBY अंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला डिजिटल सेवा केंद्राच्या अधिकृत वेबसाइटमध्ये यायचे आहे.
- त्यानंतर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला लॉगिनच्या पर्यायामध्ये जावे लागेल.
- लॉगिन डॅशबोर्डमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमचे CSC आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.
- पुढे कॅप्चा कोड दिसेल ते व्यवस्थित भरून घेणे.
- कॅप्चा कोड टाकल्यानंतर साइनइन करणे.
- सियासी अंतर्गत लॉगिन झाल्यावर तुम्हाला Search बॉक्स दिसेल.
- त्या सर्च बॉक्समध्ये PMFBY टाईप करा, त्यामध्ये खाली स्कीम दिसेल ती निवडा.
- त्यानंतर तुम्ही डायरेक्ट PM Fasal Bima Yojana च्या Official Website प्रवेश कराल.
- प्रधानमंत्री फसल बीमा योजनाच्या वेबसाइटमध्ये आल्यावर तुम्हाला CSC Connect चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे.
- जर तुम्ही योजनेच्या वेबसाइटमध्ये पहिल्यांदा आला असाल, तर Yes हा पर्याय निवडा.
- अशा प्रकारे प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत CSC Login झालेले आहे.
Step-2: Pradhan Mantri Fasal Bima Yojana Application Form उघडणे
- CSC लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Application या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर स्क्रीन उघडून येईल, त्यामध्ये राज्याचे नाव, वर्षमी सेक्टर आणि स्कीमची यादी बघायला मिळेल.
- त्यामध्ये प्रेसेंट वर्ष, खरिफ/रब्बी व प्रधानमंत्री फसल बीमा योजनाचा पर्याय दिसेल तो निवडू शकता किंवा सर्चचा ऑपशनमध्ये जाऊन योजनेची निवड करू शकता.
- योजनेची निवड केल्यानंतर तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहत आहेत? त्याची निवड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला Application चा डॅशबोर्ड उघडून येईल, त्यामध्ये सहा प्रकारचे पर्याय दिसतील.
- जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असल्यास सर्वात प्रथम असलेला Application Form सिलेक्ट करणे.
- अशा पद्धतीने प्रधानमंत्री फसल बीमा योजनाचा एप्लिकेशन फॉर्म उघडून येईल.
Step-3: PMFBY मधून रक्कम मिळण्यासाठी बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे
- CSC अंतर्गत तुमचा Farmer Application फॉर्म उघडल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच राज्य व स्कीमचे नाव दिसेल.
- त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर Change SSSY ID च्या बटनाला क्लिक करून करू शकता.
- फॉर्ममध्ये खाली गेल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती भरायची आहे.
- सुरुवातीला IFSC कोड मध्ये Yes आणि No चा ऑपशन दिला असेल.
- त्याच्या माध्यमातून तुम्हाला स्वतः संपूर्ण बँक खात्याची माहिती द्यायची असेल तर नोवर क्लिक करा.
- जर तुम्हाला ऑटोमॅटिकली सर्व माहिती आणायची असल्यास एसवर क्लिक करून त्यांचा आयएफसी कोड टाकून व्हेरिफाय करू शकता.
- व्हेरिफाय झाल्यावर तुमच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर येईल.
- जर तुम्ही नो पर्याय निवडत असल्यास तुम्हाला राज्य व जिल्हा निवडायचे आहे.
- पुढे बँकेचे नाव आणि ब्रांचचे नाव यादीमधून निवडून घ्या.
- त्यानंतर बँक खात्याचे प्रकार पाहायला मिळेल, त्यामधील तुमचे कोणते आहेत? त्याची निवड करा.
- तुमचे Saving बँक अकाउंट नंबर दोन वेळा टाकून Confirm करा.
- त्यापुढे अकाउंट होल्डर सिंगल आहे कि जॉईंट त्याची निवड करून घ्या.
- त्यानंतर अकाउंट होल्डर किती जण आहेत? ते निवडून Check Bank Details and Continue वरती क्लिक करा.
- प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत रक्कम याच बँक खात्यामध्ये येणार असून ती व्यवस्थितरित्या तपासणी करूनच पुढच्या प्रोसेसमध्ये जावा.
Step-4: अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती भरणे
- सुरुवातीला बँक पासबुकप्रमाणे शेतकऱ्याचे नाव असेल ते भरून घेणे.
- त्यानंतर आधारकार्डनुसार शेतकऱ्याचे नाव आणि आधार क्रमांक/EID नंबर टाकून व्हेरिफाय करणे.
- जर आधारकार्ड वरती नाव व नंबर बरोबर असेल, तर हिरव्या रंगामध्ये टिकमार्क दिसेल.
- पुढे आधारकार्ड प्रमाणे नात्याच्या प्रकारामध्ये (s/o, d/o, w/o, c/o) यामधील एकाची निवड करा.
- Relative Name चा पर्याय असेल, त्यामध्ये वडील किंवा जोडीदाराचे नाव टाकणे.
- त्यानंतर मोबाईल नंबर, वय आणि लिंग काय आहे? त्याची माहिती देणे.
- अर्जदार General, OBC, ST आणि SC यामधील कोणत्या जातीमध्ये येतात? त्याची निवड करणे.
- Farmer Category मध्ये तीन पर्याय मिळतील, त्यामध्ये Owner, Tenant व Sharecropper असे ऑपशन पाहायला मिळेल.
- जर शेतकरी स्वतःच्या जमिनीवर शेती करत असल्यास Owner पर्याय निवडा.
- शेतकऱ्याने जमीन कोणाकडून भाड्याने घेतली असेल तर Tenant ऑपशन सिलेक्ट करा.
- जर शेती करण्यासाठी जमीन वाट्याने घेतली असेल तर Sharecropper निवडणे.
- पुढे शेतकऱ्यांची जमीन 1 हेक्टर पेक्षा कमी असल्यास Small निवडा आणि जर जास्त शेत जमीन असल्यास इतर पर्याय निवडू शकता.
Step-5: शेतकऱ्याच्या राहत्या ठिकाणचे पत्ता देणे
- प्रधानमंत्री फसल बीमा योजनामध्ये नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरचे पत्ता भरणे.
- सर्वात आधी त्यांचे राज्य कोणते आहे? त्याची निवड करणे.
- त्यानंतर त्यांचा जिल्हा आणि उपजिल्हा यादीनुसार सिलेक्ट करा.
- पुढे त्यांचे गाव/शहर निवडून पिनकोड लिहून घ्या.
- खाली Address चा पर्याय दिसेल, त्यामध्ये देखील त्यांचा सर्व पत्ता भरून घेणे.
Step-6: प्रधानमंत्री फसल बीमा योजनेसाठी Nominee Details भरणे
- योजनेमध्ये भविष्यात विमा मिळण्यासाठी नॉमिनीची माहिती देखील देऊ शकता.
- जर नॉमिनी देण्याची गरज नसल्यास Declare Nominee Later च्या बॉक्सला टिक करा.
- नॉमिनी द्यायचे असल्यास त्यांचे नाव, वय, नाते आणि त्यांचा संपूर्ण पत्ता भरून Save and Continue च्या बटनाला क्लिक करणे.
Step-7: शेतकऱ्याच्या पिकांची माहिती देणे
- ज्या पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमधून विमा घ्यायचा आहे, त्याची सर्व माहिती Crop Details मध्ये द्या.
- पहिले राज्य, जिल्हा, ब्लॉक, ग्रामपंचायत आणि गावाचे नाव टाकायचे आहे.
- स्क्रोल करून खाली आल्यानंतर Mix Cropping चा ऑपशन येईल, त्यामध्ये टिकमार्क करू नका.
- खाली Crop मध्ये Dhan व Makka असे दोन पर्याय उपलब्ध असतील, ज्या पिकांचे विमा करायचे आहे, त्याची निवड करणे किंवा एक-एक करून दोन्ही ऍड करू शकता.
- Sowing Date मध्ये शेतकऱ्याने कधी पीक लावले? त्याचे दिनांक देणे.
- पुढे शेतकऱ्याचे जमीचे Survey No आणि Khasra No भरून घ्या.
- त्यानंतर त्यांची शेतजमीन हेक्टरच्या क्षेत्रानुसार माहिती भरून घेणे.
- पिकांची संपूर्ण माहिती भरून झाल्यावर Add Crop or Survey Number for Insurance यावर क्लिक करा.
Step-8: Pradhan Mantri Fasal Bima Yojana Application Documents अपलोड करणे
- प्रधानमंत्री फसल बीमा योजनाच्या एप्लिकेशनमध्ये कागदपत्रे वरती दिलेल्या यादीनुसार स्कॅन करून अपलोड करून घेणे.
- सुरुवातीला पोर्टलमध्ये 500 kb च्या आत बँक पासबुकचे कागदपत्र अपलोड करण्यास सांगतात.
- परंतु इथे अपलोड होत नाही यासाठी 200 kb च्या आत पासबुक स्कॅन करून पीडीफमध्ये अपलोड करा.
- पुढे शेतकऱ्याचे Land Record ओनलाईन मिळून जाईल ती प्राप्त करून जोडणे.
- त्यानंतर Sowing Certificate ऑपशनमध्ये शेतकऱ्याचे स्वतःचे घोषणापत्र सही करून त्यामध्ये आधाकार्डसुद्धा स्कॅन करून अपलोड करणे.
- जर शेतकरी भाड्याने जमीन वापरात असेल तर कोर्टाच्या माध्यमातून कायदेशीर Tenant Certificate तयार करून अपलोड करावे लागणार.
Step-9: Pradhan Mantri Fasal Bima Yojana Form सबमिट करणे
- प्रधानमंत्री फसल बीमा योजनामध्ये सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Preview चा ऑपशन दिसेल.
- त्या प्रिव्हिएवच्या पर्यायामध्ये गेल्यानंतर भरलेला संपूर्ण फॉर्म दिसेल तो तपासून घेणे आणि काही बद्दल करायचे असल्यास Edit वर बटन दाबून करून घेणे.
- योजनेचा संपूर्ण फॉर्म तपासून व काही बदल करून झाल्यानंतर सबमिटच्या बटनावर क्लिक करणे.
- त्यानंतर योजना अंतर्गत विमा सुरक्षा घेण्यासाठी प्रत्येक पिकानुसार 1 रुपये पेमेंट करावे लागेल.
- पेमेंट करण्यासाठी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा CSC आयडी ओपन होऊन येईल, त्यामध्ये पासवर्ड टाकून Validate वर क्लिक करणे.
- पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि अर्ज केलेल्या पावती प्राप्त करण्यासाठी Print च्या ऑपशनमध्ये जाणे.
- त्यापुढे योजनेच्या एप्लिकेशनची पावती दिसेल, ती डाउनलोड करून शेतकरी अर्जदाराला द्या.
- त्या एप्लिकेशनमध्ये पिकाचे नुकसान झाल्यास किती रक्कम विमा स्वरूपात मिळणार त्याची नोंद केली असेल.
Read More: