PM Vishwakarama Yojana Registration: या आर्टिकलमध्ये सामान्य नागरिक पीएम विश्वकर्मा योजनेत अर्ज कसा करू शकतो? याबद्दल सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे.
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत भारत देशामधील 140 पेक्षा जास्त विविध जातीमधील नागरिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये काही वर्गातील नागरिकांना योजनेमध्ये स्वतःहून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नाही.
Read More: PM Vishwakarma Certificate Download
त्याचप्रमाणे केंद्र सरकारने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी व योजना संबंधित अपडेट्ससाठी पोर्टल तयार केले आहे. त्या पोर्टलमध्ये सामान्य व्यक्ती योजनेची माहिती व अपडेट्स घेऊ शकतो, परंतु ऑनलाइन अर्ज करू शकत नाही.
विश्वकर्मा पोर्टलमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी व्यक्तीचे CSC म्हणजे सामान्य सेवा केंद्रामध्ये अकाउंट असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना ऑफलाइन अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी या आर्टिकलमध्ये ऑफलाइन पद्धत देण्यात आलेली आहे. ती पद्धत वापरून सहजरित्या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
Read More: PM Vishwakarma Yojana Loan Eligibility
पीएम विश्वकर्मा योजना अर्ज प्रकिया
- सामान्य नागरिकांना योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्या क्षेत्राजवळील CSC केंद्रामध्ये भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर केंद्रामधील कर्मचाऱ्याकडून योजनेमध्ये संबंधित संपूर्ण माहिती घेऊन फॉर्म प्राप्त करून घेणे.
- मिळालेल्या फॉर्ममध्ये योजनेसाठी आवश्यक असणारी माहिती विचारली असेल ती योग्यरीत्या भरणे.
- फॉर्ममध्ये माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे झेरॉक्ससोबत जोडणे.
- त्याचप्रमाणे अर्जदाराचे फोटो, मोबाईल नंबर व ई-मेल आयडी सुद्धा नमूद करणे.
- संपूर्ण फॉर्म तयार झाल्यानंतर पुन्हा CSC सेंटरमध्ये भेट देऊन कागदपत्रे जमा करून घेणे.
- त्यानंतर सामान्य सेवा केंद्रामधील कर्मचारी तुमचे रजिस्ट्रेशन अधिकृत पोर्टलद्वारे करून घेतील.
- कर्मचाऱ्याद्वारे अर्ज पूर्ण झाल्यानंतर चार्जेस भरून पावती घेणे.
- अशा पद्धतीने तुम्ही योजनेमध्ये अर्ज करू शकता.