PM Surya Ghar Yojana Eligibility: या आर्टिकलमध्ये पीएम सूर्य घर योजनेसाठी कोण पात्र आहेत? आणि त्यांना कोणते लाभ दिले जातात? याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
पीएम सूर्य घर योजना अंतर्गत पात्र असलेल्या कुटुंबाला केंद्र सरकारच्यामार्फत सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी 40% सबसिडीचा लाभ देण्यात येतो. त्याचप्रमाणे योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या कुटुंबाला 300 युनिट पर्यंत फ्री वीज वापरायला देण्यात येते. त्याचप्रमाणे सोलर पॅनल बसविण्यासाठी केंद्र शासन आर्थिक स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देते.
Read More: PM Surya Ghar Muft Bijli Yojana
योजनेचे हे सर्व लाभ घेण्यास कोण पात्र असणार आहेत? त्यांना कोणत्या पात्रतेच्या अटी फॉलो कराव्या लागतील? आणि कोण योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेऊ शकतो? या सर्व माहितीबद्दल आर्टिकलमध्ये जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत आर्टिकल पहा.
Read More: PM Suryoday Yojana Registration
पीएम सूर्य घर योजना पात्रता
- योजनेच्या माध्यमातून घरामध्ये सोलर पॅनल बसविण्यासाठी भारत देशामधील रहिवासी कुटुंब पात्र आहेत.
- कुटुंबातील 18 वर्ष पूर्ण असलेले सदस्य योजनेमध्ये अर्ज करू शकतात.
- ज्या नागरिकांचे भारत देशामध्ये स्वतःचे घर आहे, त्यांना योजनेचा लाभ देण्यात येतो.
- त्याचप्रकारे स्वतःचे घर असून त्यामध्ये सोलर पॅनल बसविण्यासाठी छत असणे आवश्यक आहे.
- सोलर पॅनेलसाठी रजिस्ट्रेशन करताना आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करणे.
- योजनेमधून सबसिडीचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधारकार्ड बँक खात्यामध्ये लिंक असणे.
- जे सदस्य सोलर पॅनलसाठी अर्ज करत आहेत, त्यांनी कोणत्याही इतर ठिकाणावरून सबसिडी घेतलेली नसावी.
- सूर्य घर योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल लावण्यासाठी घरामध्ये वीज कनेक्शन असणे.