PM Vishwakarma Yojana Benefits: केंद्र सरकारने सुरु केलेल्या पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत विविध प्रकारचे आर्थिक लाभ लाभार्थ्यांना देण्यात येतात.
या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार भारत देशामधील प्रत्येक असंघटित क्षेत्रामध्ये येत असलेल्या नागरिकांना सामाजिक व आर्थिक स्वरूपात मदत करतात. ज्याच्यामार्फत प्रत्येक लाभार्थ्यांना आपले जीवन आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्यास मदत होते.
या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना कोणकोणत्या आर्थिक लाभाचा फायदा करून दिला जातो? आणि तसेच ही योजना काय आहे? त्याची संपूर्ण माहिती आर्टिकलमध्ये पाहायला मिळेल.
पीएम विश्वकर्मा योजना काय आहे?
या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने सप्टेंबर, 2023 मध्ये भारतामधील असंघटित क्षेत्रामधील नागरिकांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी केली. ज्याच्यासाठी केंद्र सरकारने 13 हजार कोटी रुपयांचा बजेट देखील सादर केला आहे.
देशामधील जवळपास 140 हुन अधिक विविध प्रकारच्या जातीमधील नागरिकांना आर्थिक फायदा करून दिला जातो. ज्यामध्ये असंघटित क्षेत्रामधील 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसायामध्ये काम करत असलेल्या नागरिकांना आर्थिक लाभ मिळवून दिला जातो.
त्याचसोबत योजने अंतर्गत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्याला त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये मोफत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ज्यामध्ये 15 दिवसांची ट्रेनिंग घेतली जाते आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येते.
पीएम विश्वकर्मा योजनाचे लाभ कोणते आहेत?
- विश्वकर्मा योजनेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना प्रशिक्षण घेताना प्रत्येक दिवशी 500 रुपये वेतन दिले जाते.
- लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरु करताना टूलकिट घेण्यासाठी 15,000 रुपये सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे पाठविण्यात येते.
- त्याचसोबत ज्या नागरिकांना आपला स्वतःचा मोठा व्यवसाय सुरु करण्यासाठी 50 हजार रुपये ते 3 लाख रुपये कर्ज वर्षाला 5 टक्के व्याजदराप्रमाणे दिले जाते.
Read More:
- PM Vishwakarma Yojana Payment Status Check 2024: मिळायला लागले पीएम विश्वकर्मा योजनाचे पैसे, असे करा ऑनलाइन चेक
- PM Vishwakarma Yojana Certificate Download PDF 2024: पीएम विश्वकर्मा योजनाचे सर्टिफिकेट आणि आयडी कार्ड PDF असे करा डाउनलोड
- PM Vishwakarma Yojana Loan Eligibility: विश्वकर्मा कर्जासाठी कोण पात्र आहेत?
- PM Vishwakarma Yojana Online Apply CSC 2024: विश्वकर्मा योजनामध्ये असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन