PM Surya Ghar Yojana 2024: नागरिकांना मिळणार फ्री 300 युनिट वीज दरमहा

PM Surya Ghar Yojana 2024: 22 जानेवारी 2024 रोजी भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना याची घोषणा केली. या योजनाच्या माध्यमातून देशामधील जवळपास 1 कोटी लोकांच्या घरामध्ये Rooftop Solar Panel लावणे आणि या उपक्रमामधून नागरिकांना वीज बिलावर होणाऱ्या खर्चाला कमी करून शून्यात आणणे हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

WhatsApp Group Follow Now
Telegram Group Join Now
Instagram Group Follow Now

ज्या गरीब व मध्यम वर्गातील कुटुंबाचे उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनाचा लाभ घेता येणार. या योजनेमध्ये प्रत्येक देशामधील आणि प्रत्येक राज्यामधील व्यक्ती सहभागी होऊन याचा लाभ घेऊ शकतो.

जे नागरिक पीएम सूर्य घर योजनांमध्ये सहभागी होऊन आपल्या घरामध्ये सोलर पॅनेल लावतील, त्यांना केंद्र सरकारतर्फे महिन्याला 300 युनिट पर्यंतची मोफत वीज वापरण्यासाठी मिळणार. त्याचसोबत, नागरिक सोलर वापरून राहिलेली वीज विकून पैसे सुद्धा कमवू शकतात. जे लोक जास्तीच्या वीजबिलामुळे त्रस्त झाले आहेत, त्याच्यासाठी ही  योजना अगदी उत्तम आणि फायदेशीर ठरेल. 

जर तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत अर्ज करून लाभ मिळवायचा आहे, तर आमच्या या लेखातून तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल. यामध्ये आम्ही योजनेमध्ये अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? तसेच त्यांचे उद्देश, फायदे, पात्रता, लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि बरेच काही अशी महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये सांगितली आहे. योग्यरीत्या अर्ज करून लाभ घेण्यासाठी आर्टिकल शेवटपर्यंत पाहा.

PM Surya Ghar Yojana in Marathi 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PM Surya Ghar Muft Bijli Yojana या नावाने ही योजना 22 जानेवारी 2024 रोजी सुरु केली. यामध्ये सहभागी होणाऱ्या गरीब व मध्यम वर्गातील लोकांच्या घरावर सोलर पॅनेल लावले जातील. देशभरात केंद्र सरकारचे सोलर पॅनेलचे लाभ 1 कोटी लोकांना देण्याचा लक्ष्य सुरुवातीला ठेवण्यात आला आहे. जेणेकरून देशामधील करोडो लोकांसाठी वीज बिल कमी करण्यात मदत होईल. 

त्याचसोबत करोडो लोकांना दर महिन्याला 300 युनिट सुद्धा मोफत देण्यात येणार. या योजने अंतर्गत मोफत वीज आणि सोलर पॅनेल देशामध्ये चालू करण्यासाठी देशाचे आर्थिक मंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर करताना ही घोषणा केली. यामध्ये योग्यरित्या काम होण्यासाठी तसेच नागरिकांना अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट सुद्धा चालू करण्यात आलेली आहे.

Pradhan Mantri Surya Ghar Yojana 2024 Overview

योजनेचे नावप्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
सुरु कोणी केलीकेंद्र सरकारने
कधी सुरु केली22 जानेवारी, 2024 रोजी
विभागनवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
उद्देशदेशामधील नागरिकांना मोफत वीज प्रदान करणे
लाभार्थीदेशामधील नागरिक
लाभसोलर पॅनेल व मोफत 300 युनिट वीज
अर्ज पद्धतऑनलाइन
अधिकृत ववेबसाइटpmsuryaghar.gov.in

PM Surya Ghar Scheme Aim 

केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री सूर्य घर योजनाचे उद्देश देशामधील 1 करोड घरांमध्ये दर महिन्याला 300 युनिट मोफत देऊन वर्षाला 15000 कोटींची बचत करणे. यातून आपल्या देशामध्ये ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन मिळून इतर स्रोतांच्या माध्यमातून येणाऱ्या विजेवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होणार नाही. 

सोलर पॅनेलचा वापर केल्यामुळे इतर स्रोतांच्या माध्यमातून येणाऱ्या विजेसाठी मागणी कमी होईल. तसेच करोडो घरांमध्ये वीज बचत झाल्यामुळे राहिलेली वीज ही वीज वितरण कंपनींना विकून चांगले उत्पन्न नागरिक कमावू शकतात. या उपक्रमातून अशापद्धतीने इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशनसुद्धा वाढवण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे, सोलर पॅनेल क्षेत्रामधील नागरिकांसाठी चांगल्या प्रमाणात रोजगार मिळवण्याची संधी मिळेल.

Pradhan Mantri Surya Ghar Yojana Benefits 

  • प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत देशामधील 1 कोटी घरांना लाभ घेण्याचा फायदा मिळणार. 
  • या योजनेच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या लाभार्थींना आपल्या घरासाठी प्रतिमहा 300 युनिट वीज फ्रीमध्ये वापरायला मिळणार. 
  • नागरिकांना सोलर पॅनेल विकत घेण्यासाठी सरकारतर्फे सबसिडीचा लाभ घेता येणार. 
  • नागरिकांना आपल्या घरासाठी सोलर पॅनेल विकत घेताना लोन उपलब्ध करून देण्यासाठी मदत मिळणार तसेच मार्गदर्शनसुद्धा केले जाणार. 
  • भारत देशामध्ये सर्वत्र सौर ऊर्जाची स्थापना करण्यासाठी आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी ग्रामीण भागातील पंचायत आणि शहरामधील स्थानिक संस्थेमध्ये प्रोत्साहन दिले जाणार. 
  • नागरिकांना योग्यरित्या योजनेचा ऑनलाईन अर्ज करून लाभ घेता यावा यासाठी official website सुद्धा सुरु करण्यात आली आहे. 
  • तसेच ग्राहकांना व शहरातील संस्थांना आणि आर्थिक संस्थांना एकत्र आणून प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलसुद्धा सुरु करण्यात येणार. 
  • सौर ऊर्जाच्या वापरामुळे पर्यावरणास हानी टाळण्यास मदत होईल आणि पर्यावरण सुरक्षित राहील. 
  • या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना व विक्रेत्यांना तसेच कंपनीमधील कामगारांना रोजगार प्राप्त करण्यास मदत होईल. 

PM Surya Ghar Yojana Eligibility 

  • प्रधानमंत्री सूर्य घर योजनामध्ये पात्र असण्यासाठी अर्जदारांना भारताचा स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. 
  • या योजनेमध्ये नागरिकांना अर्ज करण्यासाठी त्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे. 
  • देशामधील गरीब व मध्यम वर्गातील सदस्य यामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात. 
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2 लाखाहून कमी असणे. 
  • या योजनेसाठी सरकारी कार्यालयातील कर्मचारी अर्ज करू शकत नाही. 
  • अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.
  • देशामधील सगळ्या जातींच्या लोकांना यामध्ये अर्ज करता येणार. 

Pradhan Mantri Surya Ghar Yojana Required Documents 

पीएम सूर्य घर योजनामध्ये लागणारे कागदपत्रे अर्ज करताना खालील दिलेल्या यादीनुसार जोडलेले असणे गरजेचे आहे. 

  • अर्जदाराचे आधारकार्ड (बँक लिंक) 
  • वीज बिल 
  • रेशनकार्ड 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • उत्पनाचा दाखला 
  • बँक खात्याचे पासबुक 
  • रहिवासी दाखला 
  • शपथपत्र 
  • मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी 

PM Surya Ghar Yojana Online Apply

प्रधानमंत्री सूर्य घर फ्री वीज योजनामध्ये ऑनलाईन अर्ज करून लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या प्रकिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा. 

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. 
  • त्यानंतर तुमच्या समोर वेबसाइटचे होमपेज ओपन होईल. 
  • होमपेजवर तुम्हाला डाव्या बाजूला Apply for Rooftop Solar दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. 
  • त्यानंतर login आणि registration चा पर्याय दिसेल. 
  • सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. 
  • रजिस्ट्रेशन पर्यायामध्ये जाऊन तुम्हाला तुमचे अकाउंट डिटेल्स टाकायचे आहे.  
  • त्यामध्ये तुमचे राज्य, जिल्हा, वीज वितरण कंपनी आणि ग्राहक नंबर हे सगळे लागेल. 
  • अर्ज करण्यासाठी खालील दिलेले प्रकिया स्टेप बाय स्टेप पार पाडा. 
  • पहिली स्टेप: तुमचे राज्य, विद्युत कंपनीचे नाव, ग्राहक नंबर, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी टाकून घेणे. 
  • दुसरी स्टेप: लॉगीनमध्ये जाऊन ग्राहक नंबर व मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून तुमच्या समोर रुफटॉप सोलरसाठी अर्जाचा फॉर्म येईल तो भरून सबमिट करून देणे 
  • तिसरी स्टेप: त्यानंतर तुम्हाला डिस्कॉममधून मंजुरी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. मंजुरी मिळाल्यानंतर डिस्कॉममधील कोणत्यातरी एका वेंडर्सकडून संयंत्र स्थापित करून घेणे. 
  • चौथी स्टेप: तुमच्या लोकेशनवर प्लांट स्थापित करून झाल्यावर प्लांटचे विवरण जमा करून नेट मीटरसाठी अर्ज करणे. 
  • पाचवी स्टेप: तुमच्या प्लांटमध्ये नेट मीटरची स्थापना करून ते डिस्कॉमद्वारे निरीक्षण करून पोर्टलमध्ये commissioning प्रमाणपत्र तयार करतील. 
  • सहावी स्टेप: जेव्हा तुम्हाला कमिशिंग रिपोर्ट प्राप्त होईल तेव्हा ते पोर्टलमध्ये जाऊन बँक खात्याचे माहिती आणि canceled चेक सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून 30 दिवसाच्या आतमध्ये सबसिडी जमा केली जाईल. 
  • अशा प्रकारे तुमचे सोलर पॅनेलसाठी अर्ज करून लाभ मिळण्यात मदत होईल.

Maharashtra Vendor List of PM Solar Rooftop Scheme

क्रमांकडिस्कॉमचे नावएकूण वेंडर्स
1Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd1142
2Brihanmumbai Electric Supply & Transport (BEST)4
3BSES (Reliance Energy Ltd.)1
4Tata Power Co. Ltd. 7
5Adani Electricity Mumbai Limited22

Solar Rooftop Calculator Guide 

  • सर्वात प्रथम प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचे अधिकृत वेबसाइट उघडायची आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला Calculator च्या बटनावर क्लिक करायचे. 
  • तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल. 
  • त्यामध्ये तुम्हाला तुमचे State, Category Of Consumer, Average Monthly Electricity Bill, Total Available Roof Area, Amount To Be Invested, Required Solar Plant Capacity And The Sanction Load इत्यादी माहिती भरून घ्यायची आहे. 
  • त्यानंतर तुम्हाला Calculate बटनावर क्लिक करायचे. 
  • अशा प्रकारे तुम्ही सोलर रुफटॉपसाठी calculator चा वापर करून माहिती मिळवू शकता.

निष्कर्ष 

आम्ही या लेखातून तुम्हाला PM Surya Ghar Yojana संदर्भात संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये आम्ही योजनेचे उद्देश काय आहेत? ती कधी सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? यामध्ये कोणते विभाग नेमले आहे? त्यांचे फायदे काय आहेत? यासाठी कोण कोण पात्र आहेत? यामध्ये अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत? तसेच अर्ज कसे करायचे आहे? महाराष्ट्रातील वेंडर्सची यादी याबद्दल सविस्तररित्या मार्गदर्शन केले. 

तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर आम्ही दिलेल्या माहितीनुसार अर्ज करून तुमच्या घरात सोलर पॅनेल लावून घ्या आणि वीज बिलाच्या खर्चामधून मुक्त व्हा. आमचा हा लेख  उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या कुटुंबातील लोकांनासुद्धा पाठवून मदत करा. 

तुम्हाला अशाच लेटेस्ट योजनांबाबत माहिती मिळण्यासाठी आम्हाला Subscribe करू शकता किंवा Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून अपडेट्स मिळवू शकता.

FAQs

पीएम सूर्यघर योजनेसाठी पात्रता काय आहे? 

या योजनेसाठी भारतातील स्थानिक नागरिक असून वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे.

प्रधानमंत्री फ्री सोलर पॅनेल योजना काय आहे? 

प्रधानमंत्री फ्री सोलर पॅनेल योजनामध्ये सोलर पॅनेल लावण्यासाठी सबसिडी दिली जाणार सोबत 300 युनिट फ्री वीज वापरायला मिळणार. 

सूर्य घरसाठी अर्ज कसा करायचा? 

सूर्य घरसाठी अर्ज pmsuryaghar gov in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा.

Read More: