PM Vishwakarma Yojana Loan Eligibility: विश्वकर्मा कर्जासाठी कोण पात्र आहेत?

PM Vishwakarma Yojana Loan Eligibility: पीएम विश्वकर्मा योजनामध्ये कर्ज घेण्यासाठी लेखामध्ये दिलेल्या या 18 पारंपरिक क्षेत्रामध्ये पात्र असणे आवश्यक आहे, ते कोणकोणते क्षेत्र आहेत? त्यांची यादी आणि पात्रतेच्या संपूर्ण अटी सुद्धा या आर्टिकलमध्ये पाहायला मिळेल. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

केंद्र सरकारच्या माध्यमातून भारत देशामधील जवळपास 140 पेक्षा जास्त जातींच्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यामध्ये 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या असंघटित क्षेत्रामधील समुदायांचा समावेश PM Vishwakarma Yojana अंतर्गत करण्यात आलेला आहे. 

पीएम विश्वकर्मा योजनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आणि 15,000 रुपये टूलकिट घेण्यासाठी दिले जातात. तसेच 50,000 रुपये पासून ते 3 लाखांपर्यंत कर्ज सुद्धा 5% व्याजदराप्रमाणे केंद्र शासनाकडून उपलब्ध करून दिले जाते. योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने 13 हजार कोटी रुपयांचा बजेट देखील मंजूर केला आहे. 

  • पीएम विश्वकर्मा योजनेमधून कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असणे. 
  • कर्जासाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबामधील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावे. 
  • योजने अंतर्गत समावेश केलेल्या 18 पारंपरिक व्यवसाय अंतर्गत समावेश असणे आवश्यक आहे. 
  • त्याचप्रमाणे अर्ज करत असलेल्या व्यक्तीने मागील 5 वर्षांच्या कालावधीमध्ये राज्य किंवा केंद्र सरकारच्या राबविण्यात आलेल्या प्रोग्राम अंतर्गत लोन घेतलेले नसावे. 
  • कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला कर्ज घेण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. 
  • अर्जदार योजनेमध्ये कर्जाचा लाभ घेण्यासाठी असंघटित क्षेत्रात स्वयंरोजगार करत असावा. 
  • कर्जासाठी अर्ज करताना व्यक्तीकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खात्याचे पुरावे, ओळखपत्र आणि रेशन कार्ड ही सर्व कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे. 
  • शिल्पकार
  • शिंपी 
  • न्हावी 
  • कुंभार 
  • सुतार 
  • बोटी बनविणारा 
  • सोनार 
  • मोची 
  • शस्त्र बनविणारा 
  • माळ बनविणारा 
  • चटई आणि झाडू तयार करणारा 
  • धोबी 
  • लोहार 
  • राज मिस्त्री 
  • टाळा तयार करणारे 
  • मास्यांची जाळी बनविणारा 
  • हातोडा व टूलकिट निर्माण करणारे 
  • पारंपरिक बाहुल्या आणि खेळणे बनविणारे

Read More: