PM Vishwakarama Yojana Details: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाची संपूर्ण माहिती सविस्तररित्या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली आहे.
भारत देशामधील विश्वकर्मा समुदायामधील नागरिकांना सामाजिक व आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे या योजनेची सुरुवात 01 फेब्रुवारी 2023 मध्ये करण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय बघते.
Read More: PM Vishwakarma Yojana
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनाच्या खर्चासाठी केंद्र सरकारने 13 हजार कोटी रुपयांचा बजेट सादर केला आहे. या योजनेचा कालावधी 2028 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. ज्याच्यामागचा मुख्य उद्देश भारत देशामधील पारंपारिक उत्पादनांमध्ये वाढ करून अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे.
या योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा समुदायातील नागरिकांना 15 दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये प्रत्येक दिवसाला लाभार्थ्यांना 500 रुपये स्टायपेंड स्वरूपात देण्यात येते. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सुद्धा प्रदान केले जाते.
Read More: PM Vishwakarma Yojana Loan Eligibility
तसेच योजनामध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय टूलकिट घेण्यासाठी 15 हजार रुपये रक्कम देण्यात येते. त्याचप्रमाणे नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 50 हजार रुपये ते 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यामध्ये फक्त 5% व्याज वर्षाला लाभार्थ्यांना द्यावे लागते.
त्याचप्रमाणे योजनेच्या मदतीने नागरिकांचा व्यवसाय योग्यरीत्या चालण्यासाठी आणि उत्पन्न कमावून देण्यासाठी National Committee for Marketing (NCM) नेमली आहे. या डिपार्टमेंटच्या मदतीने लाभार्थी नागरिकांना व्यवसायासाठी मार्केटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. त्याचप्रकारे त्यांना E-Commerce म्हणजे ऑनलाईन बिजनेस करण्याची देखील संधी उपलब्ध करून दिली जाते.
Read More: PM Vishwakarma Yojana Online Apply CSC
विश्वकर्मा समुदाय अंतर्गत असलेले सुतार, शिंपी, बोटी तयार करणारे, कुंभार, न्हावी, मोची, सोनार, लोहार, धोबी आणि इतर काही क्षेत्रामधील नागरिक योजनेमध्ये सहभागी पात्र आहेत. नागरिकांना योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी CSC म्हणजेच सामान्य सेवा केंद्रामध्ये जावे लागेल.