PM Vidya Lakshmi Yojana Documents Required: विद्या लक्ष्मी योजनेसाठी लागणार ही कागदपत्रे

PM Vidya Lakshmi Yojana Documents Required: विद्यार्थ्यांना विद्या लक्ष्मी पोर्टलमध्ये अर्ज करताना आर्टिकलमध्ये दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची यादी मिळेल, त्यानुसार 2 MB च्या खाली साईज असलेली पीडीफ, पीएनजी आणि जेपीजी फॉरमॅटमध्ये कागदपत्रे जमा करावी लागतील.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी विद्या लक्ष्मी योजनेची सुरुवात 06, नोव्हेंबर, 2024 मध्ये केली. ज्यामध्ये आर्थिक दृष्टया गरीब व मध्यम कुटुंबामधील 12 वीचे शिक्षण पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेण्यास मदत होते. 

Read More: Vidya Lakshmi Yojana Loan

या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी तरुणांना 7.5 लाख रुपये पर्यंत लोन रक्कम गॅरंटी शिवाय मिळते. योजने अंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना Vidya Lakshmi Portal मध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज करताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे लाभार्थ्यांना सबमिट करणे आवश्यक आहे. 

पोर्टलमध्ये अपलोड करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत? त्याची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 

Read More: Vidya Lakshmi Yojana Apply Online

विद्या लक्ष्मी योजनाची आवश्यक कागदपत्रे

  • 12वीमध्ये 50 टक्केच्या वरती असलेला शैक्षणिक पुरावा (मार्कशीट) 
  • विद्यार्थ्यांचे आधारकार्ड (बँक खात्यामध्ये लिंक असलेले) 
  • ज्या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करणार आहे, त्याची प्रवेश पुरावा 
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला
  • तरुणांचे पॅनकार्ड 
  • मोबाईल नंबर 
  • तरुणांचे पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • नवीनतम आयडी रिटर्न फाईल 
  • नवीनतम फॉर्म 16 
  • विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड नसल्यास हमी पत्र सादर करणे 
  • कोर्ससाठी लागणाऱ्या खर्चाचे पुरावे 
  • 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट 
  • ओळखपत्र (पासपोर्ट, ड्राइविंग लायसन्स किंवा मतदान कार्ड) 
  • स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
  • इंट्रास परीक्षेचे मार्कशीट
  • कोर्ससोबत हॉस्टेलचा खर्च व ट्युशन फी