PM Svanidhi Yojana Loan Status Check: तुम्ही स्वानिधी योजनामध्ये रजिस्ट्रेशन केले असाल आणि तुम्हाला आता कर्जाची स्थिती पाहायची असल्यास आर्टिकलमध्ये दिलेल्या प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
केंद्र सरकारने योजनेमधून स्ट्रीट वेंडर्स नागरिकांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि अर्ज केलेल्याची स्थिती पाहण्यासाठी ऑनलाईन पोर्टल उघडले आहे. त्या पोर्टलच्या साहाय्याने ज्या नागरिकांनी कर्जासाठी अर्ज केले आहेत, त्यांना स्टेटस पाहण्यासाठी रजिस्टर एप्लिकेशन आयडी आणि मोबाईल नंबर सादर करणे आवश्यक आहे.
आता योजनेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये कशाप्रकारे कर्जाची स्थिती पाहायची? यासाठी खालीलप्रमाणे सविस्तर प्रकिया स्टेप बाय स्टेप सांगण्यात आलेल्या आहेत, त्यांना फॉलो करून संपूर्ण स्थिती पाहू शकता.
पीएम स्वानिधी योजना कर्जाची स्थिती पाहायची प्रकिया
- कर्जाची स्थिती पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला योजनेची अधिकृत वेबसाइट मोबाईल किंवा डेस्कटॉपमध्ये उघडायची आहे.
- त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती पोर्टलचे डॅशबोर्ड उघडून येईल, त्यामध्ये तुम्ही हिंदी आणि इंग्रजी भाषा सुद्धा निवडू शकता.
- पोर्टलच्या स्क्रीनवर तुम्हाला Know Your Application Status चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पेजमध्ये प्रवेश कराल.
- त्या पेजमध्ये सुरुवातीला तुमचा एप्लिकेशन नंबर भरायचा आहे.
- पुढे अर्ज करताना रजिस्टर केलेला तुमचा मोबाईल नंबर सुद्धा भरून घेणे.
- मोबाईल नंबर भरल्यानंतर ओटीपीसाठी रिक्वेस्ट करावी लागेल.
- रिक्वेस्ट बटनावर क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरवर आलेल्या कोड ओटीपी बॉक्समध्ये भरून घेणे.
- त्यानंतर Search बटणाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- सर्च केल्यानंतर तुमच्या समोर योजनेसाठी केलेल्या अर्जाची स्थिती पाहायला मिळेल.
- काही समस्या जर तुम्हाला आढळल्या तर तुम्ही 18000 11 1979 या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करू शकता.
Read More: