PM Svanidhi Yojana Information: पीएम स्वानिधी योजना काय आहे? पहा संपूर्ण माहिती

PM Svanidhi Yojana Information: या लेखामध्ये आपण पीएम स्वानिधी योजना काय आहे? त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे योजनेच्या माध्यमातून कोणाला आणि काय फायदे दिले जाते? हे सुद्धा पाहणार आहोत. 

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

आपल्या भारत देशामध्ये आपण पाहतो, बाजारामध्ये सर्व ठिकाणी छोटे छोटे व्यवसाय व धंदे सुरु करून काही न काही वस्तू किंवा फूड विकत असतात. त्या नागरिकांचे कायदेशीर असे काही पुरावा नसतो, जेणेकरून त्यांना लोन सारख्या सुविधा बँक किंवा इतर ठिकाणावरून मिळत नाही. 

भारत देशामधील जागोजागी रस्त्यावर आणि फुटपाथवर छोटे व्यवसाय करत असलेल्या नागरिकांना योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वानिधी योजना आणली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण लेखामधून जाणून घेणार आहोत.

पीएम स्वानिधी योजनाची माहिती 

भारतामध्ये रस्त्यावर व्यवसाय करणारे स्ट्रीट वेंडर्स यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने 01 जून, 2020 रोजी PM Svanidhi योजनेची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या वेंडर्सना शासनातर्फे कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 

या योजनेचा फायदा भारत देशामधील ग्रामीण व शहरी  भागातील स्ट्रीट वेंडर्स याना दिला जातो. योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना 10,000 रुपये ते 50,000 रुपयेपर्यंत कर्ज देण्यात येते. लाभार्थ्याना या कर्जासाठी फक्त 7% व्याजदर वर्षाला भरावा लागतो. 

त्याचसोबत योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या नागरिकांनी व्यवसाय करताना डिजिटल पेमेंटचा उपयोग केला, तर त्यांना प्रत्येक वर्षाला 1200 रुपये कॅशबॅक स्वरूपात लाभ शासनातर्फे देण्यात येतो. 

योजने अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेल्या लाभार्थ्यांना तीन टप्प्यामध्ये रक्कम दिली जाते. ज्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एका वर्षासाठी 10 हजार रुपये लोन उपलब्ध करतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 हजार रुपये आणि परतफेड करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी दिला जातो. हे दोन्ही योग्यरीत्या परतफेड केल्यास तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 हजार रक्कम मंजूर केली जाते, ज्यामध्ये 36 महिन्याचा कालावधी ठेवण्यात येतो.

Read More: