PM Vandana Yojana Beneficiary Status Check: मातृ वंदना योजनेची स्थिती कशी तपासायची? 

PM Vandana Yojana Beneficiary Status Check: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची लाभार्थी स्थिती पाहण्यासाठी आर्टिकलमध्ये सर्विस्तर ऑनलाइन प्रकिया देण्यात आलेल्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून  थेट आर्थिक मदत पाठवली जाते. केंद्र शासनातर्फे आर्थिक मदत पाठविण्याआधी त्याची लाभार्थी यादी तयार करून पोर्टलमध्ये अपलोड केली जाते. त्या लाभार्थी यादीमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहे, त्यांची संपूर्ण माहिती दिसते. 

Read More: PM Matru Vandana Yojana

योजने अंतर्गत तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण केला असाल आणि PMMVY योजनेची स्थिती पाहायची असल्यास तुम्हाला वित्त मंत्रालयाच्या pfms.nic.in पोर्टलमध्ये जावे लागेल. पोर्टलमध्ये कशा प्रकारे योजनेची लाभार्थी स्थिती पाहायची आहे? याची प्रकिया खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

Read More: Pradhan Mantri Matru Vandana Yojana Registration

PMMVY लाभार्थी स्थिती ऑनलाइन कशी तपासायची?

  • योजनेची स्थिती पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही अधिकृत पोर्टलमध्ये pfms.nic.in जावा. 
  • पोर्टलमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला Payment Status चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा. 
  • त्या पेमेंट स्टेटसच्या यादीमधील DBT Status Tracker च्या ऑप्शनमध्ये जावा. 
  • त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामधील Category मध्ये PMMVY चा पर्याय निवडा. 
  • पुढे Beneficiary Validation वर टिक करून बँकेच्या नावाचे पहिले 5 अक्षर टाका. 
  • योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करताना मिळालेला Application ID किंवा Account Number भरा. 
  • त्यानंतर कॅप्चा कोड भरून Search बटनावर क्लिक करा. 
  • तुमच्या स्क्रीनवर तक्त्याच्या स्वरुपात योजनेची संपूर्ण स्थिती उघडून येईल.