Pocra Yojana 2024: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात या 21 जिल्ह्यांचा समावेश

Pocra Yojana 2024: शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये पोकरा योजना अंतर्गत राबविण्यासाठी दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत जवळपास 21 जिल्ह्यांमधील 6 हजार 959 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

पोकरा योजना अंतर्गत राज्य सरकारने जून, 2015 रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची सुरुवात केली होती. राज्य सरकारकडून आचारसंहिता लागू होण्याआधीच विविध प्रकारच्या योजनांसाठी मान्यता दिली गेली आहे. 

ज्यामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फायदे मिळण्यासाठी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 14 ऑक्टोबर, 2024 रोजी शासन निर्णय सुद्धा प्रकाशित करण्यात आला. महाराष्ट्रामधील शेतकरी वर्गाला लाभ मिळावा यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 6,959 गावांची निवड प्रकल्पासाठी करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव येथील सर्व गावांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Implementation of Pocra Scheme

त्याचप्रमाणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामधील कामे राबविण्याकरिता सुकाणू समिती स्थापित करण्यासाठी मुख्य सचिव अध्यक्षांकडून मान्यता देण्यात आली. 

ज्यामध्ये सुकाणू समिती कार्यालयातर्फे प्रकल्पाचे अहवाल, मंत्रिमंडळाची मान्यता, कार्यप्रणाली पुस्तिका, प्रकल्पाचा आराखडा आणि योजनेची अंमलबजावणी करण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. 

Villages under Pocra Yojana 

पोकरा योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील 21 जिल्ह्यांमधील शेतकरी नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधांचा लाभ देण्यात येतो. ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधील गावांचा समावेश केला आहे, ज्याची संख्या सुद्धा पाहायला मिळेल. 

योजना अंतर्गत कोणत्या 21 जिल्ह्यांचा समावेश आहे ? ते खालीलप्रमाणे दिले आहे. 

  • पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक (532), जळगाव (319), छत्रपती संभाजीनगर (296), वर्धा (383), नांदेड (375), हिंगोली (148), बीड (301), वाशीम (189), लातूर (216), जालना (177), परभणी (173), यवतमाळ (559), बुलढाणा (310), धाराशिव (138) आणि अमरावती (454) या जिल्ह्यांचा समावेश आहे. 
  • दुसऱ्या टप्प्यामध्ये अकोला (149), चंद्रपूर (561), नागपूर (563), गडचिरोली (532), गोंदिया (293) आणि भंडारा (291) या जिल्ह्यांचा २१ च्या यादीमध्ये समावेश करण्यात आले आहेत. 

Benefits of Pocra Scheme

  • पोकरा योजना अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या खर्चासाठी जागतिक बँकेतर्फे 6 हजार कोटी रुपयांची आर्थिक सहाय्यता घेण्यात आलेली आहे. 
  • योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उन्नत शेती करता नवीन संशोधन प्रकियाचा वापर करणे.
  • शेतकऱ्यांना शेतामध्ये कर्बग्रहण केल्यानंतर कार्बन क्रेडिट योजनेच्या माध्यमातून देणे. 
  • शेतकरी वर्गाला हवामान आधारित शेती पद्धतींचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे.  
  • शेतामधील कामांसाठी लागणाऱ्या पाण्याची कार्यक्षमता वाढविणे. 
  • नागरिकांना पौष्टिक आहार प्राप्त व्हावा यासाठी तृणधान्य उत्पादनावर भर दिले जाणार. 
  • त्याचप्रकारे शेतामध्ये होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करणे.

Read More: