PM SVAMITVA Yojana 2024: केंद्र सरकारतर्फे भारत देशामधील ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री स्वामित्व योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या आधारे देशभरातील ग्रामीण भागातील गावागावांमध्ये ड्रोनच्या मदतीने मॅपिंग केली जाते, त्याचसोबत सर्वे सुद्धा केला जातो.
केंद्र व राज्य सरकार मिळून ग्रामीण भागातील विकास व नागरिकांना लाभ होण्यासाठी विविध प्रकारचे योजनांचे उपक्रम राबवत असतात. पुन्हा केंद्र सरकारने 2020 च्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबाना सक्षम व आर्थिक स्वरूपात वाढ होण्यासाठी पीएम स्वामित्व योजना सुरु केली.
या योजनेला देशभरात ऐतिहासिक पाऊल म्हणून उचलला गेला आहे असे सांगण्यात येत आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात काही प्रमाणात बदल घडवले जात आहे. त्याचसोबत गावागावांमधील लाखो नागरिकांचे सक्षमीकरण केले जाते.
या योजनेच्या मध्यातून गावातील नागरिकांचे सक्षमीकरण कसे केले जाते? त्याचप्रमाणे, योजना काय आहे? कोणत्या गोष्टीमुळे सुरु करण्यात आली? त्यांचे उद्देश नेमके काय आहेत? यामधून नागरिकांना व गावांना काय फायदा होणार? यामध्ये कोणकोणते कार्यालय देखरेख व कामकाज पाहणार आहेत? यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती लागणार? आणि ऑनलाइन अर्ज कशाप्रकारे केले जाते? अशा सर्व माहितीबद्दल आपल्या लेखात जाणून घेणार आहोत तर आर्टिकल शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा.
PM SVAMITVA Yojana in Marathi
24 एप्रिल, 2020 रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे प्रधानमंत्री स्वामित्व योजनाची सुरुवात पायलट प्रोजेक्ट रूपात करण्यात आली होती. SVAMITVA चे पूर्ण अर्थ म्हणजेच Survey of Villages and Mapping with Improvised Technology in Village Area असा आहे.
या योजनेच्या अंतर्गत गावागावातील लोकांच्या जमिनींचे सर्वे केले जाते व इथे सरकारतर्फे सांगण्यात आलेल्या टेकनॉलॉजि म्हणजेच ड्रोनचा वापर करून मॅपिंग केले जाते. योजनेमार्फत करण्यात येणाऱ्या मॅपिंगच्या आधारे नागरिकांची जमीन ड्रोनच्या मदतीने मोजली जाते.
ड्रोनच्या साहाय्याने ग्रामीण भागातील मॅपिंग केलेल्या नागरिकांना स्वामित्व प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत, त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या नावाचे जमीन प्रॉपर्टी कार्ड दिले जाते.
केंद्र सरकारकडून देण्यात येणारे कार्ड हे आधारकार्ड सारखेच असणार. जसे नागरिकांचे स्वतःची युनिक ओळख आधारकार्डच्या साहाय्याने होते, तशी त्यांच्या जमिनीची सुद्धा प्रॉपर्टी कार्डद्वारे होते. नागरिकांच्या जमीनुसार या प्रॉपर्टी कार्डचे सुद्धा युनिक नंबर असते.
PM SVAMITVA Scheme 2024 Overview
योजनाचे नाव | प्रधानमंत्री स्वामित्व योजना |
श्रेणी | केंद्र सरकारी योजना |
सुरु कधी झाली | वर्ष 24 एप्रिल 2020 रोजी |
कोणी सुरु केली | भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मादीजी यांनी |
विभाग | पंचायती राज मंत्रालय |
उद्देश | देशातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड प्रदान करून आर्थिक मदत मिळण्यात सोपे होणे |
लाभार्थी | भारत देशामधील ग्रामीण क्षेत्रात राहत असलेलं नागरिक |
लाभ | युनिक नंबर असलेले प्रॉपर्टी कार्ड |
अर्ज प्रकिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट | svamitva.nic.in/svamitva/ |
PM SVAMITVA Yojana Aim
प्रधानमंत्री स्वामित्व योजनाचे मुख्य उद्देश ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांच्या आर्थिक जीवनात स्थिरता येण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या जमिनीचे एकाच कागदपत्रात आणले जात आहेत.
यामध्ये नागरिकांना प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून अधिकार दिला जातो. जेणेकरून ग्रामीण क्षेत्रामधील नागरिक प्रॉपर्टी कार्डच्यामार्फत लोन व इतर गोष्टी घेण्यात मदत मिळेल. यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या लाभ मिळणून त्यांच्या आर्थिक जीवनात सुधार होण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न आहे.
त्याचप्रमाणे, ग्रामीण नियोजन व्यवस्थित होण्यासाठी अचूक जमिनीची माहिती रिकॉर्ड करून प्राप्त करणे. तसेच गावागावांमधील जमिनीच्या प्रकरणावरून होणारे वादविवाद कमी करणे आणि नागरिकांना ग्रामीण क्षेत्रात होणाऱ्या विविध गोष्टींचा फायदा मिळवा.
PM SVAMITVA Scheme Implementation
- प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजेच ड्रोनच्या मदतीने नागरिकांची जमीन योग्य प्रद्धतीने मोजनपणी केली जाते.
- 2020 ते 2024 च्या चार वर्षांमध्ये देशातील ग्रामीण क्षेत्रात विविध टप्प्यामध्ये प्रकल्प राबविले जाणार आहेत.
- या योजनेच्या माध्यमातून 2020-21 च्या आर्थिक वर्षात पहिल्या पायलट प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारने 79.65 कोटी वाटप करण्यात आले होते.
- या पहिल्या पायलट प्रोजेक्टमध्ये जवळपास १ लाख गावकऱ्यांची निवड करण्यात आली होती.
- देशातील 6 राज्यांमध्ये असलेल्या एक लाख गांवाचे यामध्ये समावेश केले होते.
- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक आणि काही पंजाब व राजस्थानमधील गावांचासुद्धा समावेश केला होता.
- या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ड्रोनच्या सर्वेद्वारे या सहा सर्व राज्याने सर्वे ऑफ इंडियासोबत MoU सही केले आहेत.
- पहिल्या पायलट प्रॉजेक्टद्वारे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड बनविले जाणार व त्या एक लाख जमीन मालकांना मोबाईलवर
- SMS करून लिंक पाठिवले जाते.
- गाववगावांमध्ये त्यानंतर सरकारी कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप केले जाणार.
- सहा राज्यातील 763 गावांमध्ये योजनेचे लाभ देण्यात आले आहेत.
PM SVAMITVA Yojana Stakeholders Involvement
प्रधानमंत्री स्वामित्त्व योजनामध्ये सहभागी असणाऱ्या डिपार्टमेंटची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे.
- नोडल मंत्रालय (पंचायती राज मंत्रालय)
- ग्राम पंचायत
- सर्वे ऑफ इंडिया (तंत्रज्ञान एजन्सी)
- राज्य पंचायती विभाग
- स्थानिक जिल्हा अधिकारी
- राज्य महसूल विभाग
- नॅशल इन्फरोमॅटिकस सेंटर (NIC)
- जमीन मालक
PM SVAMITVA Yojana Benefits
- प्रधानमंत्री स्वामित्व योजनाचे फायदे देशामधील ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दिला जातो.
- या योजनेच्या माध्यमातून ड्रोनच्या साहाय्याने गावकऱ्यांच्या जमिनीचे मोजमाप करून अचूक रिकॉर्ड तयार केले जाते.
- जमीच्या रिकॉर्डच्या मदतीने नागरिकांना आपले जमीचे हक्क प्राप्त केले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्यतील कार्यालया सोबत मिळून ग्रामीण नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड प्रदान करतात.
- नागरिकांना सुरवातीला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मोबाईलवर पाठविले जाते आणि नंतर गावातील ग्रामपंचायत किंवा इतर संबंधित कार्यालयाच्यामार्फत कागदी प्रॉपर्टी कार्ड दिले जाते.
- त्याचसोबत केंद्र सरकारकडून ज्यांच्या जमिनी मॅपिंग केल्या आहेत, त्यांना स्वामित्व प्रमाणपत्र सुद्धा दिली जाते.
- नागरिकांना मिळणाऱ्या प्रॉपर्टी कार्डनुसार आर्थिक स्वरूपात मदत घेऊ शकतात.
PM SVAMITVA Yojana Required Documents
नागरिकांना अर्ज करताना प्रधानमंत्री स्वामित्व योजनाची आवश्यक कागदपत्रे जमा करून ठेवणे गरजेचे आहे, त्यांची संपूर्ण यादी खालीप्रमाणे दिली आहे.
- अर्जदाराचे आधारकार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जमिनी संबंधित संपूर्ण कागदपत्रे
PM SVAMITVA Yojana Online Apply
ज्या रुरल भागातील नागरिकांना प्रधानमंत्री स्वामित्व योजनामध्ये अर्ज करून लाभ घेयचा आहे, त्यांनी खालील दिलेल्या ऑनलाइन प्रकिया फॉलो करून अर्ज करणे.
- ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना सुरुवातीला पंचायती राज मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला जावे लागेल.
- मंत्रालयाच्या वेबसाइटमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर होमपेज उघडून येईल.
- त्या होमपेजमध्ये New User Registration असा पर्याय दिसेल तो निवडायचा आहे.
- त्यानंतर तुमच्या नवीन पेज उघडून आल्यावर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल.
- त्या फॉर्ममध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी व जमिनी संबंधित माहिती विचारली असेल.
- ती विचारलेली माहिती संपूर्ण अचूक भरून घेणे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे योग्यरीत्या स्कॅन करून अपलोड करणे.
- फॉर्म व कागदपत्रे जमा करून सबमिट बटनावर क्लिक करणे.
- त्यानंतर तुम्हाला अर्जाचे नंबर व पावती हे दोन्ही प्राप्त होईल ती सांभाळून ठेवणे.
- अशा प्रकारे तुम्ही अर्ज करून योजनेचा लाभ प्राप्त करू शकता.
PM SVAMITVA Scheme Property Card Download
प्रधानमंत्री स्वामित्व योजनाचे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड लिंक केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर SMS मार्फत लिंक पाठविण्यात येणार आणि त्या लिंकमधून कार्ड डाउनलोड कसे करायचे त्याच्या प्रकिया खाली दिले आहेत.
- प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील मेसेज इनबॉक्समध्ये जाऊन लिंक पाहायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला केंद्र सरकारकडून आलेल्या मेजेसमधील लिंकला क्लिक करायचे आहे.
- त्या लिंकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती मिळेल, ज्यामध्ये तुमचे नाव, संपत्ती आणि पत्ता दिसेल.
- त्यामध्ये खाली तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करण्यासाठी पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड होऊन तुम्हाला डिजिटलच्या स्वरूपात मोबाईलमध्ये दिसेल.
निष्कर्ष
आमच्या या लेखातून आम्ही तुम्हाला PM SVAMITVA Yojana संबंधित संपूर्ण माहिती सविस्तारित्या सांगितली. ज्यामध्ये योजना काय आहे? यांचे महत्त्व काय आहे? यामधून कोणाला फायदा दिला जाणार? त्यांचे उद्देश काय होते? यामागचे कोणते मंत्रालय काम करत आहेत? तसेच योजनेची अंमलबजावणी कशी करण्यात येते? नागरिकांना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहेत? ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे पार पाडण्यात येते? आणि प्रॉपर्टी कार्ड प्राप्त करण्यासाठी कोणत्या गोष्टी करावे लागणार? अशा सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदशन करण्यात आले.
तुम्ही सुद्धा ग्रामीण क्षेत्रात राहत असतील, परंतु अजून तुम्हाला योजनेचा लाभ मिळाला नसेल तर, आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घेऊन अर्ज करा व प्रॉपर्टी कार्ड प्राप्त करून तुमच्या जमिनीची सर्व माहिती मिळवून घ्या.
आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही आमच्या वेबसाइटला Subscribe करू शकता किंवा आमच्या टेलिग्राम व व्हाट्सअप चॅनेलला जॉईन करून केंद्र व राज्य सरकारच्या नवीन नवीन योजनांची माहिती मिळवू शकता.
FAQs
स्वामीत्व योजना कधी सुरू करण्यात आली?
केंद्र सरकारकडून या योजनेची सुरवात वर्ष 24 एप्रिल 2020 रोजी करण्यात आली.
स्वामित्व योजनेच्या प्रायोगिक टप्प्यात कोणत्या राज्याचा समावेश करण्यात आलेला नाही?
या योजने अंतर्गत प्रायोगिक पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक व्यतिरिक्त इतर राज्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
Svamitva प्रकल्प काय आहे?
Svamitva प्रकल्पाच्या साहाय्याने ग्रामीण क्षेत्रातील जमिनीचे सर्वे व ड्रोनच्या मार्फत मॅपिंग केले जाते.
पुढे वाचा: