PMKVY मध्ये नोंदणी करण्यास कोण पात्र आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PMKVY Eligibility: बेरोजगार तरुणांना PMKVY योजना अंतर्गत नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी लेखामध्ये दिलेल्या पात्रतेच्या अटी जाणून घेणे आवश्यक आहे. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

केंद्र सरकारच्या माध्यमातून PMKVY म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत लाभार्थी असलेल्या बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि त्याचसोबत ट्रेनिंग चालू असताना प्रतिमाह 8 हजार रुपये आर्थिक मदत सुद्धा पाठविली जाते. 

देशभरातील 1 कोटी पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांनी प्रधानमंत्री कौशल विकास योजनाच्या माध्यमातून अर्ज करून लाभ घेतलेला आहे. ज्यामध्ये त्यांनी विविध क्षेत्रामधील कोर्समध्ये नोंदणी करून आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहेत. 

योजनेच्या माध्यमातून लाभार्थी विद्यार्थ्यांना 40 पेक्षा जास्त विविध क्षेत्रामधील प्रशिक्षण घेण्यासाठी लाभ दिला जातो. त्याचसोबत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा वाटप केले जातात. जेणेकरून त्यांना नोकरीसाठी अर्ज करताना आणखी एक पुरावा देण्यात मदत होते.  

तुम्ही सुद्धा PM Kaushal Vikas Yojana अंतर्गत लाभ घ्यायचा विचार करत असाल, तर अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला आर्टिकलमध्ये दिलेल्या पात्रतेच्या अटीबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमचे नोंदणी एप्लिकेशन सहजरित्या स्वीकारले जातील.

  • योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी फक्त बेरोजगार तरुण पात्र आहेत. 
  • भारत देशामध्ये राहत असलेले बेरोजगार तरुण वर्ग योजनेमध्ये अर्ज करू शकतात. 
  • योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी अर्जदारांकडे मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधारकार्ड, ओळखपत्र, बँकेचा पुरावा, मतदान आयडी, शैक्षणिक पुरावा, पॅनकार्ड आणि फोटो ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 
  • अर्ज करणारे तरुण कोणत्याही ठिकाणी कामाला नसावे. 
  • रजिस्ट्रेशन करण्यासाठी दहावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. 
  • त्याचसोबत तरुणांना इंग्रजी व हिंदी भाषा संबंधित ज्ञान असावे. 
  • अर्जदार बेरोजगारांचे आधारकार्ड त्यांच्या बँक खात्याला जोडलेले असावे.

Read More: