PM Yashasvi Yojana Apply Online: असे अर्ज करून मिळवा, 1,25,000 रुपये स्कॉलरशिप

PM Yashasvi Yojana Apply Online: या आर्टिकलमध्ये प्रधानमंत्री यशस्वी योजनासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याबद्दल सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप देण्यात आलेली आहे. जेणेकरून तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या साहय्याने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून 1,25,000 रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळवू शकता.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

भारत देशामधील OBC, SC, ST, CS, DNT, SNT, EBC आणि CSS वर्गातील तरुण मुलांना त्यांचे उच्च शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकाने प्रधानमंत्री यशस्वी योजना 2024 मध्ये आणली आहे.

ज्याच्या माध्यमातून गरीब व आर्थिक दृष्टया कमकुवत असलेल्या अकरावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक लाख पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे नववी व दहावीमध्ये शिकत असलेल्या मुलांना 75 हजार रुपये योजनेच्या अंतर्गत प्रदान करण्यात येते.

तुम्ही सुद्धा उच्च शिक्षणासाठी सरकारच्या या योजने अंतर्गत आर्थिक लाभ घ्यायचा विचार करत असाल, तर आम्ही लेखामध्ये दिलेल्या ऑनलाइन प्रकियेला फॉलो करून रजिस्ट्रेशन करा आणि स्कॉलरशिप मिळवा.

  • सर्वात प्रथम तुम्हाला Scholarship ची ऑनलाईन पोर्टल मोबाईल किंवा डेस्कटॉपमध्ये उघडायची आहे. 
  • पोर्टल उघडल्यानंतर तुम्हाला Student नावाचा पर्याय मिळेल, त्यामध्ये प्रवेश करा. 
  • प्रवेश केल्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करावे लागेल, यासाठी Register Yourself मध्ये जाणे. 
  • त्यामध्ये गाईडलाईन्स दिल्या असतील ते पूर्ण वाचून टिकमार्क करा. 
  • पुढे तुमचा मोबाईल नंबर टाकून गेट ओटीपीवर क्लिक करणे 
  • आलेला ओटीपी व कॅप्चा कोड भरून व्हेरिफाय करा. 
  • त्यानंतर eKYC चा पर्याय मिळेल, त्यामध्ये आधार नंबरनुसार प्रकिया पूर्ण करा. 
  • फिनिश पर्यायामध्ये गेल्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करून प्रोसेस पूर्ण करा. 
  • पुन्हा डॅशबोडमध्ये येऊन OTR किंवा Aadhaar च्या साहय्याने लॉगिन करून घ्या. 
  • पोर्टलमध्ये लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर योजनेचा फॉर्म उघडेल. 
  • तो फॉर्म संपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घेणे. 
  • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फॉर्म पोर्टलमध्ये सबमिट करणे. 
  • या पद्धतीने तुमचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रकिया पूर्ण झालेली आहे.

Read More: