PM Yashasvi Yojana Admit Card Download: आपल्या या लेखामध्ये प्रधानमंत्री यशस्वी योजना अंतर्गत मिळणारे ऍडमिट कार्ड डाउनलोड प्रकिया स्टेप बाय स्टेप जाऊन घेणार आहोत. त्याचप्रमाणे कोणत्या पोर्टलमध्ये जाऊन डाउनलोड करायची? हे देखील पाहणार आहोत तर आर्टिकल ध्यानपूर्वक शेवटपर्यंत पहा.
भारतामधील तरुण युवकांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2024 रोजी प्रधानमंत्री यशस्वी योजनाची सुरुवात केली आहे. ज्याच्या माध्यमातून योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थाना 75,000 रुपये ते 1,25,000 रुपयाची रक्कम स्कॉलरशिप स्वरूपात त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नववी ते बारावीमध्ये उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची मेरिट यादीच्यामार्फत निवड केली जाते. ज्यामध्ये यशस्वी प्रोग्राम अंतर्गत परीक्षाची घोषणा केली जाते.
परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टलद्वारे ऍडमिट कार्ड प्रदान केले जाते. ज्यामध्ये परीक्षेची तारीख, वेळ आणि सर्व सूचना असतात. हेच ऍडमिट कार्ड पोर्टलद्वारे कसे डाउनलोड करायचे? हे खालील दिलेल्या प्रक्रियांमध्ये जाणून घेण्यास मदत मिळेल.
प्रधानमंत्री यशस्वी योजनाचे ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे?
- सुरुवातीला तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये PM Yashasvi Yojana ची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला Registered Candidate Login मध्ये जायचे आहे.
- ज्या वेळेला तुम्ही अर्ज केला असेल तेव्हा तुम्हाला एप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि सुरक्षा क्रमांक मिळाला असेल.
- त्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचे एप्लिकेशन नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या समोर हॉल तिकीटची संपूर्ण माहिती डॅशबोर्डमध्ये उघडून येईल.
- त्यामध्ये तुमचा ऍडमिट कार्ड असेल, ते व्हेरिफाय करून घ्या.
- वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर ते डाउनलोड करून घेणे.
- ऍडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर प्रिंट करून परीक्षेला घेऊन जाणे.
Read More: