PMEGP Loan Yojana 2024: जर तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी कुठेही लोन मिळत नाही, तर तुम्ही निश्चितं रहा. कारण केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार देतेय तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी २० लाखांपासून ते ५० लाखांपर्यंतचे लोन.
एक खरी गोष्ट आहे, जर एका व्यक्तीकडे उत्पन्नाचा पुरावा आहे आणि चांगले पैसे कमावतो आहे. तर त्या व्यक्तीला व्यवसाय करण्यासाठी खाजगी व सरकारी बँक सहज लोन देते. परंतु जर एक व्यक्ती गरीब कुटुंबातील आहे आणि छोटा-मोठा व्यवसाय करत असेल, तर खाजगी व सरकारी बँक लोन देत नाही. यामुळे आपल्या देशामधील गरीब माणूस अजून गरीब होतोय आणि श्रीमंत व्यक्ती अजून जास्त श्रीमंत होत चालला आहे.
अशा परिस्थितीमुळे केंद्र सरकारे PMEGP Loan Scheme सुरु केली आहे. ज्यामध्ये गरीब वर्गातील कामगार लोक, छोटे व्यवसाय करणारे लोक, ज्यांच्याकडे कोणते रोजगार नाही अशा लोकांना सरकार योजनेच्या माध्यमातून जास्त कालावधी लोन प्राप्त करून देत आहे. त्याचसोबत ३५% सबसिडी सुद्धा लाभार्थींना देत आहेत.
जर तुम्हाला सुद्धा व्यवसाय करायचा आहे, परंतु कोणत्याच बँकेतून लोन भेटत नाही, तर आम्ही दिलेल्या पीएमईजीपी योजनाच्या लेखामधून संपूर्ण माहिती जाणून घ्या. ज्यामध्ये आम्ही या योजनेच्या माध्यमातून लोन कसे घेऊ शकतो? याबद्दल प्रकिया सांगितली आहे. त्याचसोबत योजनेचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन रजिस्ट्रेशन या संदर्भात संपूर्ण माहिती सांगितली आहे, तर ती शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा.
PMEGP Loan Yojana in Marathi
केंद्र सरकारने बेरोजगार नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत मिळवी यासाठी PMEGP Scheme म्हणजेच Prime Minister’s Employment Generation Programme Scheme या नावाने सुरु करण्यात आली. या योजनेचे मराठीमध्ये अर्थ प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असा होतो. ही योजना सूक्ष, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयतर्फे चालविण्यात येत आहे.
केंद्र सरकारचे ध्येय आहे की, पीएमईजीपी लोन योजना या उपक्रमातून देशामधील गरीब वर्गातील लोकांना छोटे- मोठे बिजनेस सेटअप करणे. जेणेकरून देशामधील बाकी लोकांनासुद्धा रोजगार मिळण्यास मदत होईल.
जर तुम्ही सर्विस आधारित व्यवसाय चालू करत असाल, तर सरकार तुम्हाला १० लाखांचा लोन आणि सबसिडी प्रदान करते. जर तुम्ही manufacturing व्यवसाय सुरु करत असाल, तर २५ लाखांपर्यंतचे लोन व सबसिडी दिली जाईल.
PMEGP Loan Yojana 2024 Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, पीएमईजीपी |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
विभाग | सूक्ष, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय |
उद्देश | गरीब वर्गातील नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | देशामधील गरीब कुटुंब |
लाभ | १० लाख रुपये ते ५० लाख रुपये लोन व सबसिडी |
अर्ज पद्धत | ऑनलाईन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | kviconline.gov.in |
PMEGP Loan Yojana Aim
केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएमईजीपी लोन योजनाचे मुख्य उद्देश देशामधील गरीब वर्गातील नागरिकांना व्यवसाय सेटअप करण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत पुरविणे. जेणेकरून प्रत्येक राज्यात नागरिक आपले छोटे-मोठे व्यवसाय सुरु करून रोजगार निर्माण करण्यात मदत होईल. प्रत्येक राज्यात छोटे मोठे उद्योग सुरु केल्यामुळे राज्यातील लोकांना रोजगार कमविण्यासाठी मदत होईल आणि त्यामुळे कोणत्याही राज्यातील नागरिक रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरण करणार नाही.
देशामधील ज्या नागरिकांकडे उत्पन्न नसल्यामुळे कोणतेही बँक त्यांना लोन देण्यास नकार देतात. अशा लोकांना या योजनेच्या माध्यमातून अर्ज करून सहजरित्या लोन प्राप्त करू शकतात. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लोनच्या संधीमुळे गरीब वर्गातील नागरिक चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण करून आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मजबूत राहतील.
PMEGP Loan Yojana Benefits
- पीएमईजीपी लोन योजनेचा फायदा देशामधील गरीब कुटुंबातील नागरिक घेऊ शकतात.
- या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक स्वरूपात लोन प्राप्त करून दिले जाते.
- ग्रामीण व शहरी क्षेत्रात राहणारे नागरिक या योजनेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.
- सरकारतर्फे service, manufacturing आणि Trade या क्षेत्रातील व्यवसायासाठीच लोन दिले जाते.
- सरकार बँकेच्या माध्यमातून लोन उपलब्ध करून देते, त्यासोबत सरकारतर्फे सबसिडीसुद्धा मिळते.
- सरकारतर्फे मिळणाऱ्या सबसिडीच्या रक्कमेतून एकाप्रकारे लाभार्थींचे व्याजाचे ओझे कमी होते.
- सर्विस आधारित व्यवसाय चालू करण्यासाठी सरकार अर्जदारांना १० लाखांपर्यंतचे लोन देते.
- manufacturing आधारित व्यवसायासाठी २५ लाखांपर्यंतचा लोन मिळू शकतो.
- या योजनेतून मिळणाऱ्या लोन हे फक्त पब्लिक, ग्रामीण व कॉपरेटिव्ह बँकेमधूनच मिळेल.
- जर लाभार्थींचे जनरल कॅटेगरी असेल तर स्वतःचे १०% योगदान द्यावे लागेल आणि बाकीचे ९०% सरकार देते.
- जर लाभार्थी स्पेसिअल कॅटेगरी म्हणजेच SC, ST, OBC व महिला यांना ५% योगदान द्यावे लागेल आणि ९५% सरकारतर्फे दिले जाते.
- जर व्यक्ती जनरल कॅटेगरीमधील असून शहरी भागातील असतील तर १५% सबसिडी दिले जाते.
- जे नागरिक स्पेसिअल कॅटेगरीमधील असून शहरी भागातील असतील तर २५% सबसिडी देण्यात येते.
- त्याचप्रमाणे जे नागरिक जनरल कॅटेगरीमध्ये असतील आणि ग्रामीण भागात असतील तर त्यांना २५% सबसिडी दिली जाते.
- तसेच जे लाभार्थीं स्पेसिअल कॅटेगरीशी संबंधित असतील व ग्रामीण भागातील असतील तर त्यांना ३५% सबसिडीचा लाभ मिळतो.
- या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियांचा वापर करू शकता, यामध्ये कोणत्याही एजन्टची गरज नसते.
- या योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना EDP ट्रेनिंग सुद्धा दिले जाते. यामध्ये लाभार्थींना व्यवसाय कसा करायचा? व कसे यशस्वी करू शकतो? याबद्दल प्रशिक्षण ऑनलाइन दिले जाते.
PMEGP Loan Yojana Eligibility
लोनसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर पीएमईजीपी लोन योजनासाठी पात्रता असणे गरजेचे आहे, ते खालीलप्रमाणे अटीनुसार सांगण्यात आलेले आहेत.
- या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी नागरिकांना भारताचे स्थानिक रहिवासी असणे महत्त्वाचे आहे.
- अर्जदार व्यक्तीचे वय कमीत कमी १८ वर्ष असणे आवश्यक आहे.
- व्यवसाय सुरु करणाऱ्या व्यक्तीचे शिक्षण कमीत कमी आठवी पास असणे.
- या योजने अंतर्गत लोन प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उत्पनाचा पुरावा द्यावा लागत नाही.
- जो अर्जदार सरकारच्या इतर योजनांमधून पैसे घेऊन व्यवसाय करत असतील तर ते यासाठी पात्र नाही.
- सर्वात महत्वाची गोष्ट अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहेत.
- व्यवसाय चालू असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या व्यक्तींना नवीन व्यवसाय सेटअप टाकायचा आहे, फक्त त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार.
- कुटुंबातील पती किंवा पत्नी या दोघांपैकी कोना एकालाच लोन मिळू शकेल.
PMEGP Loan Yojana Required Documents
नागरिकांना अर्ज करताना पीएमईजीपी लोन योजनासाठी आवश्यक कागदपत्र खालीलप्रमाणे यादीनुसार दिलेली आहे ती सोबत असणे आवश्यक आहेत.
- पासपोर्ट साइझ फोटो
- शैक्षणिक पूर्व जसे मार्कशीट
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- ग्रामीण विभाग सर्टिफिकेट (जर तुम्ही ग्रामीण क्षेत्रामधील असाल तर)
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- बँकेचे पासबुक
- क्रेडिट स्कोर शीट
PMEGP Loan Yojana Online Apply
जे व्यक्ती आपल्या व्यवसायासाठी लोन घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनी खालील दिलेल्या पीएमईजीपी लोन योजना रजिस्ट्रेशन प्रकिया स्टेप बाय स्टेप जाणून घ्या आणि अर्ज करून लाभ मिळवा.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला खादी व ग्रामद्योग कमिशनची अधिकृत वेबसाइट उघडायची.
- त्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडेल, त्यामधील PMEGP Online Application पर्यायावर क्लिक करायची.
- त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम स्कीमचे पेज उघडेल त्यावरील apply बटनावर क्लिक करायचे.
- त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये एप्लिकेशन फॉर्म दिसेल.
- त्या एप्लिकेशन फॉर्म विचारली गेलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक संपूर्ण भरून घेणे.
- फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अप्लोड करणे.
- फॉर्म व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घोषणाप त्रावर क्लिक करून सबमिट करणे.
- त्यानंतर तुम्हाला यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल तो जपून ठेवणे.
- अशा प्रकारे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे.
निष्कर्ष
आम्ही तुम्हाला PMEGP Loan Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितली. यामध्ये आम्ही योजनांचे महत्त्व काय आहेत? यातून कोणाला लाभ घेता येणार? ती का चालू करण्यात आली? त्यामागचे उद्देश काय होते? त्यांचे फायदे काय आहेत? त्यासाठी पात्र कोण असणार आहेत? यामध्ये अर्ज करताना कोणते कागदपत्र लागणार आहेत? त्याचप्रमाणे अर्ज कशाप्रकारे करू शकतो? आणि लाभ काय काय मिळणार? या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तररित्या सांगितली.
तुम्ही सुद्धा या योजनेत अर्ज करून लाभ घेण्यासाठी विचार करत असाल, तर आमचा हा लेख संपूर्ण वाचून अर्ज करा आणि लाभ घ्या. तसेच आमचा हा लेख उपयुक्त वाटला असेल तर गरजू लोकांना पाठवून त्यांनाही व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करा.
अशाच प्रकारच्या योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करा किंवा Telegram/WhatsApp ला जॉईन करा.
FAQs
पीएमईजीपी कर्जासाठी कोण पात्र आहे?
पीएमईजीपी कर्जासाठी देशातील गरीब वर्गातील १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील नागरिक पात्र आहेत.
PMEGP योजने अंतर्गत कोणता व्यवसाय येतो?
या योजने अंतर्गत service, manufacturing आणि Trade क्षेत्रामधील व्यवसाय येतो.
PMEGP चे लाभार्थी कोण आहेत?
या योजनाचे लाभार्थी देशामधील आठवी पास नागरिक आहेत.
2024 मध्ये PMEGP कर्जाची मर्यादा किती आहे?
2024 मध्ये या योजनेतून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा १० लाख ते ५० लाख इतकी आहे.
PMEGP सबसिडी किती आहे?
या योजनेची सबसिडी १५% ते ३५% इतकी आहे.
पुढे वाचा: