PM SVANidhi Yojana 2024: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी लहान व रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील रस्त्यावर छोटा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना कमी व्याज दरात 50,000 रुपये पर्यंतचे लोन आणि सरकारतर्फे सबसिडी दिली जात आहे.
आपल्या देशामध्ये बहुतांश लोक रस्त्यावर आणि फुटपाथवर व्यवसाय चालवतात. अशा प्रकारचे लोक आपल्या पोटापाण्यासाठी रस्त्यावर किंवा फुटपाथवर काही न काही सामान विकून पैसे कमावतात. जेव्हा कोरोना आपल्या देशभरात पसरला होता, तेव्हा अशाच सामान्य लोकांना त्याचा मोठा फटका बसला होता. असाच छोटा व्यवसाय करणाऱ्या सामान्य लोकांच्या समस्यांसाठी केंद्र सरकारने PM Svanidhi ची सुरुवात केली.
रस्त्यावरील आणि फुटपाथवरील सामान्य लोकांना प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत लाभ घेऊन रोजगार निर्माण करून चांगले पैसे कमविण्यासाठी आम्ही दिलेला लेख संपूर्ण शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा. यामध्ये आम्ही ही योजना काय आहे? त्याचे उद्देश, पात्रता, फायदे, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रकिया आणि संबंधित विषयावर बरेच काही सांगितले आहे.
PM SVANidhi Yojana in Marathi
केंद्र सरकारने 1 जून, 2020 रोजी देशामधील सामान्य लोकांना आपला व्यवसाय टाकून रोजगार निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना म्हणजेच Pradhan Mantri SVANidhi Yojana या उपक्रमाची सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून देशामधील सगळ्या इच्छुक रस्त्यावरील विक्रेत्यांना कोणतीही हमी न देता 1 वर्षासाठी 10,000 रुपये ते 50,000 रुपये कर्ज दिले जात आहे.
जेव्हा अर्जदार अर्ज करून पहिले कर्ज घेतील तेव्हा त्यांना या योजनेमधून 10,000 रुपये सुरुवातीला दिले जाणार. नंतर दुसऱ्या हफ्त्यामध्ये 20,000 रुपये आणि तिसऱ्या हफ्त्यामध्ये 50,000 कर्ज गॅरेंटीशिवाय दिले जाणार. त्याशिवाय केंद्र सरकारकडून अर्जदाराला 7% व्याज दरानुसार सबसिडीसुद्धा दिली जाणार. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला आहे.
SVANidhi Scheme 2024 Overview
योजनाचे नाव | PM Street Vendor AtmaNirbhar Nidhi |
सुरु कोणी केली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी |
सुरु कधी झाली | 1 जून, 2020 रोजी |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
विभाग | Ministry of Housing and Urban Affairs |
उद्देश | रस्त्यावरील विक्रेत्यांना गॅरेंटीशिवाय लोन प्राप्त करून देणे |
लाभार्थी | देशामधील सगळे रस्त्यावरील व फुटपाथवरील विक्रेते |
लाभ | 10,000 रुपये पासून ते 50,000 रुपयांपर्यंत कर्ज |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | pmsvanidhi.mohua.gov.in |
PM SVANidhi Yojana Purpose
केंद्र सरकारने सुरु केलेल्या PM Svanidhi योजनाचे उद्देश देशामधील सगळ्या रस्त्यावरील आणि फुटपाथवरील विक्रेत्यांना आत्मनिर्भर बनवणे हे आहे. आपल्या देशामध्ये भरपूर लोक आहे, ज्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही. याचे कारण त्यांच्याकडे योग्य उत्पनाचा पुरावा तसेच रस्त्यावर व्यवसाय करत असल्या कारणामुळे कर्ज दिले जात नाही. यासाठी केंद्र सरकार स्वतः अशा सामान्य लोकांपर्यत बँकांना समोरून आणून कर्ज घेण्यास मदत करत आहेत.
या योजनेच्या माध्यमातून व्यवसायासाठी मिळणाऱ्या कर्जाने रस्त्यावरील विक्रेता आपल्या व्यवसायातून चांगला रोजगार करून स्वतःचे घर चालविण्यासाठी त्यांना मदत मिळेल. यासाठी केंद्र सरकारने देशामधील भाजीवाले, फळवाले, फेरीवाले आणि ठेलेवाले यांना रोजगार प्राप्तीसाठी एक मदतीचा हात दिला आहे.
SVANidhi Scheme Benefits
- प्रधानमंत्री स्वनिधी या योजनेच्या मार्फत स्ट्रीट वेंडर्सना आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायला सरकारतर्फे कर्ज प्राप्त करून मिळणार.
- पात्र असलेले अर्जदार यामध्ये अर्ज करून 10,000 रुपये ते जास्तीत जास्त 50,000 रुपये पर्यंतचे लोन घेऊ शकतो.
- सरकारतर्फे दिलेल्या कर्जाची रक्कम वेळेवर भरल्यास लाभार्थींना 7% अधिक सबसिडी दिली जाईल.
- व्यवसाय करण्यासाठी लाभार्थीना सरकारकडून मिळालेल्या पहिला हफ्त्याची रक्कम वेळेवर भरल्यास दुसऱ्या हफ्त्याला 20,000 रुपये कर्ज उपलब्ध करून मिळणार.
- लाभार्थींना या योजने अंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतेही प्रकारचे पेनल्टी द्यावी लागणार नाही.
- या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांना सरकारतर्फे डिजिटलायझेशन वाढण्यासाठी डिजिटल देवाणघेवाणीला प्रोत्साहन दिले जात आहे.
- जे लाभार्थीं या योजनेच्या मार्फत मिळालेल्या लोनमधून व्यवसाय करत आहेत, त्यांनी डिजिटल पद्धतीचा वापर केल्यास प्रतिवर्षी 1200 रुपये कॅशबॅक सुद्धा दिले जाणार.
- लाभार्थींना भेटणाऱ्या या पहिल्या हफ्त्यासाठी 1 वर्षाचा कालावधी, तर दुसऱ्या हफ्त्यासाठी 18 महिन्यांचा आणि तिसऱ्या हफ्त्यासाठी 36 महिन्याचा वेळ कर्जाची रक्कम दिली जाणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे उद्देश बेरोजगार युवकांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करून आत्मनिर्भर बनविण्यास प्रोत्साहन देणे आहे.
SVANidhi Scheme Eligibility
पीएम स्वनिधी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी देशामधील सगळेच स्ट्रीट वेंडर्सना परवानगी आहे, परंतु खाली दिलेल्या पात्रतानुसारच या योजनेमध्ये अर्ज करू शकता.
- या योजनेचा लाभ भारतामधील रस्त्यावर किंवा फुटपाथवर बसणाऱ्या विक्रेत्यांनाच आहे.
- जे नागरिक या योजनेच्या अंतर्गत लोन घेणार आहे, त्या स्ट्रीट वेंडर्सना शहरी स्थानिक संस्था (ULB) यांच्याकडून वेंडिंग प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
- शहरी स्थानिक संस्था (ULB) यांच्याकडून झालेल्या सर्वेक्षण नंतर, जर वेंडिंग सुरु केली असेल तर ULB किंवा टाउन वेंडिंग कमेटी कडून शिफारस पत्र (LoR) घेणे आवश्यक आहे.
- ग्रामीण आणि शहरी रस्त्यावरील विक्रेत्यांना वेडिंग पत्र किंवा शिफारस पत्र ULB किंवा टाउन वेंडिंग कमेटी घेतलेले असावे.
- जे स्ट्रीट वेंडर्स भाजी विकतात, फळ विकतात किंवा अन्य वस्तूंचा व्यापार करतात ते सगळे नागरिक यामध्ये अर्ज करू शकतात.
SVANidhi Yojana Documents
- अर्जदाराचे आधारकार्ड (बँकेसोबत लिंक असणे)
- पॅनकार्ड
- बँक पासबुकचे समोरचे पहिले पान
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शहरी स्थानिक संस्थेमधून (ULB) मिळालेले ओळखपत्र
- वार्षिक उत्पनाचा दाखला
PM SVANidhi Yojana Registration
जे स्ट्रीट वेंडर या प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत अर्ज करून लाभ घेण्यास इच्छुक आहेत, ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन प्रकारे अर्ज करू शकतात. या दोन्ही प्रक्रिया खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप दिलेल्या आहेत. त्यानुसार लक्षपूर्वक प्रकिया वाचून फॉलो करा.
SVANidhi Scheme Online Registration
- पीएम स्वनिधी योजनेमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून सगळी माहिती दिसेल.
- त्या होमपेजवर तुम्हाला लोन अर्ज करायला तीन पर्याय दिसतील.
- तुमच्यानुसार त्यामधील लोनचा पर्याय निवडून क्लिक करा.
- लोनच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल.
- त्या नवीन पेजमध्ये तुमचा मोबाईल नंबर विचारतील तो टाकून घेणे.
- मोबाईल नंबर टाकून झाल्यावर कॅप्चा कोड टाकून घेणे.
- कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला OTP येईल.
- त्यानंतर OTP टाकून लॉगिन बटनावर क्लिक करणे.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर अर्जाचा PM Svanidhi Yojana Form उघडेल.
- त्या एप्लिकेशन फॉर्ममध्ये विचारली गेलेली सगळी माहिती लक्षपूर्वक भरून घेणे.
- फॉर्ममधील माहिती पूर्ण भरून झाल्यावर तुमचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घेणे.
- त्यानंतर अपलोड केलेले कागदपत्रे आणि फॉर्म व्यवस्थित तपासून सबमिट बटनवर क्लिक करणे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एप्लिकेशन नंबर मिळेल तो सांभाळून ठेवणे.
- अशा प्रकारे तुमची ऑनलाईन प्रक्रियेनुसार अर्ज पूर्ण झाला आहे.
- त्यानंतर तुमच्या अर्जाचे फॉर्म तपासणी होईल आणि वेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम पाठविण्यात येईल.
SVANidhi Scheme Offline Registration
- पीएम स्वनिधी योजना ऑफलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत किंवा मायक्रो फायनान्स संस्थेमध्ये जावे लागेल.
- त्या बँकेत किंवा मायक्रो फायनान्स संस्थेमधून या योजनासंबंधित माहिती जाणून घ्यायची आहे.
- त्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांकडून Application Form प्राप्त करायचा आहे.
- एप्लिकेशन फॉर्म घेतल्यानंतर तो योग्यरित्या भरून घेणे.
- फॉर्ममध्ये दिलेल्या आवश्यक कागदपत्रानुसार प्रिंट करून घेणे.
- प्रिंट केलेलं सगळे कागदपत्रे फॉर्मसोबत जोडून घेणे.
- त्यानंतर भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे बँकेमध्ये किंवा मायक्रो फायनान्स संस्थेमध्ये जाऊन जमा करणे.
- अशा प्रकारे तुमची ऑफलाईन अर्जाची प्रकिया पूर्ण झाली आहे.
- बँकेतर्फे तुमच्या अर्जाचा फॉर्म तपासला जाईल आणि तुम्ही पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये लोनची रक्कम पाठविण्यात येईल.
PM SVANidhi Yojana Application Status Check
या योजने अंतर्गत तुम्ही अर्ज केला असल्यास तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधी योजना एप्लिकेशन स्टेटस तपासण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रिया फॉलो करून तुमचे लोन मान्य झाले आहे की नाही ते पाहू शकता.
- Svanidhi Scheme अंतर्गत अर्जाची स्थिती तपासण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर वेबसाईटच्या होम पेज मध्ये तुम्हाला check status च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एप्लिकेशन नंबर किंवा मोबाईल नंबरचा पर्याय निवडायला येईल.
- ते निवडून झाल्यावर त्यामध्ये तुमचा नंबर टाकून request OTP वर क्लिक करणे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल वर OTP येईल तो त्यामध्ये टाकून घेणे.
- त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
निष्कर्ष
अशा प्रकारे या लेखातून तुम्हाला PM SVANidhi Yojana याबद्दल संपूर्ण माहिती मिळालीच असेल अशी मी आशा करतो. आम्ही या लेखात तुम्हाला या योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती सोबत त्यांचे उद्देश काय? त्यांचे फायदे काय? कोण कोण पात्र असणार? यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती? यासाठी अर्ज कसा करायचा? याबद्दल सविस्तर माहिती दिली.
तुम्ही सुद्धा एक छोटे व्यापारी असाल तर, या योजनेचा लाभ घ्या आणि तुमचे जीवन सफल करा. जर हा लेख तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या कुटुंबामधील गरजू लोकांनासुद्धा याचा लाभ घेण्यासाठी ही माहिती त्यांच्यासोबत Share करा. अशाच नवीन योजनांसाठी आम्हाला Subscribe करू शकता किंवा आमचा Telegram channel जॉईन करू शकता.
FAQs
20,000 PM स्वानिधी योजना काय आहे?
20,000 PM स्वानिधी योजना हे दुसऱ्या हफ्त्यामधील कर्जाची रक्कम आहे जी केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार.
पीएम स्वानिधीचा कालावधी किती आहे?
पीएम स्वानिधीचा कालावधी लोनसाठी 12 महिने आहे.
पीएम स्वानिधी कर्जासाठी कोण पात्र आहे?
पीएम स्वनिधी कर्जासाठी भारत देशामधील रस्त्यावरील आणि फुटपाथवरील विक्रेते पात्र आहेत.
Read More: