PM Surya Ghar Muft Bijli Yojana Eligibility: प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनाच्या माध्यमातून सबसिडीचा लाभ घेण्यासाठी कोणत्या पात्रतेच्या अटी आहेत? याबद्दल आर्टिकलमध्ये सविस्तर माहिती जाणून घेण्यास मदत मिळेल. ती संपूर्ण पात्रता क्रमाने पहा आणि योजनेमध्ये अर्ज करून मोफत वीज व सबसिडीचा लाभ घ्या.
प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून फ्री वीज आणि छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी 40% सबसिडी सुद्धा प्रदान केली जाते. ज्यामध्ये केंद्र सरकार लाभार्थी घराला 300 युनिट मोफत वीज वापरण्यास देतात. त्याचप्रमाणे शासनातर्फे सोलर पॅनल विकत घेण्यासाठी सुद्धा REC संस्थाच्यामार्फत कर्ज उपलब्द करून देते.
भारत देशामधील नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी लेखामध्ये कोणते कुटुंब सहभागी होऊ शकतात? त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या नावाने अर्ज करणार आहेत, त्याचे वय वर्ष किती असावे? आणि कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार? याबद्दलची सर्व माहिती देणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनाच्या पात्रतेच्या अटी
- योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदारांना भारतामधील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- केंद्र सरकारने योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी 18 वर्ष वयाची मर्यादा लागू केली आहे.
- योजना अंतर्गत सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या घरावरती छत असणे.
- त्याचप्रमाणे योजनेचा लाभ फक्त स्वतःचे घर असलेल्या नागरिकांना देण्यात येतो.
- तसेच योजनामध्ये पात्र असण्यासाठी नागरिकांच्या घरामध्ये वीज कनेक्शनची सुविधा उपलब्द असणे.
- जे व्यक्ती योजने अंतर्गत अर्ज करू पाहत आहेत, त्यांनी सोलर पॅनेलसाठी इतर कोणत्याही माध्यमातून सबसिडी घेतलेली नसावी.
- योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर योग्यरीत्या रक्कम बँकेत जमा होण्याकरिता अर्जदाराचे बँक खाते आधारकार्ड सोबत लिंक असावे.
- अर्ज करताना अर्जदारांना घरचा पत्ता, मागील महिन्यातील वीज बिल, बँक खात्याचे पासबुक, फोटो आणि घराचे मालकी हक्क असलेले कागदपत्रे यांची गरज लागणार.
Read More: