PM Vishwakarma Yojana Payment Status Check 2024: मिळायला लागले पीएम विश्वकर्मा योजनाचे पैसे, असे करा ऑनलाइन चेक

PM Vishwakarma Yojana Payment Status Check 2024: जर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे, तर तुमच्यासाठी खुशखरबर केंद्र सरकार योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पैसे देत आहेत. ज्यामध्ये तुम्ही सुद्धा घर बसल्या मोबाईलच्या साहायाने योजनेची रक्कम आली आहे का? ते चेक करू शकता.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

पीएम विश्वकर्मा योजनाची सुरुवात केंद्र सरकारने देशामधील असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी केली आहे. ज्यामध्ये भारत देशामधील एकूण 140 पेक्षा जास्त जातीचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत 18 पेक्षा जास्त व्यवसाय क्षेत्रामधील नागरिकांना योजनेचा लाभ दिला जातो. 

PM Vishwakarma Yojana काय आहे? 

भारत देशामधील असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना सामाजिक व आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 01 फेब्रुवारी, 2023 रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाची सुरुवात केली. ज्याच्या माध्यमातून लाभार्थ्यांना 15 दिवसांचे बेसिक पासून ते ऍडव्हान्स प्रशिक्षण दिले जाते आणि प्रशिक्षण घेत प्रत्येक दिवशी 500 विद्यावेतन सुद्धा देण्यात येते. 

लाभार्थ्यांचे 15 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे व्यवसाय सुरु करण्यासाठी 15,000 रुपये टूलकिट घेण्यासाठी देण्यात येते. त्याचप्रकारे ज्या नागरिकांची रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे, त्यांना 50 हजार रुपये ते 3 लाखांपर्यंत बिजनेस लोनची सुविधा देखील उपलब्ध करून दिले जाते.

PM Vishwakarma Yojana Payment Status Check कसे चेक करायचे?

  • योजनेचे पैसे चेक करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in ही वेबसाइट मोबाईलमध्ये उघडायची आहे. 
  • त्यानंतर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला Login या पर्यायामध्ये जाऊन बेनेफिशियरी लॉगिनवर क्लिक करायचे. 
  • पुढे तुमच्या समोर नवीन स्क्रीन उघडून येईल, त्यामध्ये तुमचे आधारकार्डसोबत लिंक केलेले मोबाईल नंबर टाकायचे आहे. 
  • डॅशबोर्डवरील कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा. 
  • मोबाईलमध्ये आलेला ओटीपी नंबर टाकून व्हेरिफाय करून घ्या. 
  • त्यानंतर तुम्ही नवीन पेजमध्ये प्रवेश कराल आणि त्यामधील Payment Status या ऑपशनला सिलेक्ट करा. 
  • ऑपशन सिलेक्ट केल्यावर तुमच्या स्क्रीनवर योजना संबंधित संपूर्ण पेमेंट स्टेट्स दिसून येईल.

Read More: